
मुंबईत पावसाला सुरूवात झाली असून त्याचा परिणाम मध्य रेल्वेवर दिसून येतोय. मध्य रेल्वेची लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या मुंबईकरांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळ्या आधी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत 134 इमारती ‘सी-1’ श्रेणीत अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वाधिक धोकादायक इमारती वांद्रे, खार, गोरेगाव, अंधेरी, घाटकोपर परिसरातील असल्याची माहीती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने काही रहिवाशांना नोटीस बजावली आहे, तर उर्वरित काही रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी इमारती रिकामी करण्यासाठी नोटीस बजावणार आहेत. या इमारती मधील काही रहिवासी स्थलांतरास नकार देत असून काहींनी न्यायालयात स्थगिती घेतली. नाशिक दर्गा अतिक्रमण दंगल प्रकरणी आठ दंगलखोरांचा जामीन फेटाळला . 39 दंगलखोर मध्यवर्ती कारागृहात असून चार जणांचा जामीन मंजूर तर एका संशयिताला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत 81.88 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली. विंध्यवासिनी ग्रुपचे प्रवर्तक विजय व अजय गुप्ता यांच्यावर 764 कोटींच्या फसवणुकीचा आरोप. मुख्य आरोपी विजय गुप्ताला मार्च 2025 मध्ये अटक झाली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
तुमच्याकडे शक्ती असेल तेव्हाच जगात प्रेमाची भाषा ऐकली जाते, असं व्यक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. जयपूरमधील कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलंय. शत्रूने हल्ला केल्यास भारताकडे उत्तर देण्याची ताकद आहे. तसेच विश्व शांतीसाठी ताकद गरजेची आहे. आपली ताकद जगाने पाहिली आहे, असंही भागवत यांनी नमूद केलं.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या यु्ट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्ताने ज्योतीला निमंत्रण देण्यात आलं होतं. ज्योतीला पाकिस्तानी दुतावासानं निमंत्रण दिलं होतं. तसेच ज्योतीला 2024 मध्ये रिसेप्शन आणि इफ्तारसाठीही निमंत्रण देण्यात आलं होतं. ज्योतीला हे निमंत्रण 28 मार्च2024 रोजी देण्यात आलं होतं.
मोठी बातमी समोर आली आहे. कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात 18 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. त्यामुळे साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात 26 आणि 27 जून रोजी सर्वात मोठी भरती येणार आहे. आपत्ती व्यव्यस्थापन विभागाकडून भरतीचं अंदाजपत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
बार्शीत चक्क न्यायाधीशाच्याच घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 15 तोळे सोने आणि रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील पाथरी गावात शुक्रवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला. शनिवारी पहाटे घटना उघडकीस आली. पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार पद्मिनी गायकवाड यांचे पुत्र हे वाशीम जिल्ह्यात न्यायदंडधिकारी आहेत. त्यांच्या बार्शीतल्या पाथरी येथे मुळगावी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आपल्या पत्नी आणि मुलासह आले होते.
धार्मिक कार्यक्रम संपवून ते कोल्हापूरला देवदर्शनासाठी जाताना त्यांच्या पत्नी आणि मुलांचे दागिने त्यांनी पाथरी येथील घरीच ठेवले होते. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी घरात शिरून बेडरूममध्ये ठेवलेले 15 तोळे सोने आणि रोख 5 हजार रुपये असे एकूण 12 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आई पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी बार्शी तालूका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय.
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे की त्यांचा देश अणुकार्यक्रमावर अमेरिकेशी चर्चा सुरू ठेवेल परंतु अमेरिकेच्या धमक्यांमुळे आपले अधिकार सोडणार नाही. शनिवारी नौदल अधिकाऱ्यांना संबोधित करताना अध्यक्ष पेझेश्कियान म्हणाले की, आम्ही वाटाघाटी करत आहोत आणि आम्ही वाटाघाटी करू, आम्हाला युद्ध नको आहे, परंतु आम्हाला कोणत्याही धोक्याची भीती वाटत नाही.
पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नाही. हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्दपर्यत उद्या ब्लॉक असेल. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्यानच्या जलद मार्गावर अप आणि डाऊन दिशेकडे ब्लॉक सकाळी 10.40 ते 3.40 पर्यत असेल
अमरावती महानगरपालिका भाजप एकट्याने लढवणार आहे. कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही नवनित राणा यांनी स्पष्ट केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर फक्त भगवा आणि भाजपचा झेंडा लागला पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक मुंबईतील शिवसेना भवनात होत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनेक खासदार आणि आमदार उपस्थित आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि कार्यकारिणीसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठक घेत आहेत.
इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी बुद्रुकमध्ये आज (बाजारपेठेच्या दिवशी) संतप्त महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे.
