AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Pune Express Way : पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक, प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या!

Mumbai Pune Expressway news : मुंबई-पुणे महामर्गावरील किवळे ते सोमाटणे या दरम्यान वाहनधारकांना मार्गस्थ होता येणार नाही. 12 ते 2 या कालावधीत या मार्गावरील ओव्हर हेड गॅन्ट्री हे बसवण्याचे काम केले जाणार आहे. ऐनवेळी वाहनधारकांची गैससोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्वकल्पना देण्यात आली आहे.

Mumbai Pune Express Way : पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक, प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या!
मुंबई-पुणे महामार्ग
| Edited By: | Updated on: Aug 26, 2022 | 6:18 AM
Share

पुणे :  (Mumbai-Pune Highway) मुंबई-पुणे महामार्गावर कायम (Queues of vehicles) वाहनांच्या रांगा लागेलेल्या असतात. दोन मुख्य शहरातील नागरिकांची वर्दळ या मार्गावर असते. मात्र, आज (शुक्रवारी) किवळे ते सोमाटणे या दरम्यान, दुपारी 12 ते 2 या वेळेत (Traffic block) ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. ओव्हर हेड गॅन्ट्री बसविन्यासाठी एक्सप्रेस हायवेवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन तासात या मार्गावरुन वाहनधारकांना मार्गस्थ होता येणार नाही. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे या महामार्गावरील काम पूर्ण केले जाणार आहे.

किवळे ते सोमाटणे दरम्यान ब्लॉक

मुंबई-पुणे महामर्गावरील किवळे ते सोमाटणे या दरम्यान वाहनधारकांना मार्गस्थ होता येणार नाही. 12 ते 2 या कालावधीत या मार्गावरील ओव्हर हेड गॅन्ट्री हे बसवण्याचे काम केले जाणार आहे. ऐनवेळी वाहनधारकांची गैससोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्वकल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या मुंबईहून पुण्याकडे किंवा पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

दोन तास सुरु राहणार काम

भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ नये म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत हे काम केले जाणार आहे. तर वाहनधारकांच्या निदर्शनास यावे म्हणून या मार्गावर गार्डही असणार आहेत. या दोन तासामध्ये ओव्हर हेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत होईल असा विश्वास प्रशासनाला आहे.

असा असणार पर्यायी मार्ग

दुरुस्तीच्या कामासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील वेवर किवळे ते सोमाटणे पर्यंतची वाहतूक ही बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर वळविण्यात येणार आहे. यामुळे वाहनधारकांची सोय होणार आहे. ऐन वेळची गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.