Akola Bullock Cart Race | Balapurच्या काळ्या मातीत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

Akola Bullock Cart Race | Balapurच्या काळ्या मातीत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 5:11 PM

न्यायाल्याने उठवलेल्या बंदीनंतर आता सर्वत्र पट भरत असून असाच एक पट अकोला (Akola) जिल्हातल्या बाळापूर (Balapur) तालुक्यातील देगाव या गावात भरविण्यात आला आहे. यात माणकी येथील बैल (Bull) जोडीने 100 मीटर अंतर 6 सेकंद 58 पॉइंटमध्ये पार करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

लोकांचा ओसंडून वाहत असलेला उत्साह, शर्यतीत आपलाच ढवळ्यापवळ्या सर्जा राजाची जोडी जिंकली पाहिजे, म्हणून सर्व ताकदीनिशी मैदानात उतरलेल्या धूर कऱ्याचा जोश आता सर्वत्र दिसू लागला आहे. न्यायाल्याने उठवलेल्या बंदीनंतर आता सर्वत्र पट भरत असून असाच एक पट अकोला (Akola) जिल्हातल्या बाळापूर (Balapur) तालुक्यातील देगाव या गावात भरविण्यात आला आहे. यात माणकी येथील बैल (Bull) जोडीने 100 मीटर अंतर 6 सेकंद 58 पॉइंटमध्ये पार करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यात जिल्हा व जिल्हाबाहेरील बैल जोड्या आल्या होत्या. यात शो पल्याच्या 32 आणि जनरल गटाच्या 19 जोड्या आल्या होत्या. यात जनरल गटातून जिल्हातल्या माणकी येथील ज्ञानू पाटील मैसने या जोडीने पहिला नंबर पटकावला असून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.