Maharashtra Political News LIVE : भावेश भिंडेला 29 मेपर्यंत कोठडी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 26 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल उद्या सोमवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर केला जाणार आहे. बोर्डाचा निकाल पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील विविध विकासकामांच्या पाहणी ते करणार आहेत. जळगावच्या सराफ बाजारात गेल्या पाच दिवसांत सोन्याचे भाव २ हजार ९०० रुपयांनी घरसले आहेत. विदर्भातील वाढत्या तापमानाचा अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांना मोठा फटका बसला आहे. तापमान वाढल्यामुळे झाडावरील संत्रा गळून पडत आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडीओ बनवणाऱ्या रॅपरला नोटीस
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे फेक व्हिडिओ बनवणाऱ्या रॅपरला पोलिसांकडून नोटीस बजवण्यात आलीय. पुणे पोलिसांकडून उद्या आर्यनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आक्षेपार्ह व्हिडीओ इस्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी रॅपर आर्यनला सायबर विभागाने 48 तासांत हजर होण्यासाठी 41 A प्रमाणे नोटीस बजावली आहे. रॅपर आर्यनकडून नोटीसला उत्तर देण्यात आले आहे. मी फक्त कंटेंट क्रिएटर असल्याचे सांगत त्याने पुणे पोलिसांकडे गुन्हा मागे घेण्याची मागणी केलीय.
-
धुळ्यात ट्रकने पेजर गाडीला उडवले, 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
धुळे शहरातील देवपूर भागात एल एम सरदार शाळेजवळ भरदाव ट्रकने पेजर गाडीला उडविले. अपघातात पेजर गाडी चालक 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. यावेळी जमलेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. मोठा जमाव जमाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिसरात शांतता पसरली आहे.
-
-
भावेश भिंडेला 29 मेपर्यंत कोठडी
घाटकोपर होर्डींग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला 29 मे पर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
-
जळगावात जामनेरमध्ये अवकाळीने केळी पिकाचे नुकसान
जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीसह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय विभागाकडून नुकसानाची पाहणी करण्यात आली आहे.
-
पुणे विद्यापीठातील एनएसयुआयच्या अध्यक्षाची कॉंग्रेसमधून हकालपट्टी
पुणे विद्यापीठातील एनएसयुआयचे अध्यक्ष अक्षय कांबळे याची काँग्रेसमधून हकलपट्टी झाली आहे. मुलींचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून काँग्रेस कडून कारवाई झाली आहे. कांबळे याच्यावर चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
-
-
पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आजोबांची मेडीकल टेस्ट
पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना पोलिसांना मेडीकल तपासणीसाठी नेले आहे. सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
#WATCH | Maharashtra | Pune car accident case: Police take the grandfather of the juvenile accused for medical examination. pic.twitter.com/UMMjNFq6oo
— ANI (@ANI) May 26, 2024
-
अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण आटले
अक्कलकोट तालुक्याला पाणीपुरवठा करणारे कुरनूर धरण मृतसाठ्यात पोहोचले आहे. अक्कलकोटचे शेतकऱ्यांनी उजनीचे पाणी मिळावे अशी मागणी केली आहे.
-
बंगालमध्ये रेमल चक्रीवादळ
बंगालमध्ये रेमल चक्रीवादळ आले आहे. लोकांनी समुद्रकिनारी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळतंय.
-
अक्कलकोट तालुक्यातील पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त
अक्कलकोट शहरासह तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या कुरनूर धरणात अवघे 8 टक्के पाणी शिल्लक. बोरी आणि हरणा नदीच्या संगमावर उभारण्यात आलेय कुरुनूर धरण
-
नागरिकांनी नदी आणि नाल्यात कचरा फेकू नये- एकनाथ शिंदे
नागरिकांनी नदी आणि नाल्यात कचरा फेकू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
16 बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ
जळगाव शहरात गेल्या आठ दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी 16 बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ.जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आठ दिवसात एकूण 50 लोकांचे मृतदेह आल्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची माहिती..
-
दिल्लीतील बाल रुग्णालयाला भीषण आग
दिल्लीतील बाल रुग्णालयाला भीषण आग लागली असून या आगीत 7 बाळांचा मृत्यू झाला आहे तर 12 बाळांना वाचवण्यात यश मिळालं आहे. दिल्लीतील विवेक विहार रुग्णालयाल ही आग लागली आहे.
-
पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याचं खळबळजनक पत्र व्हायरल
पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याचं खळबळजनक पत्र व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री शिंदेंना त्यांनी हे पत्र पाठवलं आहे. मी नियमबाह्य काम करत नाही म्हणून माझं निलंबन केलं, असा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. त्याचसोबत या पत्रात अधिकाऱ्याने मंत्र्यावर आरोप केले आहेत. नियमबाह्य टेंडरची कामं, खरेदी प्रक्रियेची कामं आणि इतर कामात मदत करण्यास माझ्यावर दबाव आणला, असं त्यांनी पत्रात म्हटलंय.
-
कोलकाता विमानतळावरील उड्डाणे बंद
‘रेमाल’ चक्रीवादळ आज रात्री बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे कोलकाता विमानतळावरील उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.
-
आयकर विभागाकडून नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर छापा
आयकर विभागाने नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर छापा टाकला आहे. ज्वेलर्सच्या मालकाच्या कथित अज्ञात व्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
-
जळगाव शहरात गेल्या 8 दिवसांत 16 बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ
जळगाव शहरात गेल्या आठ दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी 16 बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आठ दिवसांत एकूण 50 लोकांचे मृतदेह आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली. एकूण आलेल्या 50 मृतदेहांपैकी 16 जण हे बेवारस आणि अनोळखी असल्याचं अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांनी सांगितलं आहे.
-
भरपावसात वाहतूक पोलिस कर्तव्यावर
सोलापुरात भर पावसात ट्राफिक पोलिसाच्या ड्युटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काल सायंकाळी झालेल्या पावसात ट्राफिक पोलीस कर्तव्य बजावत होते. शहरातील अक्कलकोट नाका येथे मोठ्याप्रमाणात वाहतूक होत असते. मात्र वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचा पोलीस पावसाचा विचार न करता कर्तव्य बजावताना दिसला. या पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
-
तर वाहन विक्रेत्यांवर कडक कारवाई
नोंदणी न करता वाहने ग्राहकांना देऊ नका असे पत्र पुणे आरटीओने शोरुम मालकांना दिले आहे. वाहन विक्रेते ग्राहकांच्या दबावाला बळी पडून नोंदणी न करता वाहन ताब्यात देतात. असा प्रकार आढळून आल्यास पुणे आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे.
-
बिबट्यांची नसबंदी करा- शिवाजी आढळराव पाटील
बिबट्याची नसबंदी करणे गरजेचे असून याबाबत मागणी करण्यात आली आहे. मात्र नसबंदीला अजूनही कोणत्या ही राज्यात मान्यता मिळाली नाही. जुन्नर भागात गेल्या 10 वर्षात तीन पटीने बिबट्याच्या संख्येत वाढ झाली. बिबट्याची नसबंदी झाली तर ही वाढ झाली नसती, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे असल्याचे शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले.
-
चोरट्यामुळे प्रवासी आला लोकलखाली
ठाणे ते कलवा स्टेशन दरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये मोबाइल चोरीसाठी चोरांनी प्रवाशाच्या हातावर फटका मारला. तोल गेल्याने प्रवासी लोकलखाली आल्याने त्याला दोन्ही पाय गमावावे लागल्याचे समोर येत आहे.
