AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धवजी… तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय… संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?

Sanjay Raut Big Statement : खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाने प्रकाशनापूर्वीच राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. एकाहून एक दावे, प्रतिदावे, गौप्यस्फोट बाहेर येत आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच त्यांनी पंतप्रधानांविषयीचा एक मोठा दावा केला आहे.

उद्धवजी... तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय... संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?
संजय राऊत, उद्धव ठाकरेImage Credit source: गुगल
| Updated on: May 17, 2025 | 11:12 AM
Share

खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे आज संध्याकाळी प्रकाशन होत आहे. त्यापूर्वीच या पुस्तकाने राजकारणात धुराळा उडवून दिला आहे. या पुस्तकाने एकाहून एक दावे, प्रतिदावे, गौप्यस्फोट बाहेर येत आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राऊत यांनी पत्र परिषदेत आरोपांची पुन्हा राळ उडवून दिली. इतकेच नाही तर त्यांनी अजून काही गौप्यस्फोट केले. त्यावरून नवीन वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यातच त्यांनी पंतप्रधानांविषयीचा एक मोठा दावा केला आहे.

तुम्ही देशाचा पंतप्रधान नियुक्त करताय

यावेळी संजय राऊत यांनी मोदी यांच्या पंतप्रधान होण्यामागील एक किस्सा सांगितला. “नेस्को ग्राऊंडच्या कार्यक्रमानंतर मोदी गुजरात मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा मीच होतो तिथे. आताचे भाजपचे लोक नव्हते. मोदी, बाळासाहेब आणि संजय राऊत असा फोटो आहे. पुरावे खूप आहेत. उद्धव ठाकरेंनी मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंब्याचं पत्र देत असताना मी गंमतीने काढलेला व्हिडिओ आहे. तोही उपलब्ध आहे. आताची पोरंढोरं तेव्हा नव्हती. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आले आहेत. यांना काय माहीत भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते ते. मी गंमतीने उद्धव ठाकरेंना म्हणालो होते, उद्धवजी तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय बरं का. उद्धवजी म्हणाले, हो हो, अरे बाबा नरेंद्र भाईंना आपण कधी तरी सांगायला पाहिजे मी अशी अशी सही केली तुमच्या पत्रावर” अशी माहिती राऊतांनी आज झालेल्या पत्र परिषदेत दिली.

शाह आल्यापासून सेना-भाजपात दरी

शिवसेना आणि भाजपात सलोख्याचे संबंध होते. पण अमित शाह हे जसे दिल्लीत आले, तेव्हापासून शिवसेना आणि भाजपामध्ये दरी वाढल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. यापूर्वी सुद्धा राऊतांनी युती तुटण्यामागे अमित शाह असल्याचा आरोप केला होता. राऊत सातत्याने शाह यांच्यावर आरोप करत आहे. आताही त्यांनी शाह यांना आपण फोन करून आपल्याला अटक करा असे सांगितल्याची माहिती दिली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...