भाईंदर : भाईंदर पश्चिमेचा नवघर रोडवर असलेल्या गुडविन कंपनीच्या ऑफिसमध्ये चोरी (Theft)ची घटना उघडकीस आली आहे. दोन महिला 2 जुलै रोजी सकाळी या ऑफिसमध्ये घुसल्या आणि किंमती वस्तू (Expensive Items) घेऊन पसार झाल्या. ही सर्व घटना ऑफिसमधील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सकाळी कर्मचारी ऑफिसमध्ये आल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.