AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 21st June 2025 : राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात दादरमध्ये मनसेचे पुन्हा एकदा बॅनर, राज्य सरकारचा निषेध

Updated on: Jun 21, 2025 | 10:08 PM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 21 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 21st June 2025 : राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात दादरमध्ये मनसेचे पुन्हा एकदा बॅनर, राज्य सरकारचा निषेध
फाईल फोटो

LIVE NEWS & UPDATES

  • 21 Jun 2025 10:08 PM (IST)

    राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात दादरमध्ये मनसेचे पुन्हा एकदा बॅनर, राज्य सरकारचा निषेध

    राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात दादरमध्ये मनसेकडून पुन्हा एकदा बॅनरबाजी करण्यात आली आहे. या काळ्या बॅनरवर आणि त्यावरील आशयावरून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. “काय झालं सरकार आहे! परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करायच्या ऐवजी, मराठी लोकांना हिंदी सक्ती करत आहेत.. अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

  • 21 Jun 2025 09:57 PM (IST)

    वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून तपासणी

    सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातला जेलमध्ये असलेला मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याची प्रकृती खालावली. 21 जून रोजी दुपारी चार वाजता वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली. त्यामुळे कराडची वैद्यकीय पथकाकडून जेलमध्येच तपासणी करुन तिथेच उपचार करण्यात आले. कराडचा रक्तदाब वाढला होता. तर शुगर कमी झाल्याने जाणवत होता त्रास.

  • 21 Jun 2025 09:43 PM (IST)

    डोंबिवलीत रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच, काय झालं?

    डोंबिवलीत रिक्षाचालकांचा मुजोरी सुरूच असल्याचं पाहायला मिळालंय. रिक्षाचालकांनी बंदी असतानाही चौथी सीट घेतली. त्यामुळे कारवाई करण्यात आली. त्यामुळे रिक्षाचालकांनी कारवाईविरोधात वाहतूक पोलिसांशी आणि अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच भर रस्त्यात रिक्षा थांबवल्या. कहर म्हणजे डोंबिवली पश्चिमेत प्रवाशांची बसदेखील अडवली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे रस्त्यावर उतरले. “नागरिकांना त्रास दिला तर मागेपुढे बघणार नाही, असा इशारा आमदारांनी रिक्षाचालकांना दिला. आमदारांनी इशारा देताच रिक्षाचालकांनी माघार घेतली. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • 21 Jun 2025 08:50 PM (IST)

    ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत 827 भारतीय इराणमधून परतले आहेत: परराष्ट्र मंत्रालय

    परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शनिवारी माहिती दिली की आतापर्यंत 827 भारतीय नागरिकांना ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे. मंत्रालयाने या मदत मोहिमेच्या स्थितीबद्दल X वर माहिती शेअर केली. MEA ने सांगितले की ही मोहीम सुरूच आहे आणि उर्वरित भारतीयांना लवकरच सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

  • 21 Jun 2025 08:38 PM (IST)

    मुंबईतील सात रास्ता परिसरातील मुसा हाऊसमध्ये भीषण आग लागली

    मुंबईतील सात रास्ता परिसरातील मुसा हाऊसच्या तळमजल्यावर भीषण आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तळमजल्यावर असलेल्या एका एसी दुकानात आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

  • 21 Jun 2025 08:20 PM (IST)

    अमेरिकेतील नॉर्थ डकोटामध्ये तीव्र वादळाचा तडाखा, तीन जणांचा मृत्यू

    शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकेतील नॉर्थ डकोटा राज्यातील एंडरलिन या ग्रामीण शहरात तीव्र हवामानामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. कॅस काउंटी शेरीफ जेसी जॅनर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे मृत्यू एंडरलिन शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाले.

  • 21 Jun 2025 08:10 PM (IST)

    सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांना 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांना शिलाँगच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 13 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासाचा आणि आरोपींच्या भूमिकेचा आढावा घेतल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असताना आता दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येईल.

  • 21 Jun 2025 08:00 PM (IST)

    मुंबईत विनायक राऊतांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

    मुंबईत विनायक राऊतांविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. या आंदोलनात राऊत यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. विनायक राऊत यांच्यावर नपुंसक राजकारणी अशी टीका केली होती. त्यामुळेच त्यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.