परभणीत सकाळपासून होतो ढगाळ वातावरण होते ,मात्र आता मान्सून पूर्व अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.हळद, भुईमूग काढणीला पावसामुळे ब्रेक लागणार आहे.
ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यात नंबर एक आहेत. शरद कुलकर्णी यांच्या ‘एव्हरेस्ट शिखर’ पुस्तकाचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
भारताला हव्या असणाऱ्या मोस्ट वॉंटेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार. हाफिस सईद, दाऊद आणि मसूद अजहर भारताला हवेत, पाककडे यादी जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दहशतवादी द्या आणि तुमची विश्वासनीयता सिद्ध करा असं सांगण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले ” पाकचे इरादे भारतीय लष्कराने हाणून पाडले.तसेच भारताने दहशतवादी तळही उद्धवस्त केले. पाकचा खरा चेहरा जगासमोर आणला जाईल. पाककडून दहशतवादाला पोसण्याचं काम करत आहे. दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका जगाला समजली पाहिजे” असं म्हणत शिंदेंनी पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला.
तर, भारत अमेरिकी वस्तूंवरील 100 टक्के आयात कर रद्द करायला तयार आहे. असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. भारतासोबत आयात कर लावून व्यापार करणे कठीण आहे. तसे भारतासोबत 0 टक्के टॅरिफ करण्याची घाई नसल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतून भारतात असणाऱ्या कुटुंबाला पाठवल्या जाणाऱ्या पैशांवर म्हणजे डॉलर्सवर आता 5 टक्के कर लागणार. त्यामुळे भारताला 14 हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला फटका देणारा हा निर्णय आहे.
गंगापूरमध्ये वाळू माफियांची गुंडगिरी सुरु होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
रायगडमध्ये ड्रोन, पॅराग्लायडिंगसह हवाई उपकरणांवर बंदी. 30 जूनपर्यंत हवाई उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव वाढला. 6 आणि 7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तान घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकने भारताविरोधात ड्रोन आणि मिसाईलने हल्ले केले. या हल्ल्यात भारताचे नुकसान झाल्याचा खोटा दावा पाकिस्तानने केला होता. आता, पाकिस्तानी पत्रकार मोईद पीरजादने पाकचे दावा खोडले आहेत.
रायगड जिल्ह्यात 17/05/25 ते 30/06/25 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर, लाइट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलूनसह हवाई उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ऑपरेशन सिंधू सुरक्षा अंतर्गत दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या आदेशाचं उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेनुसार कारवाई होणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला आहे.
अंधेरी पूर्वेकडील न्यू अंपायर इंडस्ट्रीजजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या, बीएमसीची टीम आली आहे आणि पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम करत आहे.
पुण्याच्या खेड तालुक्यातील आडगाव येथे 17 वर्षीय मुलीचा सर्पद्वंशाने मृत्यू झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार उपलब्ध न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. प्रांजल तुकाराम गोपाळे असे 17 वर्षीय मृत्य युवतीचे नाव आहे.
जसा आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केला होता तसाच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केला पाहिजे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. परळी म्हणजे आता दहशतीचा अड्डा झालेला आहे. याला आता अतिशय गंभीर ते ना घ्यायला हवं असं त्या म्हणाल्या. म्हणाल्या.
अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्यात मृग बहारातील संत्राचे उत्पादन घटणार आहे. विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. अमरावतीच्या वरुड-मोर्शी तालुक्यात संत्राचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जात. मे महिन्यात मशागत केल्यानंतर जून महिन्यातील पावसानंतर संत्राचं मृग बहार बहरतो. परंतु अवकाळी पावसामुळे फटका बसणार आहे.
कांद्याचा बाजार भावा पडल्यानंतर आता अस्मानी संकटाने शेतकरी कात्रीत अडकला आहे. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे शेतातील काढलेल्या कांद्याचा लाल चिखल झाला नुकसानीचे पंचनामे करून कांद्याला प्रति क्विंटल प्रमाणे दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
मी अलिकडच्या काळात पाहत आहे की मुलांवर लहानपणापासून संस्कार झालेच पाहिजे पण अनेकांची मुलं, सून मुली, जावई या परदेशात आहेत.. दुर्दैवाने हे लोक आपल्या आई-वडिलांना विसरून जातात परदेशात गेल्यानंतर आई किंवा वडील आपल्यातून निघून गेले तर ते व्हिडीओ कॉलवरून अंत्यविधीचा कार्यक्रम करतात हे दुर्दैव आहे. नाईलाजाने आता आम्हाला वृद्धाश्रम काढावे लागत आहेत हे खरच दुर्दैवी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
तिरंगा रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना आमदार मुटकुळे यांना चक्कर आली. आमदार मुटकुळे यांना हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई सेंट्रल स्थानकावर देशातील पहिले डिजिटल लाउंज उभारल्या जाणार आहे. विमानतळासारख्या सुविधा आता रेल्वे स्थानकात मिळतील. पश्चिम रेल्वेचा पायलट प्रकल्प म्हणून मुंबई सेंट्रल येथे देशातील पहिले डिजिटल लाउंज उभारले जाणार आहे.
