Maharashtra Breaking News LIVE 20 January 2025 : राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या केली का? – संजय राऊत
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 20 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

धाराशिव मध्ये नवीन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वागत अनेक प्रलंबित कामाच्या मागणीने केले जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी कुठलेही भेदभाव न करता जिल्ह्यातील विकास कामे करावेत असे मत व्यक्त केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, एसटी महामंडळाची प्रलंबित कामे, श्री तुळजाभवानीच्या विकास आराखड्याचे काम इत्यादी महत्त्वाची कामे धाराशिव जिल्ह्यात प्रलंबित आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आज जालना दौऱ्यावर आहेत आणि ते आता शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी पोहोचतील, आज जालन्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाघाटन होणार आहे. तर अभिनेता सैफ अली खान याच्या हल्लेखोराला अटक केल्यानंतर पुढे काय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
LIVE NEWS & UPDATES
-
न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी नाही, दोषीला फाशी द्या: मुख्यमंत्री ममता
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी कोर्टाने दिलेल्या निकालावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मरेपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेवर मी समाधानी नाही. या प्रकरणाचा तपास आमच्या हातून हिसकावून सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे ते म्हणाले.
-
महाविकास आघाडी ठणठणीत आहे- संजय राऊत
महाराष्ट्रात महाविकास आघाडी ठणठणीत आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. आम्ही लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. आमच्यात संवाद राहिला पाहीजे, असं संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे-शरद पवार भेटीवर सांगितलं. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महाविकास आघाडीबाबत काही ठरलं नाही.
-
-
सध्या गेम करण्याचं प्रमाण वाढलं आहे- संजय राऊत
सध्याच्या राजकीय स्थितीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं. सध्या गेम करण्याचं प्रमाण वाढलं आहे, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. एक दिवस कोणाचातरी गेम वाजणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
-
राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या केली का? – संजय राऊत
राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्याचा केली का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये, असं संजय राऊत यांनी सांगितलं. गृहमंत्री फडणवीस यांना अंधारात ठेवून सगळं झालं का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
-
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण: न्यायालयाने दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा
कोलकाता बलात्कार हत्याकांडातील दोषी संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा काही किरकोळ गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने ममता सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
-
-
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आता 23 जानेवारीला सुनावणी
बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आता 23 जानेवारीला सुनावणी होणार आहे. केज न्यायलयाने आरोपीचे वकील अशोक कवडे यांच्या विनंती वरून तारीख पुढे ढकलली आहे.
-
नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका
नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका लागला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. एकनाथ पवार यांनी राज्य संघटक या पदाचा राजीनामा दिला आहे.एकनाथ पवार हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लोहा कंधार मतदारसंघाचे उमेदवार होते. दरम्यान एकनाथ पवार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बदनापूरात विद्यार्थ्यांशी संवाद
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर होते. अजित पवार यांनी जालन्यातील कार्यक्रम आटोपल्यावर भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालय कार्यालयाला भेट देण्यासाठी बदनापूर थांबले होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थिनी उभ्या होत्या आणि यावेळी अजित पवारांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
-
संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची काळजी करावी – प्रवीण दरेकर
संजय राऊत यांनी आमची चिंता करू नये, मतभेद मनभेद संपवले जातील, वाकून पाहू नये असा सल्ला भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची काळजी करावी , कुणाचा ऊदय होतोय त्यापेक्षा त्यांच्या पक्षाचा अस्त होतोय याची काळजी करावी असाही खोचक सल्ला दरेकर यांनी दिला आहे.
-
अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणी 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश न्या. रेवती मोहिते ढेरे यांनी दिले आहेत.
-
बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात 5 पोलीस जबाबदार; मोठी माहिती समोर
बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात 5 पोलीस जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. गुन्हा दाखल करण्याची योग्य ती कारवाई करण्याची हायकोर्टाने आदेश देण्यात आले आहेत.
-
शिवसेनेकडून बांगलादेशी हटाव मोहीम सुरू; सैफवरील हल्ल्यानंतर शिवसेना अलर्ट मोडवर
शिवसेनेकडून बांगलादेशी हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून, सैफवरील हल्ल्यानंतर शिवसेना पक्ष अलर्ट मोडवर आहे. सैफ अली खान हल्लेखोर आरोपी बांगलादेशी आढळल्याने शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. सैफ अली खान प्रकरणातील आरोपी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील एका हॉटेल मध्ये काम करत असल्याचं समोर आलं आहे. त्याच हॉटेल आणि आजू बाजूच्या परिसरातील हॉटेल्स ,दुकानांना व इतर आस्थापनांना शिवसेना पक्षाकडून इशारा पत्र देण्यात आलं आहे. शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण नागरे ,महेंद्र मढवी,विभाग प्रमुख मुकेश ठोबरे यांच्या वतीने पत्र देण्यात आले आहे.
-
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला रवाना; बीड-परभणी प्रकरणावर चर्चा करणार
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते शरद पवारांची भेट घेणार असून बीड-परभणी प्रकरणावर चर्चा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. थोड्याच वेळात सिल्व्हर ओकवर पोहोचणार.
-
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीबाबात 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुढे ढकलणार ?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीबाबात 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या मेन लिस्टमधे प्रकरण नाही, त्यामुळं सुनावणीसाठी नवी तारीख मिळण्याची शक्यता आहे. आज येणाऱ्या सप्लिमेंटरी लिस्टमधे प्रकरण येत का हे पाहणं महत्वाचं ठरेल. संपूर्ण राज्याचं लक्ष 22 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीकडे लागलं आहे.
-
कोल्ड प्ले कॉन्सर्टमध्ये चोरांचा धुमाकूळ, पाच मोबाइल लंपास
नेरूळ येथे सुरू असलेल्या कोल्ड प्ले’ कॉन्सर्टदरम्यान चोरांनी धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत 5 मोबाईल चोरी झाल्याचे समोर आले आहे. स्टेडियममधून 3 , तर 3मोबाइल हे बाहेरच्या गर्दीतून चोरांनी लंपास केले आहेत. या प्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
भरत गोगावले हे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता
भरत गोगावले हे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भरत गोगावले सध्या पुण्याहून रायगडकडे रवाना झाले आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदावरून अदिती तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये वाद सुरू आहे. दोघांनाही रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात येऊ शकतं का ? यावर तिन्ही पक्षांतील मोठे नेते निर्णय घेणार आहेत. भरत गोगावले यांना रायगडच्या पाच आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते.
-
मेळघाट मध्ये जादूटोण्याचा आरोप करत वृद्ध महिलेची धिंड काढल्याचे प्रकरण – पोलीस पाटलाची पदावरून हकालपट्टी
अमरावतीच्या मेळघाट मध्ये जादूटोण्याचा आरोप करत 77 वर्षीय वृद्ध महिलेची धिंड महिलेची धिंड काढण्यामागे पोलीस पाटील बाबू जामुनकर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बाबू जामुलकर याची पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्यात येणार आहे.
या 77 वर्षीय वृद्ध महिलेला चटके दिले होते, तोंडाला काळे फासले होते, तसेच गळ्यात तिच्या चपलांचा हार घालून तिला गावात फिरवले होते.
-
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्याला सांताक्रूझमधील लॉकअपमधून आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं. तेथे त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
-
दारू पिण्याच्या किरकोळ वादातून एकावर धारदार शस्त्राने हल्ला
पोटावर वार झाल्याने कोथळा बाहेर. हल्ल्यामध्ये अल्ताफ अन्सारी हा युवक गंभीर जखमी. आय जी एम रुग्णालयात प्रथमोपचार करून ठाणे सिव्हील रुग्णालयात जखमीला हलवलं. भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
-
नंदुरबार रात्रीच्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर
पोलिसांकडून दंगलखोरांचा शोध सुरू. १५ ते २० संशयित पोलिसांच्या ताब्यात संशितांची चौकशी सुरू. संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. शहरात तणावपूर्ण शांतता. पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक शहर पोलीस स्टेशनला थांबून.
-
मस्साजोग येथील खंडणी प्रकरणात आज निर्णय
केज न्यायालयात आरोपी वाल्मीक कराडच्या जामिनावर होणार निर्णय. दुपारी एक वाजता निर्णय होण्याची शक्यता. आरोपीचे वकील ॲड अशोक तिडके बाजू मांडणार. जामीन होणार की फेटाळणार याकडे सर्वांचे लक्ष. वाल्मिक कराड सध्या हत्येप्रकरणी एसआयटी कोठडीत आहे.
-
म्हणून शहजादला शाहरुख-सलमानच्या घरी चोरी करता आली नाही
शाहरुख आणि सलमान खानच्या घरावरील कडेकोट बंदोबस्त आणि सीमा भिंतीची उंची यामुळे शहजादला चोरी करता आली नाही. सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजाद, शाहरुख खानच्या मन्नत घराच्या बाउंड्री वॉलची उंची जास्त असल्याने चोरी करता आली नाही.
-
Maharashtra News: अभिनेता सैफ अली खान याला आज रुग्णालय मधून डिस्चार्ज मिळायची शक्यता
तीन दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत तीन दिवसाचा बेड रेस्ट सांगत तीन दिवसांनी डीचार्ज मिळणार असल्याची माहिती दिली होती. आज तीन दिवस पूर्ण होत असून सैफला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे… थोड्या वेळानंतर साडेनऊ ते दहाच्या दरम्यान डॉक्टर सैफ अली खानची पुन्हा तपासणी करणार त्यानंतर त्यांच्या जखमा पाहून त्याला डिस्चार्ज देणार की नाही हे ठरवणार असल्याचे सूत्रांची माहिती
-
Maharashtra News: पंढरपूरच्या यात्रेत गर्दी नियंत्रणासाठी ए आय(AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार…
संगणक प्रणाली तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दिला प्रस्ताव… राज्य सरकारकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दोन कोटी रुपयाचा पाठवला प्रस्ताव… पंढरपुरात प्रमुख आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघ अशा चार यात्रा भरत असतात…नयात्रे दिवशी विठ्ठल दर्शनाकरता लाखो भाविक पंढरपुरात येत असतात त्यामुळे मंदिर परिसर,चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग अशा ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरता आता AI तंत्रज्ञानाचा होणार वापर…
-
Maharashtra News: पुणे शहरात मोबाइल टॉवर असलेल्या कंपन्यांकडे महापालिकेची ३५०० कोटींची थकबाकी
राज्य शासनाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेसमोर कर वसुली करण्यासाठी मोठी अडचण… मोबाइल टॉवर असलेल्या कंपन्यांकडे कराची रक्कम सक्तीने वसूल करू नये, असे आदेश राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यात काढले आहेत… या आदेशानंतर महापालिकेसमोर कंपन्यांकडून कर वसुली करण्यासाठी मोठं आवाहन… पुणे महापालिकेकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात येणार पत्र… महापालिकेच्या पत्रानंतर राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेणार…
-
Maharashtra News: समृद्धी महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक
मुंबईहून यवतमाळकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला आग… शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज 20 प्रवाशांचे थोडक्यात वाचले प्राण… अचानक आग लागल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झालं आहे. इंजिनमध्ये आग लागल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला घेतलं आणि २० प्रवाश्यांना खाली उतरल्याने सुदैवाने घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही.
Published On - Jan 20,2025 8:03 AM





