बायकोकडून नवरा पोटगी मागू शकतो का? कायदा काय सांगतो?
आलोक मौर्य आणि ज्योती मौर्य या प्रकरणामुळे भारतीय दंड संहिता आणि हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत पोटगीच्या तरतुदींवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या तरतुदींबद्दल सविस्तरपणे समजावून घेऊयात..

उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. अधिकारी झाल्यानंतर ज्योती मौर्य यांनी त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. आजमगडच्या कौटुंबिक न्यायालयात पोटगीची याचिका फेटाळल्यानंतर आलोक यांनी आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. घटस्फोटानंतर सहसा पतीकडून पत्नीला पोटगी दिली जाते. परंतु या प्रकरणात आलोक यांनी त्यांच्या अधिकारी पत्नीकडून पोटगीची मागणी केली आहे. या अर्जावर उच्च न्यायालयाने ज्योती मौर्य यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने 8 ऑगस्टची तारीख निश्चित केली आहे. या प्रकरणामुळे एक महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे.. घटस्फोटानंतर पतीला पत्नीकडून पोटगी मिळू शकते का? पोटगीसाठी पती दावा करू शकतो का? ...
