Thane Rain : पावसाचे परिणाम, एक महिन्यात 17 जण वाहून गेले, दीड हजार जणांचं स्थलांतर
Thane : पावसामुळे एक महिन्यात 17 जण वाहून गेले

ठाणे : जून महिन्यात पाऊस तसा बेताचाच होत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मात्र चांगला पाऊस बरसला. ठाण्यात मुसळधार पावसाने (Thane Rain) दाणादाण उडवली. त्यामुळे ठाण्यात वित्तहानीसोबत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अवघ्या एका महिन्यातच 17 जण पावसाच्या पाण्यात वाहून गेले. अन् त्यांचा मृत्यू झाला आहे. तर दीड हजार रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलं. भिवंडी तालुक्यातील सहाजणांचा पोहायला गेले अन् तिथे मृत्यू झाला. शहापूरचे चार, अंबरनाथचे तीन, ठाणे आणि मुरबाडमधील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. 1 ते 23 जुलैपर्यंत जिल्ह्यात 1127.05 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घरांचीही पडझड झाली आहे. शहापूर, भिवंडी तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका (Rain Effect) बसला आहे.
पावसाचा जीवितास धोका
ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळालं. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. त्यातच धरणं भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यामुळे नदी, विहीर, धरण या ठिकाणी पोहण्यासाठी, मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 17 जणांचा मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील सहाजणांचा पोहायला गेले अन् तिथे मृत्यू झाला. शहापूरचे चार, अंबरनाथचे तीन, ठाणे आणि मुरबाडमधील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. 1 ते 23 जुलैपर्यंत जिल्ह्यात 1127.05 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घरांचीही पडझड झाली आहे. शहापूर, भिवंडी तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
जनावरांचे हाल
पावसामुळे जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झालेत. कल्याणमध्ये पुराच्या पाण्यात एक म्हैस वाहून गेली. अंबरनाथमध्ये गायीसह वासराचा शॉक लागून मृत्यू झालाय. शहापूरमध्ये म्हशीचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला. मुरबाडमध्ये तीन गोठ्यांचं मोठं नुकसान झालं. यात काही जनावरं जखमी झाली.
दरडींची भिती, लोकांचं स्थलांतर
ठाणे जिल्ह्यात यंदा भरपूर पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी पूर आला तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या. तर आताही अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याची भिती आहे. त्यामुळे 265 कुटुंबांतील 1 हजार 60 जणांना स्थलांतर करण्यात आलं. यात भिवंडी तालुक्यातील 137 कुटुंबातील 501, अंबरनाथमधील 110 कुटुंबातील 324 आणि शहापूरमधील 18 कुटुंबातील 235 जणांचा समावेश आहे.
