AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पक्षप्रमुख नाहीत तर कारस्थान करणारे कटप्रमुख, एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव येथील दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केले. शिवसैनिकांना त्यांनी आवाहन केली की येणाऱ्या निवडणुकीत काम करा. स्थानिक स्वराज्य संस्थात भगवा फडकवा. आपल्यातील मतभेद विसरा आणि कामाला लागा असा आदेशच त्यांनी यावेळी दिला.

हे पक्षप्रमुख नाहीत तर कारस्थान करणारे कटप्रमुख, एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
eknath shinde
| Updated on: Oct 02, 2025 | 9:29 PM
Share

शिवसेनेचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे झाला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर झोंबरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांना संपवण्याचे प्रयत्न केले होते. याआधी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या भाषणाचा धागा पकडून एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रमुख कधी असा असतो का? स्वत:च्या कार्यकर्त्यांना संपवणारा कधी पक्ष प्रमुख असूच शकत नाही. हे पक्ष प्रमुख नसून कट प्रमुख आहेत अशी जहरी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या खुर्चीसाठी शिवसैनिकांचा विचार केला नाही. सतत आपल्यापेक्षा कोणी पुढे जाऊ नये यासाठी कटकारस्थानं केली. त्यांच्या अशा वागण्याने त्यांना सोडून सर्वच जण जात आहेत. एखादा माणूस चूकीचा असू शकतो. सगळेच तुम्हाला सोडून जात आहेत. ते सगळे चुकीचे आणि तु्म्हीच एकटे बरोबर असे कधी असू शकते. मला तर भिती वाटते की यांची सावली तरी यांच्याबरोबर राहणार का असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्ही संघावरही टीका केली.संकटाच्यावेळी धावून जाणाऱ्या संघावर तुम्ही टीका करता तुम्ही कसले हिंदुत्ववादी. मी या राष्ट्रभक्त संघटनेला शिवसेनेच्यावतीने शुभेच्छा देतो असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे यांनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावलं आहे. रामदास भाईंनी सांगितले ते अनुभव खरेच आहेत. आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवणारे हे तर कटप्रमुख आहेत. हे पक्षप्रमुख नाहीत तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महायुतीची सत्ता आली पाहिजे

आपण लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीची सत्ता आली पाहिजे. नाही तर मुंबई जी पुढे जात आहे, ती मागे जाईल. २५ वर्ष मागे जाईल. मुंबईची अधोगती होईल. आपण तीन वर्षात जे काम केलं. ते फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका आणि पंचायत समितीत भगवा फडकवा. कोण कुणाशी युती करतो, कोण कुणाशी मनोमिलन करतो याची चिंता करू नका. त्याचा हिशोब आमच्याकडे आहे. काही चिंता करण्याची गरज नाही असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे बनून काम करायचं

लोक कामाला महत्त्व देतात. हे यश त्यामुळे मिळालं आहे. ते यश तुमचं आहे. शिवसैनिकांचं आहे. ८० जागा लढवून ६० जागा जिंकण्याचा इतिहास तुम्ही घडवला आहात. तुम्ही कार्यकर्ता आहात. मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम केलं. आजही तेच करतोय. उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो. पण एकच सांगतो. तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे. आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहेत असेही आवाहन यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी केले.

शिवसेना शताब्दी महोत्सव जोरदार साजरा करेल

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर ठाकरे टीका करतात. एक नंबरवरून ते खाली आले. तुम्ही तर घरात बसून वर गेला. किती टीका करता. तुमच्या सारखा रंग बदलणारा सरडा मी कधीच पाहिला नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तुमच्या सारखे आम्ही दिल्लीत मुजरे करायला जात नाही. पुरामुळे ज्यांची लग्नं रखडली असतील त्यांची जबाबदारी शिवसेना घेईल. आपण बांधिलकी म्हणून घेत आहे. माझ्याकडे दोन हात रिकामे नाही. देणारे हात आहे. पुढचं वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेना शताब्दी महोत्सव जोरदार साजरा करेल. कामाला लागा. निवडणूका नवीन नाही. शेतकरी संकटात आहे. त्यांना मदत करा असेही ते यावेळी म्हणाले.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.