AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे संविधान वाचवणार? मतं फुटल्याने प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर खोचक टीका

विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसची ८ मते फुटल्याने आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील काँग्रेसवर टीका केली आहे. संविधान हे लोकं कसे वाचवणार आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हे संविधान वाचवणार? मतं फुटल्याने प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर खोचक टीका
| Updated on: Jul 12, 2024 | 10:33 PM
Share

विधानपरिषद निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवारी निवडून आले आहेत. भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेनेचे 2 उमेदवार असे महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची 8  मतं फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे ठाकरे गट आणि शरद पवार गटाला महायुतीची मतं फोडण्यात अपयश आलंय. निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 8 आमदारांनी महायुतीला क्रॉस व्होटींग केले. काँग्रेसने दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसींना मुर्ख बनवले आणि त्यांचा वापर केला. तरीही हे लोक संविधान वाचवणार आहेत असे तुम्हाला वाटते?

प्रकाश आंबेडकर यांचे ट्विट

”Congress’ at least 8 MLAs cross-voted for BJP-led Mahayuti in the Maharashtra MLC elections. BJP = Congress Congress fooled and used Dalits, Adivasis, Muslims and OBCs. आपको अभी भी लगता है कि ये लोग संविधान बचाने वाले हैं?”

विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळाले होते. काँग्रेस सोडून सगळ्याच पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवले होते. दगाफटका होऊ नये म्हणून सगळ्याच पक्षांनी काळजी घेतली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नसल्याने आमदार फुटल्याची टीका त्यांनी केली आहे.

भाजप

योगेश टिळेकर – 26 मते पंकजा मुंडे – 26 मते परिणय फुके- 26 मते अमित गोरखे – 26 मते सदाभाऊ खोत – 24 मते

शिवसेना

भावना गवळी कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर

काँग्रेस

प्रज्ञा सातव – 26

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

मिलिंद नार्वेकर

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन मिळाले होते. पण त्यांना फक्त १२ च मते मिळू शकली. त्यामुळे त्यांचा पराभव झालाय.

प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.