एक तांत्रिक अन् तिघांचा खेळ खल्लास… पैशांच्या लोभापोटी भयंकर कांड, त्या रात्री काय घडलं?
Black Magic Case : आपल्या देशात अजूनही अंधश्रद्धा कायम आहे, छत्तीसगडमधील कोरबा येथे एका तांत्रिकाच्या नादाला लागून तिघांनी आपला जीव गमावला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत 21 शतकात विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र देशात अजूनही अंधश्रद्धा कायम असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशातच आता छत्तीसगडमधील कोरबा येथे एका तांत्रिकाच्या नादाला लागून काळी जादू आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली तीन व्यावसायिकांचा मृत्यू झाला आहे. या तिघांना पैशांचा पाऊस पडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पाच लाख रूपये एका रात्रीत अडीच कोटी रुपये होतील असं या तिघांना सांगण्यात आलं होतं. मात्र आता या तिघांचाही मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच या प्रकरणातील तांत्रिक आरोपी राजेंद्र कुमार उर्फ बैगा याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांना सुरूवातीच्या तपासात असे आढळले आहे की, जादूटोणा करणाऱ्या बैगाने भंगार विक्रेता मोहम्मद अशरफ मेमन, दुधाचा व्यवसाय करणारा सुरेश साहू आणि दुर्ग येथील नितीश कुमार यांना तंत्र मंत्राद्वारे संपत्ती वाढवण्याचे आश्वासन दिले होते. या तिघांना 5 लाख रुपयांचे अडीच कोटी रुपये बनवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी त्यांना कुद्री येथील एका फार्महाऊसवर बोलावण्यात आले होते. येथे धार्मिक विधी करण्यात आला आणि इथेच या तिघांचा मृत्यू झाला आहे.
तिघांच्या मानेवर ओरखडे
पोलिसांना प्राथमिक तपासात या तिघांच्या मृतदेहांच्या मानेवर गळा दाबल्याच्या खुणा आणि ओरखडे आढळून आले आहेत. त्यामुळे या तिघांचा गळा दाबून खून करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या तिघांना विष देऊन संपवल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या हत्येमागचे खरे कारण समोर येणार आहे. तसेत ज्या व्यक्तीने मृतदेह रुग्णालयात नेते तो व्यक्तीही संशयास्पद असल्याचे तिघांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 11 च्या सुमारास हा तांत्रिक विधी सुरू झाला होता. आरोपी राजेंद्र, तीन-चार साथीदारांसह अगरबत्ती, लिंबू, मंत्राची पुस्तके, दोरी, चाकू आणि इरत साहित्य घेऊन फार्महाऊसवर आला. या ठिकाणी तिन्ही तरुणांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकड एक लिंबू देण्यात आले आणि दोरीने जमिनीवर एक वर्तूळ आखण्यात आले.
तिघांचे मृतदेह आढळले
मंत्रोच्चार केल्यानंतर आणि धूप जाळल्यानंतर या खोल्या 30 मिनिटे ते 1 तासापर्यंत बंद ठेवण्यात आल्या. यामुळे पैसे वाढतील असे सांगण्यात आले. मात्र जेव्हा दरवाजे उघडले तेव्हा तिन्ही व्यक्तींचा मृत्यू धाला होता. यातील एका मृतदेहाच्या तोंडात एक लिंबू देखील आढळले आहे. आता या बंद खोल्यांमध्ये . संपूर्ण विधी सुमारे दोन तास चालला आणि बंद खोल्यांमध्ये हत्या झाल्याचा संशय आहे. आता राजेंद्र बैगाला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिस बैगाच्या इतर साथीदारांच्या शोधात आहे.
