AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : नागपूर: जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

| Edited By: | Updated on: Sep 18, 2025 | 7:56 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : नागपूर:  जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक
Breaking News

Maharashtra Breaking News LIVE : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 व्या वाढदिवस असून ते मध्यप्रदेशच्या दाैऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. लोक त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा जीआर सरकारने काढल्यानंतर अनेक समाज हे रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या जीआरवर आक्षेप घेतलाय. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस राज्यात कोसळताना दिसत असून बऱ्याच भागात भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केले आहेत. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Sep 2025 07:55 PM (IST)

    नागपूर: जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

    जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 सप्टेंबर रोजी धान्य व्यापाऱ्यावर गोळीबार करून 50 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. या कारवाईत चार आरोपींना अटक करून तब्बल 21.11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • 17 Sep 2025 07:43 PM (IST)

    पांणद रस्त्यांच्या मॅपिंगची माहिती ऑनलाईन मिळणार – मुख्यमंत्री

    पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्यानिमित्त पांणद रस्त्यांचे मॅपिंग आणि इतर योजना आम्ही ऑनलाईन पध्दतीने देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

  • 17 Sep 2025 07:34 PM (IST)

    मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान…

    मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अशाप्रकारची घटना ही निषेधार्य आहे. ज्या कुठल्या समाज कंटकांनी हे कृत्य केलं आहे, त्याला पोलिस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं मला योग्य वाटत नाही.’

  • 17 Sep 2025 07:15 PM (IST)

    शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

    आज पहाटे दादरच्या शिवाजी पार्क येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकला. या घटनेचा शिवसैनिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 17 Sep 2025 07:00 PM (IST)

    चंद्रपूरात क्लोरीन गॅस गळती घबराट

    चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात असलेल्या महानगरपालिकेच्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीनची गॅस गळती झाली आहे. प्लांटच्या जवळपास असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात डोळे आणि घशात जळजळ,डोकेदुखी आणि उलटीचा त्रास झाल्याने 25 ते 30 घरातील लोकांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.

  • 17 Sep 2025 06:54 PM (IST)

    शिवाजी पार्क परिसरात फॉरेंसिक एक्सपर्टची टीम दाखल

    स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकल्याचा प्रकार पहाटे घडला होता.फेकलेल्या रंगाचे ५ सँपल गोळा करण्याचे काम सुरू असून जमिनीवर, चौथऱ्याचे, पुतळ्यावरचे काही नमूने फॉरेंसिक एक्सपर्टच्या हस्तगत केले आहेत.

  • 17 Sep 2025 06:37 PM (IST)

    धनगर आंदोलक बोराडे यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी घेतली भेट

    भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची भेट घेतली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा आणि तात्काळ प्रमाणपत्राची वाटप करावी या मागणीसाठी आजपासून दीपक बोराडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

  • 17 Sep 2025 06:22 PM (IST)

    महायुतीला लाडक्या बहिणी कौल देतील – रूपाली चाकणकर

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणी कौल देतील असा विश्वास राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे. चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.

  • 17 Sep 2025 06:11 PM (IST)

    पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव द्यावा – डॉक्टर शोभा बच्छाव

    पंतप्रधानांनी धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव द्यावा याच वाढदिवसानिमित्त माफक अपेक्षा असल्याचे डॉक्टर शोभा बच्छाव यांनी म्हटले आहे. धुळे जिल्ह्यातील मनमाड इंदोर रेल्वे मार्ग या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी तरी पूर्ण व्हावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.

  • 17 Sep 2025 05:56 PM (IST)

    मंत्री गिरीश महाजन नाशिक महानगरपालिका मुख्यालयात दाखल

    मंत्री गिरीश महाजन नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत. महाजन पालिका मुख्यालयात शहरातील विविध नागरी समस्यांचा आढावा घेणार आहेत.

  • 17 Sep 2025 05:50 PM (IST)

    राज्यातील तरुण आणि पर्यटकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील 7500 युवांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ आणि पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ 5 ठिकाणी उभारण्यात येणार आहे.