  • 21 Jun 2025 07:49 PM (IST)

    मुंबईकरांचे हाल होणार, रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द

    मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी 20 जून रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि मानखुर्द ते नेरुळ या स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

  • 21 Jun 2025 07:40 PM (IST)

    मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात योग दिन उत्साहात साजरा

    मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात “आंतरराष्ट्रीय योग दिन” अत्यंत उत्साही वातावरणात शिस्तबध्द पध्दतीने ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसत्र घेण्यात आले यामध्ये शारिरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि तनाव मुक्तीचे महत्व पटवून देण्यात आले. सदर कार्यक्रमाला मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मुधकर पांडे, उप आयुक्त दत्तात्रय शिंदे, तसेच सर्व पोलीस उप आयुक्त व इतर पोलीस अधिकारी हजर होते.

  • 21 Jun 2025 07:15 PM (IST)

    भारतीय क्रिकेटपटू तुषार देशपांडेने घेतले खंडोबाचे दर्शन

    भारतीय क्रिकेटपटू आयपीएल मधील राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू तुषार देशपांडेने खंडोबा देवाचे दर्शन घेतले आहे. यावेळी श्री.मार्तंड देवसंस्थानच्या वतीने विश्वस्त मंगेशजी घोणे आणि विश्वास पानसे यांच्या हस्ते तयांचा सन्मान करण्यात आला.

  • 21 Jun 2025 06:55 PM (IST)

    नागपुरात मुख्यमंत्री चषक अंडर फिफ्टीन 2025 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच आयोजन

    – नागपुरात मुख्यमंत्री चषक अंडर फिफ्टीन 2025 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच आयोजन

    – नागपुरातील मानकापूर येथील इंडोअर स्टेडियमवर या कुस्ती स्पर्धेचा आयोजन

    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन

    – अंडर फिफ्टीन कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक राज्यांचे कुस्तीपटू सहभागी झालेले आहे…

    – तीन गटात ही कुस्ती स्पर्धा होत आहे.. याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे

    गदा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यात आलं

  • 21 Jun 2025 06:46 PM (IST)

    कल्याण रेल्वे गुन्हे शाखेकडून 20 किलोहून अधिक गांजा जप्त

    कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    चार लाख रुपये किमतीचा 20 किलोहून अधिक गांजा जप्त, दोन गांजा तस्करांना बेड्या
     
    ओडीसा राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला होता गांजा
  • 21 Jun 2025 06:27 PM (IST)

    किट्टी आडगाव येथील सरपंचाला 10 हजारांची लाच घेताना पकडलं

    बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील सरपंच रूखमान्द खेत्रे याने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरीच्या अंतिम यादीत नाव देण्यासाठी 20,000 रुपयांची फिर्यादीला लाच मागितली होती. यातील 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना आज दुपारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • 21 Jun 2025 06:10 PM (IST)

    मुंबईमध्ये सात रास्ता परिसरात मुसा हाऊसला आग

    मुंबई मध्ये सात रास्ता परिसरात मुसा हाऊस ला आग..

    मुसा हाऊस च्या तळ मजल्याला आग लागली असून घटना स्थळी फायरब्रिगेड दाखल..

    बिल्डिंग मधील नागरिकांना खाली करण्याचा काम सुरु

    मुसा हाऊस च्या तळमजल्याला असलेल्या ac च्या दुकानाला आग लागल्याची घटना…

  • 21 Jun 2025 04:35 PM (IST)

    बेपत्ता तरुणाचा मृतदेह एका विहिरीत सापडल्याने खळबळ

    जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

  • 21 Jun 2025 04:26 PM (IST)

    अमित शहा कधीच खोट बोलत नाहीत – योगेश कदम

    जगात हिंदुत्वाचा झेंडा भाजपा फडकवत आहे, त्यांना आम्ही साथ देतोय असे मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा संजय राऊत आणि त्यांच्या नेत्यांना विसर पडल्याने नुकसान झाले. अमित शहा कधीच खोट बोलत नाहीत अशी त्यांची छबी आहे. अमित शहा आणि नरेंद मोदी हे दोघेही बाळासाहेबांचा सन्मान राखतात असेही कदम यांनी म्हटले आहे.

