डरकाळी फोडतच आला वाघ! Gadchiroliमध्ये मुक्तसंचार, Video viral

डरकाळी फोडतच आला वाघ! Gadchiroliमध्ये मुक्तसंचार, Video viral

| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 12:19 PM

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील कुरखेडा मार्गावर एक पट्टेदार वाघाचे (Tiger) दर्शन झाले आहे. हा वाघ जंगलातून निघून राष्ट्रीय महामार्ग ओलांडतांना दिसला आहे. पट्टेदार वाघ रागात असून त्या घनदाट जंगलातून डरकाळी (Roar) फोडत तो रस्त्यावर आला.

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील कुरखेडा मार्गावर एक पट्टेदार वाघाचे (Tiger) दर्शन झाले आहे. हा वाघ जंगलातून निघून राष्ट्रीय महामार्ग ओलांडतांना दिसला आहे. पट्टेदार वाघ रागात असून त्या घनदाट जंगलातून डरकाळी (Roar) फोडत तो रस्त्यावर आला. सध्या हा व्हिडीओ काल रात्रीपासून जोमाने व्हायरल होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात या अगोदर पट्टेदार वाघाने खूप दहशत घातली होती. देसाईगंज आरमोरी या दोन तालुक्यातील काही इसमावर हल्ला केला होता, तर काही पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. आता तो हाच वाघ आहे का, असा प्रश्नही गडचिरोली वासियांना पडलेला आहे. मात्र कालपासून व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानंतर गडचिरोली परिसराती भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण याआधीही वाघाने प्रचंड दहशत उडवून दिली होती.