    ‘नमो पर्यटन’ उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देत, जागतिक पर्यटकांना आकर्षित करेल. हा उपक्रम महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रातील नवा मैलाचा दगड ठरणार असून हा उपक्रम प्रधानमंत्री यांच्या सर्वसमावेशक आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • 17 Sep 2025 05:32 PM (IST)

    पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या भावात घसरण

    पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या भावात घसरण झाली आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने टोमॅटोचे बाजार भाव कोसळले. गेल्या महिन्यात सातशे ते आठशे रुपये वीस किलोच्या क्रेट्सला बाजार भाव मिळत होता. मात्र आता या दरात शंभर ते दीडशे रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.

  • 17 Sep 2025 05:24 PM (IST)

    उमेश पाटील जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडावं म्हणून आक्रमक

    जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. उमेश पाटील जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडावं म्हणून आक्रमक झाले आहेत. उन्मेष पाटील यांनी पोलिसांना फडणवीस यांचे भाड्याचे तट्टू म्हणत संताप व्यक्त केला. तसेच यावेळेस शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्यासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 17 Sep 2025 05:19 PM (IST)

    पंकजा मुंडे रेल्वे सेवेच्या शुभारंभानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काय म्हणाल्या?

    बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेच्या शुभारंभानंतर पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण सांगितली. तसेच खासदार बजरंग सोनवनणे यांच्या टीकेवरही मिश्किल टिप्पणी केली.

    “बीड रेल्वे सुरू करणं हे गोपीनाथ मुंडे यांचे केवळ स्वप्न नव्हे तर त्यांचा संघर्ष होता. गोपीनाथ मुंडे यांनी बीड रेल्वेसाठी खऱ्या अर्थाने कष्ट घेतले. रेल्वेसाठी कष्ट प्रितम मुंडे यांनी केले. मात्र त्याचा लाभ दुसऱ्याला मिळाला. अर्थात काम कोणीही केले तरी काही गोष्टी नशिबाच्या असतात. आम्ही प्रितम मुंडे यांना आज मीस करतोय, कारण त्यांनी 10 वर्षे यासाठी कष्ट घेतले होते. आमच्यात कोणतेही गट तट नाहीत. मात्र दुसऱ्या पक्षातील लोक ते घोषणाबाजी करतात. अर्थात त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा आहे. विकासासाठी आम्ही एकत्र काम करतोय त्यात कुठेही राजकारण आणणार नाही”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

  • 17 Sep 2025 04:54 PM (IST)

    आरक्षणाच्या मागणीसाठी चाळीसगावमध्ये बंजारा समाजाचा एल्गार

    एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी चाळीसगावमध्ये बंजारा समाजाने एल्गार पुकारला आहे. हैदराबादप्रमाणे गॅझेट मागणीसाठी चाळीसगावमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पारंपरिक वेशभूषेत महिलांसह हजारोंच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती.  मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आणखी मोठा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

  • 17 Sep 2025 04:36 PM (IST)

    हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधान

    भाजप खासदार कंगना राणौत हिमाचल आपत्तीबद्दल म्हणाल्या, “हे खूप दुःखद आहे. सर्वत्र लोक आपत्तीचा सामना करत आहेत. आज आम्ही येथे यज्ञ आयोजित केला. संतांनी जगाच्या कल्याणासाठी देव-देवतांचे आवाहन केले आहे. मंडी परिसरातील कामांबाबत मी गृहमंत्र्यांशी भेटलो. आम्ही मंडीच्या प्रकल्पांवर दिवसरात्र काम करत आहोत. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहोत.”

  • 17 Sep 2025 04:28 PM (IST)

    मनोज जरांगे पाटलांचा चलो दिल्लीचा नारा

    मनोज जरांगे पाटलांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार आहेत.  हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट अंमलबजावणीनंतर अधिवेशन होणार आहे.  लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर केली जाईल. धाराशिवमधील हैद्राबाद गॅझेट संदर्भातील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी ही घोषणा केली.

  • 17 Sep 2025 04:07 PM (IST)

    भारत-अमेरिका संरक्षण प्रतिनिधी मंडळाची चर्चा: 6 अतिरिक्त P-8I विमानांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता

    भारत आणि अमेरिका यांच्यात आज संरक्षण प्रतिनिधी मंडळाची चर्चा होणार आहे. पी-8आय बाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. उच्चस्तरीय अमेरिकन संरक्षण प्रतिनिधी मंडळ सहा अतिरिक्त बोईंग पी-8आय सागरी देखरेख विमानांसाठी 4 अब्ज डॉलर्सच्या कराराला पुढे नेईल असे सूत्रांनी सांगितले.

