CJP Jantar Mantar Protest LIVE : महाराष्ट्राचा मुलगा दिल्लीकडे निघाला, दीपकेने व्यवस्थेसमोर निर्माण केलं चॅलेंज, त्याला रोखण्यासाठी…
CJP Jantar Mantar Delhi Protest LIVE Updates in Marathi : राजधानी दिल्लीतील वातावरण तापलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचं इथे आंदोलन होणार आहे. दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे. रेल्वे, मेट्रो बंद आहेत. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती चिघळू नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
CJP Jantar Mantar Protest Live Updates : हे इमर्जन्सीपेक्षा पण वाईट
इमर्जन्सीमध्ये सुद्धा इंदिरा गांधी यांनी रेल्वे बंद केल्या नव्हत्या. हे इमर्जन्सीपेक्षा पण वाईट आहे . आम्हाला प्रतिसाद मिळतोय म्हणूनच त्यांनी मेट्रो, रेल्वे बंद केल्या आहेत. नाहीतर कशाला घाबरले असते?. पंतप्रधानांनी देशासमोर असं का वागावं?. याचा लोकांना त्रास होणार नाही का? अजून अडचणी वाढवताय अशी टीका अभिजीत दीपके यांनी केली.
-
CJP Jantar Mantar Protest Live Updates : दिल्लीला इंडिया-पाकिस्तान बॉर्डर बनवून टाकलय – अभिजीत दीपके
मला ताब्यात घ्यायचं आहे, घेऊन टाका. मला भिती नाही. नरेंद्र मोदी रेल्वे, मेट्रो बंद करतायत. दिल्लीला इंडिया-पाकिस्तान बॉर्डर बनवून टाकलय. तुमच्या देशातले नागरिक आहेत, देशातली मुलं आहेत. एवढी पोलीस फोर्स कशाला कशासाठी लावता? नरेंद्र मोदींना एवढी भिती वाटत असेल तर राजीनामा देऊन टाकावा असं अभिजीत दीपके म्हणाले.
-
-
CJP Jantar Mantar Protest Live Updates : शांतीपूर्ण मार्गाने मार्च करणार आहोत
आम्ही शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन करणार आहोत. जंतर-मंतरवर आर्टिकल 19 नुसार अधिकृत आंदोलनाची परवानगी आहे. देशातील निवडणूक प्रक्रियेविरोधात आंदोलन करणार आहोत. शांतीपूर्ण मार्गाने मार्च करणार आहोत असं अभिजीत दीपके आंदोलनापूर्वी म्हणाले.
-
CJP Jantar Mantar Protest Live Updates : नरेंद्र मोदी तानाशाहा – अभिजीत दीपके
नरेंद्र मोदी तानाशाहा आहेत. घाबरले आहेत म्हणून त्यांनी रेल्वे, मेट्रो, रस्ते सर्व बंद करून टाकलेले आहेत. जर नरेंद्र मोदीला या देशातील युवकांची, जनतेची एवढी भीती वाटते तर प्रधानमंत्रीच्या खुर्चीवर कशाला बसलेत अशी टीका अभिजीत दीपके यांनी केली.
-
CJP Jantar Mantar Protest Live Updates : दिल्लीला छावणीचं स्वरुप
कॉकरोच जनता पार्टीचं आज जंतर मंतरवर आंदोलन आहे. जंतर मंतरवर आंदोलनासाठी लोक येऊ लागले आहेत. दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. सरकार, प्रशासनाने आंदोलन हाताबाहेर जाऊ नये यासाठी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
#WATCH | Delhi: Security tightened, and barricades put up at Jantar Mantar ahead of the protest today. https://t.co/9CcWs0nzZO
— ANI (@ANI) October 10, 2026
-
-
CJP Jantar Mantar Protest Live Updates : अभिजीत दिपके मुंबई विमानतळावर पोहोचले
अभिजीत दिपके मुंबई विमानतळावर पोहोचले. काही वेळात दिल्लीला होणार रवाना. दिल्ली येथील जंतर मंतरवर होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे आज दिल्लीला जाणार आहेत. सकाळी आठ वाजता एअर इंडियाच्या विमानाने ते दिल्लीसाठी रवाना होतील. काही वेळापूर्वीच अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ऑन द वे टू एअरपोर्ट अस मेसेज टाकून आपण दिल्लीला जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र पोलिस अभिजित दीपके यांना मुंबईतच डिटेन करणार का ? हे देखील पाहावं लागेल.
CJP Jantar Mantar Protest in Delhi Live Updates and News in Marathi : कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. पोलिसांनी सीजेपीला जंतर-मंतरवर आंदोलनाची परवानगी दिलेली नाही. तिथे निषेधाज्ञा लावण्यात आली आहे. दुसरीकडे मोठ्या संख्येने लोक या आंदोलनासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन 57 मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आले आहेत. दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या अनेक ट्रेन्सना रद्द करण्यात आलं आहे. अभिजीत दीपके हे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. हजारो पोलीस, जवान रस्त्यावर तैनात आहेत. विरोधी पक्षांनी सीजेपीच्या या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. सीजेपीच्या या आंदोलनाशी संबंधित प्रत्येक अपडेट या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Published On - Oct 10,2026 7:37 AM