२.७१ कोटी रुपये खर्चून १७१२ चौरस फुट जागेत ही सुविधा उभारली जात आहे.
उद्धव ठाकरेंनी मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंब्याचं पत्र देत असताना मी गंमतीने काढलेला व्हिडिओ आहे. तोही उपलब्ध आहे. आताची पोरंढोरं तेव्हा नव्हती. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आले आहेत. यांना काय माहीत भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते ते. मी गंमतीने उद्धव ठाकरेंना म्हणालो होते, उद्धवजी तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय बरं का, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. तेवढीच त्यांची लेव्हल आहे. बाकी काही नाही. त्यांनी पुस्तक वाचावं. सत्य स्वीकारावं. जशी त्यांनी ट्रम्पनी लादलेली युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतात. तसं त्यांनी पुस्तकातलं सत्य सांगावं, असा हल्ला राऊतांनी केला.
एकनाथ शिंदे हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांनी दिल्लीपर्यंत अटकेसंदर्भात बोलण्याची तयारी दाखवली. मी नाही म्हटलं. मी ठाम आहे. मी झुकणारा माणूस नाही. माझी मान जरी उडवली. सर्वांना माहीत आहे मी झुकणार नाही, असे त्यांना सांगितल्याची माहिती राऊतांनी दिली.
अब्दुलाह शेख आणि तल्लाह खान या दोन फरार आरोपीना एनआयए कडून करण्यात आली अटक… मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना करण्यात आली अटक… इंडोनेशियामधल्या जकार्तामध्ये अनेक महिन्यापासून दोन्ही आरोपी लपून बसले होते अशी एनआयएची माहिती… २ वर्षापासून पुण्याच्या आयएसआय मॉड्यूल प्रकरणात होते दोन्ही आरोपी फरार… दोन्ही आरोपींची माहिती देण्याऱ्यास तीन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते
माजी आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत घोडा यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.
मुंबईसह ठाणे ,पालघर मध्ये आज हलक्या सरी बरसल्या आहेत. तर काही भागात जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे… दिवसभर ढगाळ वातावरण राहणार.. सायंकाळी किंवा रात्री काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे…
मला अटक करुन सूड घ्या, असं आव्हान राऊतांनी शाहांना दिलं होतं. प्रवीण राऊत, सुजित पाटकरांवरील ईडी धाडीनं राऊतांचा संताप… ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट… ‘माझ्या आधी निकटवर्तीयांना त्रास देण्यात आला…’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
मुंबई विमानतळा आणि ताज बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा हा मेल आला आहे. संसद हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना अन्यायकारकरित्या फाशी दिल्याचा दावा या मेलमध्ये करण्यात आला आहे.
धमकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या असून धमकीचा मेल पाठवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन नेशन वन इलेक्शन संदर्भात लोकसभा सचिवालय समितीची आज संध्याकाळी 6 वाजता मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या समितीने अहवाल देऊन वन नेशन वन इलेक्शन संदर्भात महाराष्ट्रातील परिस्थितीची दिली होती माहिती.
लोकसभा सचिवालय समितीच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माथेरानसारख्या दुर्गम डोंगराळ भागात पोस्टाचं पार्सल पोहचवण्यासाठी आता ड्रोनचा वापर होणार आहे. महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग असून, कर्जतहून माथेरानला ड्रोनद्वारे पार्सल पोहचवण्यात यश आलंय. यामुळे दीड तासांचा वेळ वाचून अवघ्या 15 मिनिटांत सेवा मिळणार आहे.
एक देश एक निवडणूकची समिती आजपासून महाराष्ट्रात, या समितीमध्ये सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांचाही समावेश आहे. खासदार पीपी चौधरींच्या अध्यक्षतेखाली 31 खासदारांची ही समिती आहे.
धाराशिव : तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणी पोलीसांनी तुळजापूर तालुक्यातील कामठा येथून आरोपी शरद जमदाडे यास अटक केली आहे. तब्बल दीड महिन्यापासुन फरार असलेल्या शरद जमदाडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण ३६ आरोपी निष्पन्न आहेत. यातील 16आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून 20 आरोपी फरार आहेत.
पिंपरी चिंचवड – इंद्रायणी नदीच्या ब्लु लाईन मधील 29 बंगल्यावर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात. पहाटेपासूनच बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली आहे.
सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जात आहेत.
मुंबईत पावसाला सुरूवात झाली असून त्याचा परिणाम मध्य रेल्वेवर दिसून येतोय. मध्य रेल्वेची लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या मुंबईकरांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.