  • 21 Jun 2025 04:20 PM (IST)

    पुण्यातील पालखी विठोबा मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी गर्दी

    पुण्यातील पालखी विठोबा मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी गर्दी झाली आहे. मुख दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची सकाळपासून गर्दी आहे. दोन दोन तास रांगेत थांबून वारकरी  दर्शन घेत आहेत.

  • 21 Jun 2025 03:58 PM (IST)

    महाबळेश्वरचा वेण्णा लेक ओव्हरफ्लो

    यंदा महाबळेश्वरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरचा वेण्णा लेक जून महिन्यातचओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीचा पाणीप्रश्न मिटला आहे.

  • 21 Jun 2025 03:40 PM (IST)

    गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला; गोदा घाट परिसरातील पाणीपातळीत वाढ

    गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोदा घाट परिसरातील पाणीपातळीत वाढ झालेली पाहायला मिळाली.दितोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचल्याचं सध्याचं चित्र आहे.

  • 21 Jun 2025 03:30 PM (IST)

    दिल्लीतील मेट्रोमध्ये महिला डब्यात साप दिसल्याची अफवा

    दिल्लीतील मेट्रोमध्ये महिला डब्यात साप दिसल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे ट्रेनमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला होता. या अफवेमुळे सगळ्या महिला घाबरल्या होत्या. तसेच महिलांची घाबरल्यामुळे आरडाओरड सुरु होती.

  • 21 Jun 2025 03:07 PM (IST)

    इराणने इस्त्रायल संघर्षावर राजकीय मार्गाने तोडगा निघणार?

    इराणने इस्त्रायलच्या गृहमंत्रालयाची इमारत उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान संघर्षावर इराणकडून राजकीय मार्गाने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आज युरोपच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. संघर्ष सुरु झाल्यानंतर युरोप आणि इराणमधील ही पहिलीच चर्चा असणार आहे.

  • 21 Jun 2025 03:00 PM (IST)

    पुण्यात सर्व धर्मसमभावाचा संदेश देणारी अनोखी दिंडी

    पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुकाम्मी असताना, या पालखी सोहळ्यात पुण्यातील अनोखी दिंडी सहभागी झाली आहे. पुण्यात सर्व धर्मसमभावाचा संदेश देणारी अनोखी दिंडी निघाली आहे. दिंडीमध्ये सर्वधर्मसमभावाचा संदेश देत, हिंदू,मुस्लीम, सिख, ईसाई असे सर्वधर्माचे नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झालेले पाहायला मिळाले.

  • 21 Jun 2025 02:45 PM (IST)

    उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 21 हजार क्युसेक विसर्ग

    उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आला असून आज दुपारी तो 21 हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे. पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रामध्ये आज सायंकाळपर्यंत पंचवीस हजार क्युसेक विसर्ग प्रवाहीत होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

  • 21 Jun 2025 02:30 PM (IST)

    एकच नंबरच्या दोन कार आढळून आल्याने सिंधुदुर्गात खळबळ

    कणकवली शहरातील विद्यानगर आणि तहसील कार्यालय परिसरात एकाच नंबरच्या दोन व्हॅगनार कार आढळून आल्या. त्यानंतर काल सायंकाळी आरटीओ अधिकारी पोलिस स्थानकात दाखल झाले होते. आरटीओ चौकशीनंतर पुढील कारवाई होणार आहे.

  • 21 Jun 2025 02:11 PM (IST)

    शेतकरी संकटात! पेरणी करुनही राज्य सरकारकडून घेतलेलं बियाणं उगवलं नाही

    धाराशिवमधील शंभर एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचे बियाणं उगवलं नाही. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून घेतलेल्या बियाणांची शेतकऱ्यांनी पेरणी तर केली. पण बियाणं न उगवल्याने शेतकरी संकटात आला आहे. सोयाबीन पेरणी 11 दिवसांपूर्वी झाली होती. मात्र बियाणे अद्याप उगवलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

  • 21 Jun 2025 01:49 PM (IST)

    शाहरुखच्या मन्नत बंगल्याच्या विरोधात आरटीआय कार्यकर्त्यांची तक्रार

    मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणादरम्यान सीआरझेड नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार. बीएमसीच्या पथकाने आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काल मन्नत बंगल्यात पाहणी केली. शाहरुख खान यांच्या बंगला बांद्रा चौपाटी येथे आहे. सध्या काम सुरू आहे. पालिका आणि वन विभाग अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी केलेली आहे.

