AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शिंदे गटात प्रवेश केला की काय? उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा पार पडला, या मोर्चानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शिंदे गटात प्रवेश केला की काय? उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 3:55 PM
Share

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देखील जाहीर करण्यात आली आहे, मात्र शासनानं जाहीर केलेलं हे पॅकेज अत्यंत कमी आणि फसवं असल्याची टीका आता विरोधकांकडून सुरू झाली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा पार पडला, या मोर्चानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?   

शेतकऱ्यांना पैसे का दिले जात नाहीत, पैशांची कमी वाटत असेल तर पीएम केअर फंडातून पैसे आणा, जुन्या पैशांची बेरीज करून हा आकडा तयार केला आहे,  हे फसवं पॅकेज आहे. आम्ही त्यावेळी एनडीआरएफच्या निकषाच्यावर पॅकेज दिलं होतं, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून देखील त्यांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

शहरभर त्यांनी होर्डिंग्ज लावली. बीकेसीत ब्रिटनचे पंतप्रधान आले होते. प्रचंड जाहिरात केली. मुंबई बरबटून टाकली. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शिंदे गटात प्रवेश केला की काय? असे पोस्टर्स लावले. जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करता. शेतकऱ्यांना का देत नाही हे पैसे. पॅकेज दिलं म्हणून त्यांचेच आमदार स्तुती करत आहेत. शेतकरी का करत नाहीत स्तुती असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, असं वक्तव्य मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं होतं, या वक्तव्याचा देखील उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नाद हा शब्द तुमच्याबद्दल आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांचं नुकसान खूप झालं आहे. अशा मंत्र्यांचं मानसिक संतुलन तपासलं पाहिजे. यांचे अनेक नाद आहेत. डान्सबारचा नाद आहे. एक एक येत आहेत बाहेर, असा हल्लाबोल देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..