  • 17 Sep 2025 03:58 PM (IST)

    नांदेडच्या मुखेडमध्ये भीषण अपघात, आठ जखमी

    नांदेडच्या मुखेड शहरातील बाराहाळी नाका येथे भीषण अपघात

    ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने उभ्या काळी पिवळी जीपला दिली धडक

    रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटरसायकलही चिरडल्या

    अपघातात सात ते आठ जण जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती

    जखमींवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

  • 17 Sep 2025 03:39 PM (IST)

    कुणबी प्रमाणपत्र लाभार्थ्यांनी मानले जरांगे पाटलांचे आभार

    परभणीमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या लाभार्थ्यांकडून जरांगे पाटलांचे आभार मानण्यात आले आहेत.  मोठ्या संघर्षानंतर कुणबी प्रमाणपत्र मिळाले असल्याने समाधान वाटत असल्याची भावना यावेळी लाभार्थ्यांनी व्यक्त केली. हे प्रमाणपत्र मुलांचं शिक्षण आणि भविष्यासाठी उपयोगी येईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

  • 17 Sep 2025 03:16 PM (IST)

    गडचिरोलीत माओवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक, दोन माओवादी ठार

    गडचिरोलीत माओवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक

    चकमकीत दोन महिला माओवाद ठार

    घटनास्थळावरून एके 47 रायफल जप्त

    छत्तीसगडच्या सीमावरती भागातही माओवाद्यांचा पोलिसांकडून शोध

    नक्षल विरोधी पोलीस पथकाच्या पाच तुकड्या आणि सीआरपीएफ पोलिसांची संयुक्त कारवाई

  • 17 Sep 2025 02:59 PM (IST)

    2014 साली मुंडे साहेबांचे स्वन पूर्ण करण्याचा आम्ही संकल्प केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    बीड अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडकरांशी संवाद साधला. ते म्हणाले “2014 साली मुंडे साहेबांचे स्वन पूर्ण करण्याचा आम्ही संकल्प केला. त्यासाठी वॉर रूम तयार केली. तसेच रेल्वेला देखील आपण पैसे दिले. रेल्वे सुरु करणे हे अवघड काम नव्हते तर त्यासाठी लागणारे भूसंपादन हे होते. 2019 साली रेल्वे प्रकल्पला निधी द्यायचा नाही असा निर्णय त्या सरकारने घेतला पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्व प्रकल्पला निधी देण्याचा निर्णय घेतला आणि कामं सुरु केले. तसेच 10 वर्षात मराठवाड्यातील रेल्वेसाठी 21 हजार कोटी दिले.” असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच मत व्यक्त केलं.

  • 17 Sep 2025 02:45 PM (IST)

    या कामासाठी एक पिढी गेली, एवढा वेळ का लागला? बीड अहिल्यानगर रेल्वेबाबत अजित पवारांचा सवाल

    बीड अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ झाला आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. अजित पवारांनी याबाबत नागरिकांशी संवाद साधला. तसेच अजित पवारांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. अजित पवार म्हणाले “आजचा दिवस बीड-अहिल्यानगरकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. जानेवारी 2026 पर्यंत प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. ही संतांची भूमी विकासाकडे वाटचाल करतेय. बीड अहिल्यानगर रेल्वेचं काम पूर्ण होण्यासाठी एक पिढी गेली. एवढा वेळ का लागला? बीडकरांनी आत्मचिंतन करणे गरजेचं आहे.”

  • 17 Sep 2025 02:30 PM (IST)

    अजितदादांनी बारामतीसारखा बीडला निधी द्यावा – पंकजा मुंडे

    बीड अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ झाला आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. तसेच यावेळी पंकजा मुंडे यांनी बीडकरांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “अजितदादा बीडचे पालकमंत्री तसेच ते वित्तमंत्रीही आहेत. मुंबई-पुण्यात राजकरण वेगळं आहे . अजितदादांनी बारामतीसारखा बीडला निधी द्यावा. अजितदादा कार्यक्रमाला नेहमी लवकर उपस्थित राहतात आजही ते लवकर आले. मी ही अजितदादांप्रमाणे आज सकाळी लवकर दौरा केला.”

