‘मी वर बोलू का?’ अटके आधी राज्यातील या बड्या नेत्याचा राऊतांना फोन, अजून एक मोठा गौप्यस्फोट, काय झाले पुढे
Sanjay Raut Big Reveals : संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे आज संध्याकाळी प्रकाशन होत आहे. त्यापूर्वीच या पुस्तकाने राज्य आणि देशातील राजकारणात धुराळा उडवून दिला आहे. या पुस्तकातील काही खास किस्स्यांनी राजकारण ढवळून निघाले आहे. आता अजून एक गौप्यस्फोट समोर आला आहे.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या लेखणीच्या विस्तावाने सध्या राज्यात जाळ उठला आहे. नरकातील स्वर्ग या त्यांच्या पुस्तकाचे आज संध्याकाळी प्रकाशन होत आहे. त्यापूर्वीच या पुस्तकाने राज्य आणि देशातील राजकारणात बॉम्ब टकाला आहे. पुस्तकातील दाव्यांनी, गौप्यस्फोटांनी वातावरण ढवळून निघाले आहे. आता या पुस्तकाच्या अनुषंगाने राऊतांनी अजून एक दावा केला आहे. त्यावरून आता शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. काय आहे तो दावा?
अटकेच्या आधी शिंदेंचा मला फोन
यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तर शिंदे यांनी अटकेपूर्वी आपल्याला फोन केला होता, असा गौप्यस्फोट केला होता. आम्ही कुठे म्हटलं आम्ही नरकात गेलो. नरकात तुम्ही गेलात, अशी टीका त्यांनी केली. या शिंदेंचा संबंध काय? अटकेच्या आधी आदल्या दिवशी शिंदेंचा मला फोन होता. अमित शाह यांच्याशी बोलू का म्हणून. मी म्हटलं, काही गरज नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.




नरक बघा, नरक कसा असतो. म्हटलं वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही. काही गरज नाही. मला उद्या अटक होतेय. मी उद्या तुरुंगात जातोय. मी पळून जाणार नाही. मी बोलू शकतो वर. तुम्ही बोलायची गरज नाही. मी समर्थ आहे, असा घटनाक्रम राऊतांनी पत्र परिषदेत सांगितला.
मी झुकणार नाही
एकनाथ शिंदे हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांनी दिल्लीपर्यंत अटकेसंदर्भात बोलण्याची तयारी दाखवली. मी नाही म्हटलं. मी ठाम आहे. मी झुकणारा माणूस नाही. माझी मान जरी उडवली. सर्वांना माहीत आहे मी झुकणार नाही, असे त्यांना सांगितल्याची माहिती राऊतांनी दिली.
हा तर बालसाहित्याचा अपमान
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या पुस्तकावर टीका करत एका वाक्यात विषय संपवला होता. मी बालसाहित्य वाचणं कधीचंच बंद केल्याचा त्यांचा सूर होता. त्यावर आज राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांच्या टिपण्णीवर हा बालसाहित्याचा अपमान आहे. सरकार पुरस्कार देतं बालसाहित्याला. साहित्य अकादमी पुरस्कार देतं. ज्ञानपीठ पुरस्कार देतं. यांना माहिती आहे का, असा पलटवार राऊतांनी केला.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. तेवढीच त्यांची लेव्हल आहे. बाकी काही नाही. त्यांनी पुस्तक वाचावं. सत्य स्वीकारावं. जशी त्यांनी ट्रम्पनी लादलेली युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतात. तसं त्यांनी पुस्तकातलं सत्य सांगावं, असा हल्ला राऊतांनी केला.