AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 12 May 2025 : पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार

| Edited By: | Updated on: May 13, 2025 | 7:58 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 12 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 12 May 2025 : पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार
live breaking

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज बैठक होत आहे. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून येणारे संशयास्पद ड्रोन दिसले आहेत. त्यानंतर प्रशासनाने कडक बंदोबस्त लागू केला आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणीगणना कार्यक्रमाचे आयोजन आज राज्यातील अनेक ठिकाणी करण्यात आले आहे. नैऋत्य मान्सून यंदा वेळेआधीच येणार आहे. अंदमान निकोबार बेटावर मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या कायमस्वरूपी बंद केल्या आहेत. वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 5000 हजार शहाळ्याचा महानैवेद्य दाखवण्यात आले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 May 2025 05:58 PM (IST)

    युद्ध हा बॉलिवूड चित्रपट नाही, कुटनिती ही पहिली पसंती आहे: माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे

    भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्याच्या निर्णयावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी टीका केली आहे. त्यांनी सांगितलं की युद्ध हे रोमँटिक नाही आणि ते बॉलिवूड चित्रपटही नाही.

  • 12 May 2025 05:40 PM (IST)

    पाकिस्तानी गोळीबारामुळे पलायन केलेले लोकं आता परत येऊ शकतात: ओमर अब्दुल्ला

    जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी सांगितले की, पाकिस्तानी गोळीबारामुळे घरे सोडून गेलेले लोक आता परत येऊ शकतात. आता दोन्ही देशांमध्ये लष्करी करार झाला आहे.

  • 12 May 2025 05:32 PM (IST)

    पाकिस्तानचे सैन्य हे भित्रे सैन्य आहे, त्यांनी मानवतेची हत्या केली – भाजप नेते रविंदर रैना

    भाजप नेते रविंदर रैना म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य हे भित्रे सैन्य आहे. जेव्हा सीमेवर परिस्थिती तापली होती, तेव्हा पाकिस्तानी सैन्याने आमच्या शहरी भागांना, गावांना लक्ष्य केले आणि पूंछमध्ये आम्ही पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारात नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचे पाहिले. गुरुद्वारांमध्ये नमाज अदा करणाऱ्या ग्रंथींना, मशिदींमधील मौलवींना आणि सामान्य लोकांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानने मानवतेची हत्या केली आहे.

  • 12 May 2025 05:11 PM (IST)

    भाजप सरकार दिल्लीत वीज दर वाढवणार आहे- आप

    आम आदमी पक्षाचे नेते आणि कोंडलीचे आमदार कुलदीप कुमार यांनी दिल्ली सरकारवर महागाई वाढवण्याचा आरोप केला आहे. कुलदीप कुमार म्हणाले की, दिल्लीत भाजपचे चार इंजिन सरकार सत्तेत आहे. दिल्लीत भाजप सरकार स्थापन झाल्यापासून ते एकामागून एक भेटवस्तू देत आहे. दिल्लीतील लोकांना 300 युनिट मोफत देण्याऐवजी, भाजप सरकार विजेचे दर वाढवणार आहे.

  • 12 May 2025 05:00 PM (IST)

    ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे पहिले भाषण, आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार

    भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करतील. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे हे पहिलेच भाषण असेल. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध तणाव सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी सतत सक्रिय आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर तो सतत बैठका घेत होता. तो सतत लष्करप्रमुख, सीडीएस, एनएसए यांच्याकडून ऑपरेशनचा आढावा घेत होते.

  • 12 May 2025 04:04 PM (IST)

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गुटखा विकणाऱ्या दोन तरुणांना अटक

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गुटखा विकणाऱ्या दोन तरुणांना बेड्या

    जीशान खान व सोहेल खान अशी आरोपींची नावे;

    ८ हजार रुपयांचा गुटखा जप्त

    पोलिसांच्या गस्तीदरम्यान दोघे गुटखा विकताना सापडले, दोघांनाही अटक

  • 12 May 2025 03:55 PM (IST)

    नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं, सलग पाचव्या दिवशी पाऊस

    नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं

    सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाचा कहर

    आठवड्याभरापासून सातपुड्यात तुफान पाऊस

    अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात नद्यांना पूर

    पावसामुळे उडाली नागरिकांची तारांबळ

  • 12 May 2025 01:56 PM (IST)

    ‘हा निर्णय घेणं सोपं नव्हतं…’; कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याबद्दल विराटच्या भावना

    विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.विराटने याबाबत म्हटलं ” कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेणं सोपा नव्हता. पण निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे.” असं म्हणत त्याने त्याच्या निर्णयाबद्दल मत व्यक्त केलं आहे.

