AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया यूक्रेन युद्धासाठी मोठा दिवस, पंतप्रधान मोदी आज पुतीन यांच्याशी बोलणार, काय रिझल्ट मिळणार?

आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनद्वारे चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या जगाचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे,

रशिया यूक्रेन युद्धासाठी मोठा दिवस, पंतप्रधान मोदी आज पुतीन यांच्याशी बोलणार, काय रिझल्ट मिळणार?
मोदी पुतीन यांच्यात तासभर चर्चाImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 12:53 PM
Share

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज बारावा दिवस आहे. रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर मिसाईल हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये युक्रेनची शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनने शस्त्रे खाली ठेवावीत व आमच्या मागण्या मान्य कराव्यात तर आम्ही युक्रेनमधून सैन्य माघारी बोलावू असा इशारा रशियाने राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनला दिला आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्र युद्धबंदीसाठी रशियावर दबाव निर्माण करत आहेत. रशियावर घालण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांचा मोठा फटका हा जागतिक बाजारपेठेला बसला आहे. कच्चे तेल प्रति बॅरल 130 रुपयांवर पोहोचले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधणार आहेत. पुतीन आणि मोदी यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे आता अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

मोदी, पुतीन चर्चा महत्त्वाची

मोदी आणि पुतीन यांच्या चर्चेला महत्त्व प्राप्त होण्याचे कारण देखील खास आहे. या युद्धात भारताने मध्यस्ती करावी अशी मागणी काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या पंतप्रधानांनी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर या बैठकिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुतीन आणि मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा होणार हे पाहंण आता महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी देखील युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा प्रश्न चर्चेद्वारे सोडवला जावा अशी भूमिका भारताने घेतली होती.

भारताची तटस्थ भूमिका

भारताने रशिया युक्रेन युद्धात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत युद्धबंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावात रशियाच्या बाजून एकून बारा मते पडली. तर चीन भारत आणि युएईने तटस्थ राहाने पसंत केले. भारताने रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करावी अशी मागणी युक्रेनकडून करण्यात आली आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवला जावा अशी भूमिका भारताची आहे. त्यामुळे आता रशिया, युक्रेन युद्ध, रशियावर अमेरिका आणि इतर देशांनी लादलेले आर्थिक निर्बंध, निर्बंधांचा जागतिक बाजारपेठेवर होणारा परिणाम  अशा सर्वच विषयांवर मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते.

संबंधित बातम्या

Big News: भारताचे पॅलेस्टाईनमधले राजदूत मुकूल आर्य यांचा संशयास्पद मृत्यू, घटनेची चौकशी सुरु, घात की नैसर्गिक मृत्यू?

J&K Attack : जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; पोलिसासह 23 नागरिक जखमी, एकाचा मृत्यू

PM Modi in Pune: पुणेकरांच्या सेवेत 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ताफ्याचे लोकार्पण

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.