मोठी बातमी! भारताचा मास्टरस्ट्रोक, 500 टक्के टॅरिफची धमकी देणाऱ्या अमेरिकेला शिकवला धडा, ट्रम्प हात चोळत बसले
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं भारतावर आधीच 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्यात पुन्हा एकदा डोनाल्ड ट्र्म्प यांनी 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे, याच दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे.

जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक फोन केला असता तर आतापर्यंत कदाचित भारत आणि अमेरिकेमध्ये बिझनेस डील झाली असती असं वक्तव्य अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी केलं आहे. ते पुढे बोलताना असं देखील म्हटले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला कॉल करतील अशी ट्रम्प यांना अपेक्षा होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना कॉलच केला नाही. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेमध्ये एका मोठ्या व्यापारी करारासंदर्भात बोलणी सुरू होती, सर्व गोष्टी सुरळीत झाल्या असत्या तर डिसेंबर 2025 मध्ये हा व्यापारी करार झाला असता, मात्र असं होऊ शकलं नाही, असंही लुटनिक यांनी म्हटलं आहे.
लुटनिक यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना असं देखील म्हटलं की, संपूर्ण डील सेट झाली होती. मात्र कोणत्याही डीलवर डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:च निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना अशी अपेक्षा होती की मोदी आपल्याला फोन करतील, परंतु मोदींनी त्यांना फोन केला नाही. लुटनिक यांनी हे देखील मान्य केलं आहे की, डील फायनल झाल्यानंतर देखील अमेरिकेनं त्यातील काही गोष्टींमध्ये बदल केला. भारतानं आम्हाला म्हटलं की तुम्ही तर आधी ठरलेल्या डीलवर सहमत होतात, तेव्हा मी त्यांना म्हटलो तेव्हा त्या गोष्टी ठरल्या होत्या पण आता नाही. दरम्यान त्यानंतर भारतासोबत डीलवर बोलणी सुरू असतानाच अमेरिकेनं इंडोनेशिया, फिलिपाईन्स आणि व्हियतनामसोबत डील केली.
पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना कॉल न केल्यामुळे ही डील होऊ शकली नाही असं अमेरिकेनं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे ट्रम्प यांना जगभरात बढाई मारण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळेच दुखावलेल्या ट्रम्प यांनी आता भारतावर 500 टक्के टॅरिल लावण्याची धमकी दिली आहे, असं देखील बोललं जात आहे.
मोदींनी ट्रम्प यांना कॉल का केला नाही?
डोनाल्ड ट्रम्प यांचं आधीचं रेकॉर्ड पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय सावध पाऊल टाकलं. ट्रम्प हे अनेकदा घाई-घाईमध्ये आपलचं म्हणण खंर करण्याचा प्रयत्न करतात. जपान आणि ब्रिटिनला तसा चांगलाच अनुभव आला आहे, ट्रम्प यांना अशी कोणतीही संधी मोदी देऊ इच्छित नव्हते, त्यामुळे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना फोनच केला नाही अशी चर्चा सुरू आहे.
