AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Virar | वसई विरारचा लेव्हल 3 मध्ये समावेश, काय सुरू काय बंद? वाचा…

राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार वसई विरार महापालिकेचा लेव्हल 3 मध्ये समावेश झालाय.

Vasai Virar | वसई विरारचा लेव्हल 3 मध्ये समावेश, काय सुरू काय बंद? वाचा...
वसई विरार महानगरपालिका
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 12:03 AM
Share

वसई विरार : राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार वसई विरार महापालिकेचा लेव्हल 3 मध्ये समावेश झालाय. सध्या वसई विरारचा कोरोना संसर्गाचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर 40 टक्केपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड वापरात आहेत. त्यामुळे वसई विरार महापालिका क्षेत्राला लेव्हल 3 साठीचे राज्य सरकारचे सर्व निर्बंध लागू राहतील (Vasai Virar in level 3 of corona infection know about new rules).

वसई विरारसह पालघर जिल्ह्यात काय सुरू राहणार?

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि आस्थापनं सोमवार ते रविवार सकाळी 2 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील
  • रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. 4 नंतर पार्सल सेवा सुरू राहील आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा सुरू राहील.
  • लोकल ट्रेनसाठी मुंबई महापालिकेने लागू केलेले आदेश लागू राहतील
  • सार्वजनिक उधाने, मैदान, ,चालणे, सायकलिंग सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • खाजगी आस्थापना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • कार्यालयीन उपस्थिती 50 टक्के क्षमतेने सुरू राहातील
  • खेळ सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहतील
  • शुटिंग चित्रीकरण बबलच्या आतमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
  • विवाह समारंभास 50 व्यक्ती तर अंत्यविधीसाठी 20 माणसांची उपस्थितीची मर्यादा
  • बैठका, निवडणुका, वार्षिक सर्वसाधारण बैठका 50 टक्के उपस्थिती
  • बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांवर बांधकाम करता येईल, त्यांना 4 वाजता सुट्टी देणे बंधनकारक आहे
  • कृषीविषयक सर्व कामे 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • ई कॉमर्स नियमित सुरू राहतील
  • जिम, सलून , ब्युटीपार्लर, स्पा, सोमवार ते रविवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, गिऱ्हाईकांना वेळ ठरवूनच बोलवावे लागेल
  • सार्वजनिक वाहतून 100 टक्के आसन क्षमतेने चालू राहणार
  • अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरू राहतील, परंतु निर्बंध स्तर लेवल 5 मधील जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता किंवा जिल्ह्यामधून वाहतूक करताना थांबणार असतील तर ई पास आवश्यक राहील

काय बंद राहणार?

  • अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद राहतील
  • मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील
  • शुटिंग चित्रीकरण करताना बबलच्या बाहेर फिरता येणार नाही
  • वसई विरार महापालिका क्षेत्रात सायंकाळी 5 पर्यंत जमावबंदी, तर 5 नंतर संचारबंदी राहणार आहे
  • सार्वजनिक वाहतून 100 टक्के आसन क्षमतेने होईल, पण प्रवाशांना उभं राहून प्रवास करता येणार नाही
  • जिम, सलून , ब्युटीपार्लर, स्पामध्ये वातानुकूलतेचा वापर करता येणार नाही

हेही वाचा :

नालासोपारा लसीकरण केंद्रात लसीकरणाच्या रांगेत चक्कर, पुढच्या क्षणातचं सर्व संपलं

अधिकाऱ्याच्या चुकीच्या माहितीचा फटका, बुलडाणा जिल्हा थेट तिसऱ्या टप्प्यात, अनलॉक अंतर्गत येणार अनेक निर्बंध

Nagpur Unlock | अनलॉक अंतर्गत नागपूरमध्ये नवी नियमावली, सायंकाळी 5 नंतर जमावबंदी, काय बंद काय सुरु ?

व्हिडीओ पाहा :

Vasai Virar in level 3 of corona infection know about new rules

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.