  • 17 Sep 2025 02:13 PM (IST)

    रेल्वे सेवेचा शुभारंभ; आजपासून बीड ते अहिल्यानगर रेल्वे धावणार

    बीड अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ झाला आहे. आजपासून बीड ते अहिल्यानदर रेल्वे धावणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. 2015 साली 292 कोटी रुपये रेल्वेसाठी दिले असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

  • 17 Sep 2025 01:59 PM (IST)

    मुख्यमंत्री दानशूर आहेत – बजरंग सोनावणे

    “आगामी काळात सोलापूर ते संभाजीनगर रेल्वेसेवेसाठी कामं करणार आहे. नागपूरसाठी धडाकेबाज मुख्यमंत्री यांनी बीड जिल्ह्यासाठी काम करावे.मुख्यमंत्री दानशूर आहेत” असं बजरंग सोनावणे म्हणाले.

  • 17 Sep 2025 01:52 PM (IST)

    बीड रेल्वे कृती समितीच्या लढ्याला यश – बजरंग सोनावणे

    “बीड रेल्वे कृती समितीच्या लढ्याला यश मिळाले. 50 वर्षांपासून बीड जिल्हा रेल्वेची मागणी करत होता. आज या सर्वानी दिलेल्या लढ्याचे यश आहे” असं खासदार बजरंग सोनावणे म्हणाले.

  • 17 Sep 2025 01:33 PM (IST)

    कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान द्या

    कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान द्या एकमताने टाळ्या वाजवत ठराव मंजूर. येवला तालुक्यातील सोमठाणा देश ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने मांडला होता ठराव. ठरावाची प्रत राज्य सरकारला पाठवणार.

  • 17 Sep 2025 01:15 PM (IST)

    ओबीसी बांधवांच्या एल्गार मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार

    ओबीसी बांधवांच्या एल्गार मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात कळमनुरी शहरातून थोड्याच वेळात यलगार मोर्चाला सुरुवात होणार. मराठा आरक्षणासंदर्भात निघालेला जीआर रद्द करा या सह विविध मागण्यासाठी एल्गार मोर्चाचे आयोजन.

  • 17 Sep 2025 12:55 PM (IST)

    धाराशिवमध्ये जरांगे पाटील, प्रताप सरनाईकांच्या हस्ते स्वराज्य ध्वज स्तंभाचं भूमिपूजन

    धाराशिव शहरात मनोज जरांगे पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते स्वराज्य ध्वज स्तंभाचं भूमिपूजन पार पडलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात 151 फुटी स्वराज्य स्तंभाचं भूमिपूजन करण्यात आलं. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या कार्यक्रमानिमित्त मोठी गर्दी झाली.

  • 17 Sep 2025 12:45 PM (IST)

    मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी अंबादास दानवेंची टीका

    “कोण्या माथेफिरुणे माँ साहेबाच्या पुतळ्यासोबत असं कृत्य करणं हे निषेधार्थ आहे आणि पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सांगणारे नसून अमित शहा यांचा विचार सांगणारे आहेत. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचा फोटो नाव आणि मतापुरता, स्वार्थापुरता वापरतात, बाकी त्यांना अस्मिता आणि स्वाभिमान नाही,” अशी टीका अंबादास दानवेंनी केली.

  • 17 Sep 2025 12:30 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेच्या उद्घाटनासाठी हेलीकॉप्टरने बीडमध्ये दाखल

    बीड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेच्या उद्घाटनासाठी हेलीकॉप्टरने बीडमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते बीडच्या रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार रेल्वे स्थानकावर पोहोचले असून अनेक लोकप्रतिनिधीसुद्धा दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रेल्वे बीडहून अहिल्यानगरकडे जाणार आहे.

