AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दारांना 50 कोटी मिळाले, मीच जातो; मला किती मिळणार? उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

Uddhav Thackeray speech : आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात झाली आहे. आज यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात गद्दारांवर भाष्य केलं आहे.

गद्दारांना 50 कोटी मिळाले, मीच जातो; मला किती मिळणार? उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
Raj Thackeray Speech Image Credit source: X
| Updated on: Jan 23, 2026 | 10:05 PM
Share

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात झाली आहे. आज यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थितीत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या गद्दारीवरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

आपल्याला गद्दाराचा शाप लाभलेला आहे

उद्धव ठाकरे गद्दारीवर बोलताना म्हणाले की, ‘जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, शिवाजी महाराज आणि त्यांच्या आधी जर पाहिलं तर गद्दारी हा विषय आजचा नाहीये, तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. तो आपल्याला शापच लाभलेला आहे. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी जर आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता.’

मीही जातो, मला किती पैसे मिळणार…

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारी करणांना किती पैसे मिळाले? 50 खोके ना. मग मीच जातो ना मला किती मिळणार? असं केलं तर मला ठाकरेंच नाव घेता येणार नाही. मी नालायक म्हणून या घराण्यामध्ये जन्माला आलो हा शिक्का मी कधी लागू देणार नाही. माझ्या डोळ्यासमोर मुंबईचे तुकडे तोड असतील मी गप्प बसणार नाही. मुठभर असतील तर मुठभर, मुठभरांना घेऊन त्यांच्या छाताडावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. कुठलीही तडजोड करणार नाही.

या देशासाठी मरायला तयार हे आमचं हिंदुत्व आहे

हिंदूत्वावर बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ‘आमचं हिंदूत्व शेंडी जाणवांचं नाही, जो कुणी या देशासाठी मरायला तयार हे आमचं हिंदुत्व आहे. मी मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फोन उचलला की जय महाराष्ट्र म्हणायचे आणि आता जय महाराष्ट्र धोक्यात आला आहे. आजपासून जय महाराष्ट्र बोलायला सुरु करा. आम्हाला संस्कार आणि हिंदूत्व कुणी शिकवू नये. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झाला नाही तर मराठी माणसांच्या हक्कासाठी झाला आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.