  • 12 May 2025 01:34 PM (IST)

    ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्त्रोची महत्त्वाची भूमिका; 10 उपग्रहांची पाकिस्तानच्या हालचालींवर नजर

    ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्त्रोची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. पाकिस्तानच्या हालचालींवर इस्त्रोच्या 10 उपग्रहांची नजर आहे. भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचाली टिपल्या आहेत.

  • 12 May 2025 01:14 PM (IST)

    भारत-पाकच्या डीजीएमओंची गेल्या तासाभरापासून चर्चा सुरु

    भारत-पाकच्या डीजीएमओंची गेल्या तासाभरापासून चर्चा सुरु आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्लाह यांनी फोन करून युद्धविरामचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

  • 12 May 2025 11:51 AM (IST)

    विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

    विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं सोप नव्हतं असं विराट कोहलीने म्हटलय.

  • 12 May 2025 11:50 AM (IST)

    राज्य लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा 2023 चा निकाल जाहीर

    सोलापूरची वैष्णवी गायकवाड ही मुलींमध्ये राज्यात प्रथम आलीय. वैष्णवी गायकवाडने कोणत्याही क्लासशिवाय हे यश संपादन केलय. एका सर्वसामान्य शिक्षकाची मुलगी क्लास वन अधिकारी झाल्याने वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर तिने हे यश संपादन केलय.

  • 12 May 2025 11:49 AM (IST)

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब !

    अजित पवार- सुप्रिया सुळे एकत्र येण्याच्या चर्चा. ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळे यांना लिहलं पत्र. पत्रातून कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 14 तारखेला होणाऱ्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत अंकुश काकडे कार्यकर्त्यांची भावना मांडणार.

  • 12 May 2025 11:35 AM (IST)

    तुर्कीच्या सफरचंदावर बॅन

    पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. तुर्कीच्या सफरचंदावर बॅन तुर्की म्हणत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात १० किलो सफरचंदामागे २०० ते ३०० रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो २० ते ३० रुपये दराने वाढ झाली आहे.

  • 12 May 2025 11:34 AM (IST)

    सी सिक्सटी कमांडो आणि माओवादी यांच्यात चकमक

    गडचिरोली पोलीस दलाचे सी सिक्सटी कमांडो आणि माओवादी यांच्यात चकमक झाली आहे. भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या अबूजमाडच्या जंगलात सी सिक्सटीच्या जवानांचं ऑपरेशन सुरू असताना माओवाद्यांनी गोळीबार केला. जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर त्या ठिकाणी चकमक झाली. माओवादी पळून गेले.

  • 12 May 2025 10:59 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शरद पवारांच्या भेटीला

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. पवारांच्या भेटीसाठी नितीन गडकरी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. या दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा होत असल्याची माहिती आहे.

  • 12 May 2025 10:55 AM (IST)

    मंत्री नरहरी झिरवळ गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयात

    मंत्री नरहरी झिरवळ गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयात आहेत. किडनीच्या आजारामुळे झिरवळांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती झिरवळांच्या कार्यालयाने दिली.

  • 12 May 2025 10:45 AM (IST)

    भारत-पाक शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी

    भारत-पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी पहायला मिळत आहे. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 2200 अंकांनी वधारला आहे.

  • 12 May 2025 10:37 AM (IST)

    पुणे- राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर पुण्यात गुन्हा दाखल

    अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी असलेल्या शांतनु कुकडेला पुणे पोलीसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी शांतनु कुकडेच्या बॅंक खात्यांची पडताळणी केली असता कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले.

  • 12 May 2025 10:24 AM (IST)

    भारतीय DGMO पत्रकार परिषद घेणार

    भारतीय DGMO पत्रकार परिषद घेणार आहेत. डीजीएमओसोबत नौदल, वायुदलाचे अधिकारीही असणार आहेत.

