Vinayak Raut : ‘Shivjayantiवरून Amol Mitkari यांनी गोंधळ निर्माण करू नये’

Vinayak Raut : ‘Shivjayantiवरून Amol Mitkari यांनी गोंधळ निर्माण करू नये’

| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 5:17 PM

शिवसेनेची (Shivsena) शिवजयंती (Shivjayanti) तिथीनुसारच साजरी केली जाते. अमोल मिटकरी यांना आमची विनंती आहे, की तुम्ही गोंधळ निर्माण करू नका, असे शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले आहेत.

शिवसेनेची (Shivsena) शिवजयंती (Shivjayanti) तिथीनुसारच साजरी केली जाते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही चालू केली. प्रथा देशभर आणि जगात पाळी जाते. अमोल मिटकरी यांना आमची विनंती आहे, की तुम्ही गोंधळ निर्माण करू नका, असे शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले आहेत. शासनाने जन्मतारीख शोधून काढली. त्यानुसार शासन शिवजयंती साजरी करेल. पण शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी, ही शिवप्रेमींच्या मनात आहे. त्याप्रमाणे ते साजरे करत आहेत. शिवजयंतीला शिवसेनेचा संकल्प आहे. शिवसैनिक, शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है, यासाठी शिवसंकल्प अभियान राबवत असल्याचे ते म्हणाले. अडीच वर्षात जे केले ते जनतेसमोर आहे. देवेंद्र फडणवीस यांना जे जमले नाही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करून दाखवले. त्यामुळे सातत्याने शिवसेनेला टार्गेट केले जात आहे आणि एमआयएम पिल्लू सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपाची कपटनीती आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.