ही शाई नाही, लोकशाही पुसली जातेय, मतदानातील गोंधळावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीत मतदानादरम्यान शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींवरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयुक्त नक्की कसला पगार खातात? असा संतप्त सवाल विचारत त्यांनी मतदानातील गैरप्रकारांवर बोट ठेवले आहे.

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांचा निवडणुकीचा महासंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह ठिकठिकाणी राज्यात २९ महापालिकांसाठी मतदान पार पडत आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मतदान केल्यानंतर बोटाची शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींवरून त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. निवडणूक आयुक्त नक्की कसला पगार खातात? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी विचारला.
उद्धव ठाकरे यांनी वांद्र्यातील मातोश्री परिसरात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या वेळी उद्धव ठाकरेंनी मतदानादरम्यान बोटावर खूण करण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीवर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. गेल्या चार वर्षांनंतर निवडणुका होत आहेत, तरीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. शाई पुसली जाण्याचे प्रकार समोर येत आहेत, यावरून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर त्यांनी शंका उपस्थित केली. निवडणूक आयुक्त हे मुख्यमंत्र्यांचे घरगडी म्हणून काम करत आहेत की काय? अशी विचारणा करत उद्धव ठाकरेंनी आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
Municipal Election 2026
Maharashtra Election 2026 : उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर निवडणूक आयुक्तांचे जाणार पद? घडामोडींना प्रचंड वेग...
Maharashtra Municipal Election 2026 : रश्मी ठाकरे यांनी दाखवला शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ
BMC Election 2026 Voting : टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंग रुममधून बाहेर काढण्याचा आदेश, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
BMC Election 2026 Voting : निवडणूक जिंकण्यासाठी आटापिटा सुरू आहे, उद्धव ठाकरे
KDMC Poll Percentage : KDMC निवडणूकीत किती टक्के झालं मतदान?
BMC Election 2026 Voting : लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे
भाजपच्या उमेदवाराच्या नावाच्या पाट्या ठेवून मतदान केंद्र चालवलं जातंय
शाई पुसली का असा प्रश्न विचार केला पाहिजे. भाजप आणि त्यांच्या मंडळीने पुरेपूर प्रयत्न केला. दुबार मतदान असेल किंवा ईव्हीएमचा खेळ असेल. बाईचं नाव रवींद्र असेल का? अशी बातमी येतेय. पुरुष मतदारांच्या पुढे महिलेचे फोटो आहेत. निवडणूक आयुक्तांसमोर याच गोष्टी आम्ही ठेवल्या होत्या. आता शाई पुसण्याच्या तक्रारी येत आहेत. कल्याण-डोंबिवलीत तर भाजपच्या उमेदवाराच्या नावाच्या पाट्या ठेवून मतदान केंद्र चालवलं जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक जिंकण्यासाठी हा सर्व आटापिटा सुरू आहे. शाई पुसण्याचे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते. मला पत्रकारांनी विचारलं त्यावर मी म्हणालो, निवडणूक आयुक्त पगार कसला खात आहेत? चार वर्षानंतर निवडणुका होत आहेत, पण काही सुधारणा नाही. मग निवडणूक आयुक्त कसला पगार खातात?. तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत. उमेदवारांची नावे लिहून कल्याण-डोंबिवलीच्या बूथमध्ये अधिकारी बसले आहेत. मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस वेगळे असतात. जोपर्यंत मतदान पूर्ण होत नाही, तोपर्यंत मतपेट्या उघडत नाहीत. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभाग २०० ते २०६ मध्ये आज दुपारी ३ वाजताच टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्राँग रूममधून बाहेर काढण्याचे आदेश दिले. हा काय प्रकार आहे? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.
त्यांच्याकडे स्वतःचे कर्तृत्व नाही
संविधान म्हणते मतदान करा, निवडणूक आयोग म्हणतं करूनच दाखवा, मुख्यमंत्री त्यांचे घरगडी म्हणून निवडणूक आयुक्त काम करत आहेत की काय? की निवडणूक आयुक्तांना काहीच काम नाही? पैसे वाटले, सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. महायुतीने साम, दाम, दंड, भेद केला आहे, कारण त्यांच्याकडे स्वतःचे कर्तृत्व नाही. शाई पुसली जाते. ही शाई नाही, लोकशाही पुसली जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.