-
तापमानाचा ताप वाढला
राज्यातील अनेक शहरांचे तापमान 40 अंश सेल्सियसवर गेले आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील तापमान 45 अंश सेल्यियसवर पोहचले आहे. राजस्थानमधील फलोदी या शहराचे तापमान 50 अंश सेल्सियस गेले आहे. या परिसरात गेल्या 72 तासांत उष्मघातामुळे 24 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
-
माझा बाप बिल्डर असता तर? भव्य निबंध स्पर्धा
पुण्यातील कार अपघात प्रकरण पुणे युवक काँग्रेसने भरवली भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजीत केली आहे. माझी आवडती कार ( पॉर्शे , फरारी , मर्सिडीज,) दारूचे दुष्परिणाम, माझा बाप बिल्डर असता तर?मी खरच पोलीस अधिकारी झालो तर?, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? असे विषय आहेत. उत्कृष्ट निबंधाला ११ हजार १११ रुपयाचं पहिलं बक्षीस देण्यात येणार आहे.
-
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहिम
पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेने नालेसफाई हाती घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या नालेसफाईची स्वतः पाहणी करणार आहेत.
-
गोदरेज हिल परिसरात फ्लॅटला भीषण आग
कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हिल परिसरात असलेल्या एका इमारतीमधील फ्लॅटला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाची दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र आग एवढी मोठी होती की आगीमध्ये घराचे साहित्य जळून खाक झाली आहे. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
पिंपरी चिंचवड महापालिका ऍक्टिव्ह मोडवर…
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड महापालिका ऍक्टिव्ह मोडवर… वाकड येथील रूफ टॉप हॉटेलवर हातोडा चालवण्यात आला आहे. वाकडमधील भुजबळ चौक मधुबन हॉटेल शेजारी रस्त्यालगत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील असलेले अनधिकृत रूफटॉप स्पाइस फॅक्टरी,अब्सोल्यूट बार्बीक्युवर हातोडा… 9000 चौ फुट क्षेत्रफळाचे अनधिकृत रूप स्टॉप पाडण्यात आले आहेत.
-
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. लांब पल्ल्याची सर्व वाहन वाहतूक कोंडीत आडकून पडले आहेत. घोडबंदर वर्सोवा ब्रीज ते विरार खानिवडे टोल नाक्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सिमेंट काँक्रीट चे काम सुरु आहे. हे काम करताना संबधित कंपनीकडून कोणतेही नियोजन होत नसल्यामुळे वाहनधारकानं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
-
दगडूशेठ मंदिरात भाविकांची गर्दी
आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गर्दी झाली आहे. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी परिसर गजबजून गेलाय.
-
Marathi news: वाशीममध्ये पाणीसाठा घटला
वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशापर्यंत पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यात असलेल्या एकूण १७२ प्रकल्पामध्ये सरासरी १७.८३ एवढा जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानाने प्रकल्पातील जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. आणखी काही दिवस तरी प्रकल्पातील पाण्यावरच नागरिकांना अवलंबून राहावे लागणार आहे.
-
Marathi news: अजित पवार यांचा जनता दरबार
ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नेहमीप्रमाणे बारामती तालुक्यातील विकास कामांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. विविध ठिकाणी त्यांनी विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले.
-
Marathi news: जळगावात सोने घसरले
जळगावच्या सराफ बाजारात गेल्या पाच दिवसांत सोन्याचे भाव २ हजार ९०० रुपयांनी घरसले आहे. जळगावात सोने प्रति १० ग्रॅम ७५ हजार १०० रुपयांची विक्रमी पातळीवर पोहचले होते. परंतु आता शनिवारी सोन्याचा दर ७२ हजार २०० रुपयांवर आला आहे. दुसरीकडे चांदीचे दर मात्र ९३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
-
Marathi news: मुंबईत मान्सूनचे संकेत
दादर मुंबई परिसरात मान्सून चे संकेत पाहायला मिळत आहेत. रविवारी सकाळपासून दादर, चर्चगेट, वांद्रे परिसरात ढगाळ वातावरण पसरले आहे. १० जूनपर्यंत मान्सून मुंबई परिसरात दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
Published On - May 26,2024 8:06 AM