Hariyana Crime: हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, राहुलच्या शरीरावर 18 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. अहवाल आणि व्हिडिओ क्लिपच्या आधारे आणि फिर्यादीच्या इतर वक्तव्यानंतर आम्ही एफआयआरमध्ये खुनाची कलमे जोडली आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Hariyana Crime: हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 21, 2021 | 1:31 AM

गुडगाव : मुस्लिम असल्याच्या कारणावरुन एका 22 वर्षीय तरुणाची त्याच्या तीन मित्रांनी जबर मारहाण करीत कथित हत्या केल्याची घटना हरियाणातील पलवल येथे 14 डिसेंबर रोजी घडली. राहुल खान असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आकाश उर्फ ​​दिलजले, विशाल आणि कलुआ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मद्यधुंद अवस्थेत झालेल्या भांडणानंतर राहुल खानची हत्या केल्याचे आरोपींनी मान्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कथित व्हिडिओमध्ये आरोपी तरुणाला मारहाण करीत आहेत

घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये, आरोपी पीडित तरुणाच्या चेहऱ्यावर वारंवार काठीने हल्ला करताना दिसत आहेत आणि ते बोलत आहेत की तो मुस्लिम आहे, तर आरोपी हिंदू आहेत. 31 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये पीडित तरुणाचा चेहरा आणि कपडे रक्ताने माखलेले दिसत आहेत. आरोपींनी वारंवार केलेल्या हल्ल्यांमुळे तो जमिनीवर पडतो, तेव्हा एक आरोपी म्हणतो की तो मेला आहे.

“आतापर्यंत पीडित तरुणाच्या कुटुंबाने त्यांच्या तक्रारीत या प्रकारच्या जातीय स्वरूपाच्या हल्ल्याचा काहीही उल्लेख केलेला नाही किंवा तपासात काहीही समोर आलेले नाही. ‘आमच्याकडे व्हिडिओ क्लिपची सीडी मिळाली आहे, ज्यामध्ये आरोपी तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत आणि तो मरेल, असे ते ऐकू येत आहे. आम्ही ही सीडी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवू, अशी माहिती पलवल डीएसपी (शहर) यशपाल खटाना यांनी सांगितले.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, राहुलच्या शरीरावर 18 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. अहवाल आणि व्हिडिओ क्लिपच्या आधारे आणि फिर्यादीच्या इतर वक्तव्यानंतर आम्ही एफआयआरमध्ये खुनाची कलमे जोडली आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

क्षुल्लक वादाचे पर्यावसन हत्येत झाले

‘पीडित तरुण आणि त्याचे मित्र होशंगाबादमध्ये एका लग्नाला गेले होते. रसुलपूर गावात परतल्यावर त्यांच्यात वाद झाला. ते मद्यपान करत असताना पीडित राहुलने कलुआचा मोबाईल लपवून ठेवला. कलुआचा फोन शोधला असता त्याचा फोन पीडितेकडे असल्याचे कळले. यावरून वाद सुरू झाला आणि रागाच्या भरात आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर, त्यांनी राहुलला कालव्यात नेले, तेथे त्यांनी त्याला पुन्हा रॉड आणि काठीने जबर मारहाण केली. यावेळी आकाशने घटनेची व्हिडीओ क्लिप बनवली.

स्वत:चा बचाव करण्यासाठी आरोपीने राहुलच्या कुटुंबीयांना फोन करून राहुल अपघातात जखमी झाल्याचे सांगितले. यानंतर राहुलच्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूपूर्वी त्याने आपल्या बहिणीला आपल्यासोबत मारहाण झाल्याचे सांगितले. मात्र त्यावेळी कुटुंबीयांना लक्षात आले नाही. 15 डिसेंबरला जेव्हा या घटनेचा व्हायरल व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी हत्येची तक्रार दाखल केली, असे राहुलच्या भावोजीने पोलिसांना सांगितले.

‘फेसबुक आणि इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. राहुलला कुऱ्हाड आणि दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्यांनी त्याचे अपहरण करून त्याला दारू पाजली. आम्हाला कळले की त्याचे मित्र त्याला पार्टीसाठी विचारत होते, पण तो नकार देत होता. कदाचित यावरून काही वैर असावे, असेही राहुलच्या भावोजी म्हणाला. (A Muslim youth was beaten to death by three friends in Palwal, Haryana)

इतर बातम्या

Thane Crime: मॅट्रिमोनी साईट्सवर तब्बल 41 महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ulhasnagar Crime: उल्हासनगरात कौटुंबिक वादातून एकाची हत्या, मुख्य आरोपी फरार तर दोन महिला आरोपींना अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें