AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटे 4 वाजल्यापासून रुग्णांना तपासायचे, फक्त 2 रुपये फी घ्यायचे, गरीबांच्या डॉक्टरचं निधन, मुख्यमंत्री म्हणाले…

2 रुपयांवाले डॉक्टर डॉ. ए.के रायारू गोपाल यांचे केरळमधील कन्नूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच लोकांनी त्यांच्य घराबाहेर गर्दी केली. डॉ. ए.के रायारू गोपाल हे 80 वर्षांचे होते आणि त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

पहाटे 4 वाजल्यापासून रुग्णांना तपासायचे, फक्त 2 रुपये फी घ्यायचे, गरीबांच्या डॉक्टरचं निधन, मुख्यमंत्री म्हणाले…
rairu gopal
| Updated on: Aug 04, 2025 | 9:37 AM
Share

केरळमधून एक दुखद बातमी पुढे येतंय. केरळमधील कन्नूर येथील “दोन रुपयांचे डॉक्टर” यांचे निधन झालंय. त्यांनी आयुष्यभर रूग्णांवर फक्त दोन रूपयांमध्ये उपचार केले. दोन रूपये त्यांची फिस असतं. होतकरू आणि गरीब रूग्णांना ते फ्रीमध्ये गोळ्या देखील देत. डॉ. ए.के रायारू गोपाल यांचे शनिवारी केरळमधील कन्नूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच लोकांनी त्यांच्य घराबाहेर गर्दी केली. डॉ. ए.के रायारू गोपाल हे 80 वर्षांचे होते आणि त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

विशेष म्हणजे त्यांचे दोन रूपये फिस असणारे रूग्णालय हे 2024 पर्यंत सुरू होते. त्यानंतर तब्येतीमुळे रूग्णालय बंद केले. निःस्वार्थ सेवेचा वारसा मागे सोडत त्यांनी असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे. कन्नूर येथील त्यांच्या निवासस्थानी एक छोटेसे क्लिनिक ते चालवत होते. विशेष म्हणजे ते मागच्या पाच दशकांपासून गरीब लोकांना सेवा देण्याचे काम करत होते. डॉ. ए.के रायारू गोपाल यांचे नाव लोकांनीच दोन रुपयांचे डॉक्टर असे ठेवले होते.

डॉ. ए.के रायारू गोपाल यांच्या रूग्णालयाची खास गोष्ट म्हणजे सकाळी 4 वाजताच हे रूग्णालय सुरू होत. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत सुरू असायचे. डॉ. गोपाल हे दिवसभरात 300 पेक्षाही अधिक रूग्णांची तपासणी करत. ज्या लोकांकडे आैषधे घेण्यासाठी पैसे नसत त्यांना ते फ्रीमध्येच आैषधे देऊन घरी पाठवत. आजारी असल्यास शालेय मुले त्यांच्याकडे दाखवून मग शाळेत जात होती.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी डॉ. गोपाल यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी डॉ. गोपाल यांचे वर्णन लोकांचे डॉक्टर असे केले आणि म्हटले की, इतक्या कमी शुल्कात सेवा देण्याची त्यांची तयारी गरीब रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी होती. डॉ. गोपाल यांच्या निधनाची बातमी कळताच लोक त्यांच्या घरी मोठ्या संख्येने पोहोचले होते. डॉ. गोपाल यांच्या निधनानंतर मोठा आधार गेल्याची भावना लोकांमध्ये आहे.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.