  • 17 Sep 2025 12:20 PM (IST)

    पुण्यात पीएचडी संशोधक फेलोशिप न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन

    पुण्यात पीएचडी संशोधक फेलोशिप न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय. तीन दिवसांपासून पुण्यातील गुडलक चौकात हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भेट देणार आहेत. नवीन नियमांमुळे प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देणे, फेलोशिप प्रक्रियेला तीन महिन्यात पूर्ण करणे, शिष्यवृत्ती रकमेची वाढ आणि अमृत संशोधन योजनेत पीएचडी विद्यार्थ्यांचा समावेश करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

  • 17 Sep 2025 12:10 PM (IST)

    वाशिमच्या मानोरा इथं बंजारा समाजाचा मोर्चा

    वाशिमच्या मानोरा इथं बंजारा समाजाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोहरादेवीचे महंत संजय महाराज, सुनील महाराज, अनिल राठोड उपस्थित आहेत.

  • 17 Sep 2025 12:03 PM (IST)

    कोकाटे मानहानीप्रकरणी रोहित पवार यांच्यावर नाशिक न्यायालयात याचिका दाखल

    नाशिक –  कोकाटे मानहानीप्रकरणी रोहित पवार यांच्यावर नाशिक न्यायालयात याचिका दाखल, 24 सप्टेंबरला पहिली सुनावणी होणार आहे.  माणिकराव कोकाटे यांना त्यावेळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत म्हणणे ऐकून घेणार.

    रमी प्रकरणात कोकाटे यांची बदनामी झाली होती , त्यांना कृषिमंत्री पद सोडावे लागले होते.

  • 17 Sep 2025 11:38 AM (IST)

    धाराशिव शहरात मनोज जरांगे पाटील दाखल

    धाराशिव शहरात मनोज जरांगे पाटील दाखल झाले असून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. क्रेनच्या साह्याने हार घालून ढोल पथकाने जरांगे यांना सलामी दिली.

  • 17 Sep 2025 11:15 AM (IST)

    मुंबई – मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला

    मुंबईतील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. लाल रंग फेकणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, रंग का फेकला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

  • 17 Sep 2025 11:09 AM (IST)

    बीड – मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या कवडे नामक व्यक्तीच्या कुटूंबाला अजित पवार यांच्या हस्ते 10 लाखाची मदत

    बीड :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या कवडे नामक व्यक्तीच्या कुटूंबाला 10 लाखाची मदत देण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित , नारायण गडाचे प्रमुख शिवाजी महाराज व्यासपीठावर उपस्थित होते.

  • 17 Sep 2025 10:58 AM (IST)

    नवी मुंबईत मोठा चिटफंड घोटाळा, १.४८ कोटी रुपयांची फसवणूक

    नवी मुंबईत उघडकीस आलेल्या एका मोठ्या चिटफंड घोटाळ्यात गुंतवणूकदारांची १.४८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. गुंतवणूक केलेल्या रकमेवर ९% व्याज देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी ३६ जणांची १ कोटी ४८ लाख ५० हजार ९६० रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी, रबाळे पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणि एकूण फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रबाळे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

  • 17 Sep 2025 10:49 AM (IST)

    मराठ्यांना अजून मुक्ती मिळणं बाकी – मनोज जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की मराठवाड्याला जरी मुक्ती मिळाली असली तरी मराठ्यांना अजून मुक्ती मिळणं बाकी आहे. आज ज्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे, त्यांनी प्रमाणपत्र घेऊन अंतरवाली सराटी येथे यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. प्रमाणपत्राची खात्री करूनच सरकारचा पुढील निर्णय कळेल असेही ते म्हणाले. 84 च्या जीआरचा आधार कसा घेतला आणि जर मराठ्यांचे आरक्षण काढणार असाल तर तुमचे आरक्षण कसे दिले, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील उपस्थित केले.

  • 17 Sep 2025 10:32 AM (IST)

    अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वाटप, सर्व प्रमाणपत्रांवर कुणबी असा उल्लेख

    बीडमध्ये आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 2 सप्टेंबर 2025 च्या काढलेल्या जीआर नंतर राज्यात अनेक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून बीडमध्ये पाच जणांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. हैदराबाद गॅजेटच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र धारकांना दिली आहे. या  सर्व प्रमाणपत्रांवर कुणबी असा उल्लेख आहे.

  • 17 Sep 2025 10:20 AM (IST)

    जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचा रास्ता रोको

    जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचा रास्ता रोको केला आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाने रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे.  या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.  या आमरण उपोषणाला पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट न दिल्यामुळे आक्रमक झालेल्या बंजारा बांधवांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे.

  • 17 Sep 2025 10:09 AM (IST)

    जळगावात अतिवृष्टी, कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त

    जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाचोरा व जामनेर तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकांबरोबरच शेतजमीन सुद्धा पुराच्या वाहून गेल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.  अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे कापूस पिकाबरोबरच केळी, मोसंबीच्या बागा देखील जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाचोरा तालुक्यातील राजुरी गावात उतावळी नदीचे पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके अक्षरशः वाहून गेली आहेत. तर जामनेर तालुक्यात नेरी गावालगत अतिवृष्टीमुळे उभी केळी अक्षरशः उपटून पडली असून जमीनदोस्त झाली आहे. यामुळे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून लवकरात भरघोस नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे

  • 17 Sep 2025 09:45 AM (IST)

    पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पार पडला मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

    पंकजा मुंडे यांच्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन… आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासाह अधिकारी उपस्थित… जालना शहरातल्या टाउन हॉल परिसरातील विजय स्तंभच्या ठिकाणी पार पडला कार्यक्रम… पोलिसांकडून हवेत 3 फैरी झाडून करण्यात आलं अभिवादन

  • 17 Sep 2025 09:35 AM (IST)

    नवीन प्रशासकीय भवन, सहकार भावनाची उभारणी होणार

    बीड : सहकार क्षेत्राची सर्व कामकाज एका छताखाली सुलभपणे आपल्याला आणायची आहे. आपल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या अतिरिक्त 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. आजच त्याचे भूमिपूजन करायचं होतं परंतु वेळेअभावी आपण ते पुढच्या ट्रीपला घेतले. आपल्या परळी मधील नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय साडेपाचशे कोट रुपयाचा आपण मंजूर केलेले आहे. महसूल विभागामार्फत जनता दरबार सेवा मित्र चॅटबोट करणार आहोत.

  • 17 Sep 2025 09:19 AM (IST)

    भुसावळच्या हतनूर धरणाचे 16दरवाजे पूर्णपणे उघडले

    सध्या हतनूर धरणातून 85 हजार 710 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे… आणखी पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता… हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने… पाण्याची आवक वाढत आहे त्यामुळे हे दरवाजे उघडले… नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे…

  • 17 Sep 2025 09:19 AM (IST)

    छत्रपती संभांजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ उडाला… हैदराबाद गॅझेट रद्द झालंच पाहिजे, भाषणावेळी फडणवीसांनी अशी घोषणा केली.

  • 17 Sep 2025 08:45 AM (IST)

    नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरतीचे आयोजन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावतीचे कुलदैवत असलेले अंबादेवीमध्ये भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन. अंबादेवी मंदिरात ७५ दिवे लावून पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी भाजपकडून प्रार्थना. अंबादेवी मध्ये महाआरतीला मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित..

  • 17 Sep 2025 08:33 AM (IST)

    पुण्यात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

    क्रेडिट कार्ड हॅक करत लोकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड. वाघोली पोलिसांची कारवाई. पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना वाघोली पोलिसांकडून अटक. आरोपींकडून १२ लाख रुपयांचे ४५ महागडे मोबाईल पोलिसांनी केले जप्त

  • 17 Sep 2025 08:16 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्रासाठी 12 प्रस्ताव अर्ज

    मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून धाराशिवमध्ये आज कुणबी प्रमाणपत्राचे वाटप होणार. हैदराबाद गॅजेटचा जीआर लागून झाल्यानंतर पहिल्यांदाच होणार कुणबी प्रमाणपत्राचे वाटत.

  • 17 Sep 2025 08:15 AM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-वडोदा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

    मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-वडोदा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शेतातील उभे केळीचे पीक, सोयाबीन, मका उडीद मुंग तुर पिक खरडून पाहून गेले. अक्षरशा शेतात उभे असलेले केळीचे पीक पुराच्या पाण्यात खरडून वाहून गेल. सोयाबीन मका तूर इतर पिकतर भोई सपाट झाले शेती कोरडवाहूच करून टाकली.

Published On - Sep 17,2025 8:13 AM

Follow us
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.