AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | पनवेलमध्ये आज निर्धार मेळावा, भाजपाच्या ऑफरवर राज ठाकरे काय भूमिका घेणार?

Raj Thackeray | या निर्धार मेळाव्या मनसेकडून काय निर्धार केला जातो? त्याकडे राजकीय जाणकरांचे लक्ष आहे. "राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत सहभागी झाली. दुसरी टीमही लवकरच सत्तेत सहभागी होईल" असं राज ठाकरे यांनी म्हटलं होते.

Raj Thackeray | पनवेलमध्ये आज निर्धार मेळावा, भाजपाच्या ऑफरवर राज ठाकरे काय भूमिका घेणार?
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 16, 2023 | 8:57 AM
Share

पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पनवेलमध्ये तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांच लक्ष असेल. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे. या निर्धार मेळाव्या मनसेकडून काय निर्धार केला जातो? त्याकडे राजकीय जाणकरांचे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपाकडून ऑफर असल्याच वक्तव्य केलं होतं. त्यावर राज ठाकरे आज काय बोलणार? मनसेची भूमिका काय असेल? याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुक्ता आहे.

मागच्या आठवड्यात पुण्यात एका व्यावसायिकाच्या बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यावर राज ठाकरे काय बोलणार? याकडेही लक्ष असेल.

शरद पवार-अजित पवार बैठकीबद्दल काय बोलणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या महिन्यात फूट पडली. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत सहभागी झाली. दुसरी टीमही लवकरच सत्तेत सहभागी होईल, असं म्हटलं होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी घडतायत, त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल इंडियात आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे.

निर्धार मेळावा कोणासाठी?

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडले आहेत. प्रवासी या मार्गावरुन प्रवास करताना अक्षरक्ष: हतबल होतात. त्या विरोधात मनसेने हा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. स्वत: राज ठाकरे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करु शकतात. पनवेल शहरात या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आलीय. रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांविरोधात विभागावर आंदोलन करणार आहेत. पनवेल शहरात मनसेच्या या निर्धार मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मनसेचा फायदा काय?

पुढच्या महिन्य़ात गणेशोत्सव आहे. मुंबईतून दरवर्षी लाखो कोकणवासीय याच मुंबई-गोवा महामार्गावरुन कोकणात जातात. त्या दृष्टीने मनसेचा हा निर्धार मेळावा महत्त्वाचा आहे. मनसेच्या मतदारांमध्ये कोकणी मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या आंदोलनाचा मनसेला फायदा होऊ शकतो.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.