BJP: ‘विचारधारा विसरु नका, देशात प्रादेशिक पक्षांसह सगळे राष्ट्रीय पक्ष संपतील, राहील फक्त भाजपा’, काय म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा?

लोकं काँग्रेसबाबत बोलतात. 40 वर्ष लागले तरी काँग्रेस भाजपासोबत उभी राहू शकत नाही. आत्ता भाजपा ज्या पद्धतीचा पक्ष आहे, तो दोन दिवसांत तयार झालेला नाही. हे सगळं संस्कारातून येतं आणि संस्कार कार्यालायतून येतो, असे त्यांनी सांगितले. आपल्या पक्षाची विचारधारा एवढी मजबूत आहे की नेते 20 वर्ष दुसऱ्या पक्षात राहिल्यानंतरही आपल्या पक्षात येत आहेत.

BJP: 'विचारधारा विसरु नका, देशात प्रादेशिक पक्षांसह सगळे राष्ट्रीय पक्ष संपतील, राहील फक्त भाजपा', काय म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा?
सगळे राजकीय पक्ष संपतील, फक्त भाजपाच राहिल-नड्डा
Image Credit source: social media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Jul 31, 2022 | 11:24 PM

पाटणा- देशातील सगळे राजकीय पक्ष (all political parties)संपतील आणि केवळ भाजपा (only BJP)राहील, असे वक्तव्य केले आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda)यांनी. भाजपाच्या विचारधारेवर असेच चालत राहिलो तर देशातील प्रादेशिक पक्षही संपुष्टात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. बिहारमध्ये भाजपाच्या 16 जिल्हा कार्यालयांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नड्डा पाटण्यात आले होते, त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी बिहारमधील 7 जिल्हा कार्यालयांचे भूमीपूजनही केले. नड्डा यवेळी म्हणाले की – भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढू शकेल असा कोणताही राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात नाही. आपली खरी लढाई ही घराणेशाही आणि वंशवादाशी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, काही मिळत नाही, काही मिळणारही नाही, पण तरीही पक्षात अनेक जण येत आहेत.

20 वर्ष दुसऱ्या पक्षात राहिलेले नेते येतायेत भाजपात

नड्डा पुढे म्हणाले की – लोकं काँग्रेसबाबत बोलतात. 40 वर्ष लागले तरी काँग्रेस भाजपासोबत उभी राहू शकत नाही. आत्ता भाजपा ज्या पद्धतीचा पक्ष आहे, तो दोन दिवसांत तयार झालेला नाही. हे सगळं संस्कारातून येतं आणि संस्कार कार्यालायतून येतो, असे त्यांनी सांगितले. आपल्या पक्षाची विचारधारा एवढी मजबूत आहे की नेते 20 वर्ष दुसऱ्या पक्षात राहिल्यानंतरही आपल्या पक्षात येत आहेत.

प्रत्येक ठिकाणी कार्यालयासाठी पंतप्रधान आग्रही

2014 साली जेव्हा भाजपाचे सरकार झाले होते, तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्यावेळी ते पक्षाच्या मिटिंगसाठी भाजपाच्या कार्यालयात आले होते. त्यांनी विचारले की, हे पक्षाचे कार्यालय हे सरकारी जमिनीवर आहे. सरकारी मालमत्ता आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाच्या कार्यालयाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, असेही नड्डा यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संकल्प दिला होता की, आपला मोठा पक्ष आहे, तर आपले कार्यालय का असू नये, प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्हा ठिकाणी आपले कार्यालय असायला हवे. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष अमित शाहा यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी भाजपाने 750 जिल्हे निश्चित केले होते. त्यातील 250 कार्यालये आज उभी आहेत. 512  कार्यालयांचे काम सध्या सुरु आहे, अशी माहितीही नड्डा यांनी यावेळी दिली.

पार्टीचे कार्यालय संस्कार केंद्र

नड्डा यांनी यावेळी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. 1972-74 च्या काळात एका भाड्याच्या घरात भाजपाचे कार्यालय होते, असे त्यांनी सांगितले. जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर आत्ताचे कार्यालय दिल्लीत झाल्याची आठवणही त्यांनी करुन दिली. आजही त्याला ऑफिस म्हणत नाही, कार्यालय म्हणतो असे त्यांनी सांगितले. कार्यालय हे संस्कार देण्याचे केंद्र असल्याचेही नड्डा यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

लोकशाहीत प्रादेशिक पक्षही राहतील, जेडीयूचा पलटवार

जे पी नड्डा यांच्या या वक्तव्यावर बिहारमध्ये भाजपासोबत सत्तेत असेलल्या संयुक्त जनता दलाने प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय पक्ष जर जनतेच्या अपेक्षा पूर्म करु शकले नाहीत, तर स्वाभाविपणे प्रादेशिक पक्षांचा उदय होईल, अशी प्रतिक्रिया जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी दिली आहे. प्रादेशिक पक्षांमुळेच आघाडी, युती करणे गरजेचे झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रादेशिक पक्षच स्थानिक जनतेच्या आशा आकांक्षा पूर्म करु शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशात लोकशाही असल्याने स्वाभाविक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षा राहतील, असेही ते म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें