स्वत: खासदार, वडील कॅबिनेट मंत्री, कॉलेज, प्रेम आणि आता फारकत, वाचा आजची चर्चित स्टोरी

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कन्या आणि बदायूच्या भाजप खासदार संघमित्रा मौर्य (Badaun MP Sanghmitra Maurya) यांचा घटस्फोट झालाय.

स्वत: खासदार, वडील कॅबिनेट मंत्री, कॉलेज, प्रेम आणि आता फारकत, वाचा आजची चर्चित स्टोरी
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 5:58 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कन्या आणि बदायूच्या भाजप खासदार संघमित्रा मौर्य (Badaun MP Sanghmitra Maurya) यांचा घटस्फोट झालाय. त्यांनी पती कँसर सर्जन डॉ. नवल किशोर शाक्य (Dr. Naval Kishore Shakya) यांच्यापासून घटस्फोट (Divorce) घेतला. दोघांमध्ये मतभेद तयार झाल्याने ते मागील 8 वर्षांपासून वेगवेगळे राहत होते. अखेर 19 जानेवारी 2021 रोजी हिंदू विवाह कायदा – 1955 च्या आधारे दोघांच्या घटस्फोटाला मंजूरी मिळाली. खासदार संघमित्रा मौर्यने 21 डिसेंबर 2017 रोजी लखनौ कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता (BJP MP Sanghmitra Maurya take divorce from husband Dr. Naval Kishore Shakya).

विशेष म्हणजे संघमित्रा मौर्य यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाच्या काळात झालेल्या प्रेमानंतर विवाह केला होता. मात्र, या प्रेमविवाहात खूप लवकर तडा गेला आणि कॉलेजमधील या प्रेमी जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. संघमित्रा मौर्य आणि डॉ. नवल किशोर शाक्य 2003 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. त्यावेळी दोघेही लखनौच्या ईरा मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चं शिक्षण घेत होते. येथूनच दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. संघमित्रा मौर्य आणि डॉ. नवल किशोर शाक्य यांचं लग्न 3 जानेवारी 2010 रोजी लखनौच्या बाबू बनारसी दास अकॅडमीत झालं. या लग्नाला तत्कालीन मुख्यमंत्री मायावती देखील आल्या होत्या.

कोण आहेत खासदार संघमित्रा मौर्य?

संघमित्रा मौर्य यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला 2011 मध्ये कासगंज जनपदच्या सिढपुरा येथून सुरुवात केली. 2012 मध्ये संघमित्रा यांनी अलीगंज विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढली. 2014 मध्येही त्यांनी बसपाच्या तिकिटावर मैनपुरी येथून मुलायम सिंह यादव यांच्याविरोधात निवडणूक लढली. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यावेळी त्यांचे वडील स्वामी प्रसाद मौर्य हे देखील बसपामध्येच होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर बदायूं लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आणि जिंकल्या.

कोण आहेत डॉ. नवल किशोर शाक्य

डॉ. नवल किशोर शाक्य एक प्रसिद्ध कँसर सर्जन आहेत. गरजुंना मदत करण्यासाठी शाक्य ओळखले जातात. लॉकडाउनच्या काळातही त्यांनी अनेकांना मदत केली. डॉ. नवल किशोर शाक्य बौद्ध धर्म मानतात. लखनौ आणि कायमगंजमध्ये त्यांचे लक्ष्य कँसर रुग्णालय नावाने दोन रुग्णालयं आहेत. शाक्य आधी बसपाचे सदस्य होते, मात्र 2018 मध्ये त्यांनी सपाचं सदस्यत्व स्वीकारलं.

हेही वाचा :

Kim Kardashian Divorce | अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशियनचा घटस्फोटासाठी अर्ज

पत्नी खर्रा खाते हे घटस्फोटासाठी पुरेसे कारण नाही, नागपूर खंडपीठाचा पतीला दणका

नातं टिकवण्यात टॉपर अपयशी, IAS कपल टीना दाबी आणि अतहर खान यांचा घटस्फोटासाठी अर्ज

व्हिडीओ पाहा :

BJP MP Sanghmitra Maurya take divorce from husband Dr. Naval Kishore Shakya

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.