  • 21 Jun 2025 01:48 PM (IST)

    कणकवलीत एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार

    कणकवली शहरातील विद्यानगर आणि तहसील कार्यालय परिसरात एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार आढळून आल्या. एकच नंबरच्या दोन कार आढळून आल्याने सिंधुदुर्गात खळबळ. काल सायंकाळी आरटीओ अधिकारी पोलिस स्थानकात दाखल झाले होते. आरटीओ चौकशीनंतर होणार पुढील कारवाई होणार.

  • 21 Jun 2025 01:47 PM (IST)

    मी अजूनही ठाकरे शिवसेनेत – तेजस्वी घोसाळकर

    “मी मुंबई बँकेची आभारी आहे. या पोस्टसाठी मी विनोद घोसाळकर सरांसोबत गेली आणि प्रवीण देकर सरांना भेटले. थोडा उशिरा झाला पण मिळालं. मी अभिषेक घोसाळकरांसारखच काम करेन. संजय राऊत काय म्हणाले ते मला माहिती नाही, मी अजूनही ठाकरे शिवसेनेत आहे” असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

  • 21 Jun 2025 01:45 PM (IST)

    उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 21 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

    उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आला असून आज दुपारी तो 21 हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे. पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रामध्ये आज सायंकाळपर्यंत पंचवीस हजार क्युसेक विसर्ग प्रवाहीत होण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा दिला आहे इशारा. पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली असून सध्या दौंड येथून उजनीमध्ये 40 ते 50 हजार इतका विसर्ग सुरू आहे.

  • 21 Jun 2025 12:58 PM (IST)

    वारकऱ्यांचा असा पण सेवक

    जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी ही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक जणं करत असतात. जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करतात. मात्र मुळचे पुण्याचे असणारे सध्या हैद्राबाद येथे स्थायिक असणारे अब्दुल रजा हे गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहेत. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात. वारकऱ्यांची मालिश करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम करतात.

  • 21 Jun 2025 12:45 PM (IST)

    भीमा नदी पात्रात 21 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

    उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 21 हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आला असून आज दुपारी तो 21 हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे.पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रामध्ये आज सायंकाळपर्यंत पंचवीस हजार क्युसेक विसर्ग प्रवाहित होण्याची शक्यता आहे.

  • 21 Jun 2025 12:40 PM (IST)

    सर्वधर्म समभाव दिंडीने वेधले लक्ष

    पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुकाम्मी असताना, या पालखी सोहळ्यात पुण्यातील अनोखी दिंडी सहभागी झाली आहे. पुण्यात सर्व धर्मसमभावाचा संदेश देणारी अनोखी दिंडी निघाली. दिंडीमध्ये सर्वधर्मसमभावाचा संदेश देत, हिंदू,मुस्लिम सिख, ईसाई असे सर्वधर्माचे नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले.

  • 21 Jun 2025 12:30 PM (IST)

    केडीएमसीची वेबसाईट बंद; 490 पदांची भरती लटकली

    केडीएमसीमध्ये गट-क आणि गट-ड मधील 490 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पण महापालिकेचे संकेतस्थळ सतत बंद असल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वेबसाईट सतत डाऊन असल्याने अर्ज प्रक्रिया होत नसल्याचे समोर आले आहे. अर्ज भरण्यासाठी वेळ कमी, पण वेबसाईट लोड न झाल्याने तरुणांची धावपळ होत आहे. हेल्पलाइनही सतत व्यस्त येत आहे.

  • 21 Jun 2025 12:20 PM (IST)

    पुण्यात वाहतुकीत बदल

    संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा उद्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्यानिमित्त रविवारी मध्यरात्री दोननंतर नाना-भवानी पेठेत वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

  • 21 Jun 2025 12:12 PM (IST)

    एस टी महामंडळाच्या शिवाय इलेक्ट्रिक गाडीमध्ये दिव्यांगांना नो एंट्री

    शिवाई एसटी बस मध्ये दिव्यांगासाठी राखीव सीट आहे. मात्र तिकीट मशीन मध्ये इन्स्टॉलेशन नसल्यामुळे दिव्यांगांना डावलण्यात आल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रामध्ये पाच हजार इलेक्ट्रिक गाड्या दाखल होणार आहेत त्यामध्ये तरी दिव्यांगांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिव्यांका कडून केली जातेय.

  • 21 Jun 2025 12:03 PM (IST)

    दमदार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात पेरण्यांना सुरुवात

    पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पेरण्यांना वेग आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सरासरी तीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी होत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड होणार असून एक लाख २५ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाचे लागवड होणार आहे.

  • 21 Jun 2025 11:55 AM (IST)

    इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर ॲसिड फेकण्याची धमकी

    नागपूर येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर ॲसिड फेकण्याची धमकी दिली आहे. आरोपीनं विद्यार्थिनीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. आरोपी अश्विन दासरला नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

  • 21 Jun 2025 11:41 AM (IST)

    14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची मालवणीमधील घटना

    14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची मालवणी येथे घडली आहे. मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेलेल्या मुलीवर अत्याचार झाले आहेत. अश्लील व्हिडीओ करुन मुलीच्या आईला पाठवल्यानंतर प्रकार उघडकीस आला आहे.

  • 21 Jun 2025 11:37 AM (IST)

    सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात जलपर्णीचा घट्ट विळखा

    जलपर्णी जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्याऐवजी गोदावरी नदी पात्रातील पाण्याच्या प्रवाहात पुढे ढकलून देण्याचे काम सुरू… नांदूर मधमेश्वर धरणाच्या व प्रकार गेटमध्ये जलपर्णी अडकण्याची भीती… जलपर्णी पाण्याच्या प्रवाहात ढकलून देता बाहेर काढण्याची मागणी… घट्ट जलपर्णीमुळे सायखेडा येथील पुलाला धोका निर्माण होण्याची भीती…

  • 21 Jun 2025 11:15 AM (IST)

    निवडणुकांनंतर 45 दिवसांत सर्व फुटेज नष्ट करणार – निवडणूक आयोग

    फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय… फुटेजचा गैरवापर करुन चुकीच्या माहिती पसरवली जाते… असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

  • 21 Jun 2025 11:03 AM (IST)

    खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होणार कमी

    खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपासून 4565 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे.  11 वाजल्यापासून कमी करून 2076 क्यूसेक्स केला जाणार आहे..

  • 21 Jun 2025 10:56 AM (IST)

    संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात नाना पेठेत मुक्कामी

    संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असणाऱ्या नाना पेठेमधील निवडुंगा विठ्ठल मंदिराबाहेर दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी निवडुंगा विठ्ठल मंदिराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.

  • 21 Jun 2025 10:49 AM (IST)

    गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातून विसर्ग

    भंडाऱ्याच्या राष्ट्रीय गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या धरणातून जिल्हा प्रशासनाने ८० क्युसेक पाण्याचा विसर्ग शनिवारपासून सुरू केला आहे. सध्या हा प्रकल्प तुडुंब भरलेला आहे.

  • 21 Jun 2025 10:31 AM (IST)

    श्री संत गजानन महाराज पालखी अंबाजोगाईकडे रवाना

    श्री संत गजानन महाराज पालखीचे परळीत दोन दिवसाच्या मुक्कामी होती. त्यानंतर आता पालखी अंबाजोगाईकडे रवाना झाली. आज सकाळी पालखी अंबाजोगाईकडे रवाना झाली आहे. दोन जून रोजी पालखीचे प्रस्थान शेवगाव येथून झाले होते.
  • 21 Jun 2025 10:03 AM (IST)

    योग्य वेळी कर्जमाफी- फडणवीस

    सरकार शब्द फिरवणार नाही. योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय होईल. कर्जमाफी कधी करायची या संदर्भात काही नियम आहेत, पद्धती आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • 21 Jun 2025 09:53 AM (IST)

    आमदार अमोल मिटकरी यांनी सहकुटुंब घेतले श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन

    आमदार अमोल मिटकरी यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे टोकन दर्शन घेतले.

    टोकन दर्शन घेत असताना भाविकांना काय समस्या जाणवतात याचा मी स्वतः अनुभव घेतला आणि त्या आता सरकार दरबारी मांडणार, असं मिटटकरी यांनी नमूद केलं.

    ढच्या आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवारांना यांना करण्याची संधी मिळावी असे साकडे श्री विठ्ठलाला घातल्याचेही आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

  • 21 Jun 2025 09:43 AM (IST)

    योगामुळे शारीरिक व मानसिक संतुलन चांगले होते त्यामुळे सर्वांनी योगा करावा – गिरीश महाजनांचा खडसेंना सल्ला

    योगामुळे शारीरिक व मानसिक संतुलन चांगले होते त्यामुळे सर्वांनी योगा करावा अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना सल्ला दिला.

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे रेल्वे मैदानावर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह रेल्वे विभागाचे डी आर एम तसेच जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची देखील उपस्थिती होती. या दरम्यान गिरीश महाजन यांनी खडसेंचं नाव न घेता त्यांना सल्ला दिला.

  • 21 Jun 2025 09:32 AM (IST)

    मुंबई बँकेच्या संचालक तेजस्वी घोसाळकर यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

    मुंबई बँकेच्या संचालक तेजस्वी घोसाळकर यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

    माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या रिक्त असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदावर माझी एकमताने निवड केल्याबद्दल मी बॅंकेचे अध्यक्ष मा. प्रविणभाऊ दरेकर तसेच सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार मानते.

    काम करणे हाच खरा सहकार धर्म आहे, त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणे अत्यंत चुकीचे ठरेल. हा माझा सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा व पहिलाच अध्याय आहे, मात्र माझ्या परिवाराने आजवर केलेल्या कामाचा अनुभव व अभिषेक यांच्या जवळ राहून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून मी चांगले काम करेल याची खात्री देते, असे तेजस्वी घोसाळकर यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

  • 21 Jun 2025 09:20 AM (IST)

    सोलापूर – बार्शीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांची शिवसेनेचा वर्धापन दिन आणि डिनर डिप्लोमासीला दांडी

    सोलापूर – बार्शीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन आणि डिनर डिप्लोमासीला दांडी मारली. दिलीप सोपल हे शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. मात्र ते शिवसेना ठाकरे गटाच्या दोन्हीही कार्यक्रमांना गैरहजर राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    आमदार दिलीप सोपल दोन दिवसापासून बार्शी मतदारसंघ आणि जिल्ह्याबाहेर असल्याची सूत्रांची माहिती. यापूर्वीही त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक महत्वाच्या बैठकांना दांडी मारली होती.

  • 21 Jun 2025 09:03 AM (IST)

    योग विद्या आपली प्राचीन संस्कृती – देवेंद्र फडणवीस

    योग विद्या आपली प्राचीन संस्कृती. पुण्यात झालेला भक्तीयोगाचा कार्यक्रम अतिशय आनंद देणारा – आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना.

  • 21 Jun 2025 08:47 AM (IST)

    योगदिनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात

    जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी,विद्यार्थी अन पुणेकर योगासने करणार आहेत. हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

  • 21 Jun 2025 08:47 AM (IST)

    बदनापूर शहरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

    देशभरासह संपूर्ण जगात आज 111 वा अंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातील पाथ्रीकर कॉलेज येथे महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींसोबत भाजप आमदार नारायण कुचे यांनी या योग दिवसात सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारची योगासने करत हा दिवस आनंदात साजरा केला.

आज, 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून भारतातही सर्वत्र उत्साह दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ होणार आहे.यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी,विद्यार्थी अन पुणेकर योगासने करणार आहेत. हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने अमरावती शहर पोलीस दलातील कर्मचारी प्रवीण आखरे यांनी जलतरण केंद्रात पाण्यामध्ये योगासनं केली. त्यांनी 11 फूट खोल पाण्याच्या आत तब्बल 1 तास 2 मिनिटे कोणतीही हालचाल न करता सावधान स्थितीत राहून अनोखा विक्रम केला. तर मालेगावातही कॉलेज मैदानावर योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. शालेय शिक्षण मंत्री मंत्री भुसे, मालेगावकर नागरिक, ओम शांती परिवार आणि अधिकारी यांनी योगासनं केली. दरम्यान जळगावच्या सराफ बाजारात सोने 600 रुपये तर चांदीचे दर 4 हजार रुपयांनी घसरले. त्यामुळे सोन्याचे दर 98 हजार 900 रुपये तर चांदी 1 लाख 05 हजार रुपये किलोवर आली आहे. गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

Published On - Jun 21,2025 8:45 AM

Follow us
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.