  • 12 May 2025 10:15 AM (IST)

    जळगावच्या धरणगावात शिवसेनेच्या वतीने काढण्यात आली भव्य तिरंगा रॅली

    जळगावच्या धरणगावात शिवसेनेच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून सीमेवर सुरू असलेल्या संघर्षात भारतीय सैनिकांनी बजावलेल्या शौर्याला वंदन केलं. याप्रसंगी विविध देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमल्याचं दिसून आलं. रॅलीत भव्य राष्ट्रध्वजासह शेकडो नागरिक सहभागी झाले.

  • 12 May 2025 10:06 AM (IST)

    पिंपरी चिंचवड- मध्यरात्री भर रस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने वार

    पिंपरी चिंचवड- मध्यरात्री भर रस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करत अज्ञात आरोपींनी हत्या केली. पिंपरी चिंचवड शहरातील वालेकरवाडी इथं एका अठरा वर्षांच्या तरुणीची हत्या करण्यात आली. या घटनेत कोमल भरत जाधव या 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • 12 May 2025 09:55 AM (IST)

    राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर पुण्यात गुन्हा दाखल

    अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभुल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 12 May 2025 09:44 AM (IST)

    भारताने फायटर जेट पाडल्याची पाकची कबुली

    भारताने आपलं एक फायटर विमान पाडल्याची कबुली पाकिस्तानी सैन्य दलाने दिली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत इंडियन एअर फोर्सने ही कारवाई करण्यात आली होती.

  • 12 May 2025 09:27 AM (IST)

     सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने यांची निवड

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची बिनविरोध निवड झाली आहे.  तर उपसभापतीपदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड.  सभापती आणि उपसभापतीपदाची निवड बिनविरोध जाहीर झाली.

  • 12 May 2025 09:10 AM (IST)

    नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन

    नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन झालं आहे.  नाशिकच्या मखमलाबाद परिसरात बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  ओंकार पिंगळे यांच्या घरासमोरून बिबट्या फिरत असल्याचं दृश्य दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाने पिंजरा लावावा अशी नागरिकांची मागणी आहे.  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन होतंय.

  • 12 May 2025 08:56 AM (IST)

    सिद्धेश्वर तलावात मृत माशांचा खच

    ठाणे येथील सिद्धेश्वर तलावात प्रदूषणामुळे पुन्हा एकदा मृत माशांचा खच पडला आहे. गेल्या 15 दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे तलावातील जलपर्णीसह प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी वस्तीमधून येणाऱ्या सांडपाण्याला पर्याय व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • 12 May 2025 08:44 AM (IST)

    येऊरमध्ये आज वन्य प्राण्यांची गणना

    ठाणे येथील येऊरमध्ये आज वन्य प्राण्यांची गणना वन विभागाकडून करण्यात येणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री सोमवारी येऊर जंगलात वन्य प्राणी गणना होणार आहे. मचान बांधून वन्य प्राण्यांची गणना वनविभाग परिक्षेत्र वनाधिकारी करणार आहे.

  • 12 May 2025 08:31 AM (IST)

    ठाण्यात मॉक ड्रिल

    केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑपरेशन अभ्यास अंतर्गत ठाण्यात मॉक ड्रिल करण्यात आले. ठाण्यातील लोढा अमारा कोलशेत मैदानावर यशस्वीरित्या पार पडले. सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात झाली.

  • 12 May 2025 08:17 AM (IST)

    नवनीत राणा यांना धमकी

    भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. हिंदू शेरनी, हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान, जल्दी उडाने है वाले है. या पद्धतीची धमकी नवनीत राणा यांना आली आहे.

  • 12 May 2025 08:07 AM (IST)

    वडपे येथील गोदामास भीषण आग

    भिवंडी तालुक्यातील वडपे येथील रिचलँड कॉम्प्लेक्समधील गोदामास भीषण आग लागली आहे. या गोदामात कपडे ,मेडिकल सामान, केमिकल, सप्लिमेंट, इलेक्ट्रॉनिकसचा मोठा साठा आहे. घटनास्थळी भिवंडी सोबत कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आहे.

  • 12 May 2025 07:59 AM (IST)

    बाडमेरमध्ये ब्लॅकआऊट

    राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून येणारे संशयास्पद ड्रोन दिसले आहेत. त्यानंतर ब्लॅकआऊट करण्यात आले. ११ मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवार सकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॅकआउट घोषित करण्यात आले आहे होते.

Published On - May 12,2025 7:56 AM

Follow us
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.