Video : स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांची पोलिसांसमोरच दंडुकेशाही, जिल्हा अभियंत्याला लावले खोदकाम!

घरासमोरील नळ कनेक्शनचं काम करण्यासाठी रविकांत तुपकरांनी थेट जिल्हा अभियंत्यालाच खड्ड्यात उतरवलं.

Video : स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांची पोलिसांसमोरच दंडुकेशाही, जिल्हा अभियंत्याला लावले खोदकाम!
रविकांत तुपकरांनी दंडुक्याच्या धाकात जिल्हा अभियंत्याकडून काम करुन घेतले


गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा : शेतकरी आंदोलनात नेहमी आक्रमक दिसणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या मुशीत तयार झालेल्या तुपकरांनी अनेकदा अधिकाऱ्यांना धारेवर धरुन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याचं पाहायला मिळालं. पण आता तुपकरांनी दंडुकेशाहीचा वापर करत एका जिल्हा अभियंत्याला खोदकामाला लावल्याचं पाहायला मिळालं. घरासमोरील नळ कनेक्शनचं काम करण्यासाठी तुपकरांनी थेट जिल्हा अभियंत्यालाच खड्ड्यात उतरवलं. (Ravikant Tupkar’s Dadagiri, got the pipe connection work done by the District Engineer)

तुपकर यांचा हा व्हिडीओ 10 मे रोजीचा असल्याचं सांगितलं जात आहे. तुपकर यांच्या घरासमोरील पाईपलाईनमधून नळ कनेक्शन घेण्यात आलं. मात्र त्या नळाला पाणी येत नव्हतं. तसंच घरासमोरील खड्डा तसाच खोदून ठेवला होता. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास होत होता. त्याबाबत तुपकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कंत्राटदारासह जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे अनेकदा तक्रार केली. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या तुपकरांनी 10 मे रोजी बुलडाण्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कंत्राटदारासह जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता आर. एन. भिलवडे यांना गाडीत बसवून आणले. त्यावेळी तुपकरांच्या हातात एक दंडुका असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Ravikant Tupkar

रविकांत तुपकरांनी दंडुक्याच्या धाकात जिल्हा अभियंत्याकडून काम करुन घेतले

पोलिसांसमोर तुपकरांची दंडुकेशाही!

तुपकर यांनी जिल्हा अभियंत्यांना शिविगाळ केल्याचंही बोललं जात आहे. इतकंच नाही तर त्यांनी जिल्हा अभियंता भिलवडे यांना नळाच्या खड्ड्यात उतरवून काम करवून घेतलं. महत्वाची बाब म्हणजे जेव्हा हा प्रकार घडत होता, त्यावेळी बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी घटनास्थळावर हजर होते. दरम्यान, याबाबत भिलवडे यांना विचरलं असता हे प्रकरण तेव्हाच संपलं असून, याबाबत आपल्याला काही बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

इतर बातम्या :

5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, 18 जिल्ह्यातून लॉकडाऊन उठवला, तुमचा जिल्ह्यातील लॉकडाऊन कधी उठणार?

Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात 5 टप्प्यात शिथीलता देणार

Ravikant Tupkar’s Dadagiri got the pipe connection work done by the District Engineer

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI