AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trains Colours: भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?

Colourful Indian Train: भारतीय रेल्वे रंगबिरंगी का असतात असा सवाल रेल्वे स्टेशन गेल्यावर अनेकदा पडतो. एखादी लाल रंगाची ट्रेन धावत जाते. तर अचानक निळ्या रंगाची रेल्वेसमोर येते. प्रवाशांसाठी या रंगाचे महत्त्व काय आहे?

Trains Colours: भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 16, 2026 | 4:05 PM
Share

Colourful Indian Train: रेल्वे स्टेशनवर गेल्यावर अनेक रंगबिरंगी रेल्वे आपले लक्ष वेधतात. काही ट्रेन या निळ्या रंगाच्या असतात तर काही लाल रंगाच्या असतात. काही रेल्वे हिरव्या पिवळ्या रंगात न्हाऊन निघतात. काही डब्यांना रंगसफेदी केलेली आढळते. काही डब्बे पांढऱ्या रंगांचे असतात. या रेल्वे आपले लक्ष वेधतात. पण या रेल्वेना हे रंग का देतात. एकच रंग का देत नाहीत. प्रवाशांसाठी या विविध रंगांच्या रेल्वेचा अर्थ काय आहे? या रंगामध्ये एक अर्थ दडलेला आहे. जेव्हा तुम्ही पुढील वेळी रेल्वे स्टेशनवर जाल तेव्हा हा अर्थ समजून घ्याल.

निळा रंग: पारंपारिक आणि विश्वासाचा प्रवास

देशात निळ्या रंगात न्हाऊन निघालेल्या ट्रेन या जुन्या असतात. त्यांना ICF कोच म्हटले जाते. या ट्रेन गेल्या कित्येक वर्षांपासून दूरचा, लांबचा पल्ला गाठत आहेत. अशा अनेक ट्रेन देशभरात धावतात. निळ्या कोचची रेल्वे ही खासकरून एक्सप्रेस असतात. त्या दूरच्या टप्प्यासाठी योग्य मानल्या जातात. त्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या विश्वासावर खऱ्या उतरल्या आहेत.

लाल ट्रेन: आधुनिकतेचा मिलाफ

गेल्या काही वर्षात लाल वा मरून रंगाच्या कोच सातत्याने नजरेस पडत आहेत. त्यांना LHB कोच म्हटले जाते. या कोच जुन्या कोचपेक्षा अधिक सुरक्षित, गतिशील आणि आरामदायक मानल्या जातात. या ट्रेनमधील प्रवास आरामदायक मानल्या जातो. लाल रंगाच्या ट्रेन या सुपरफास्ट आणि प्रीमियम सेवा देणार्‍या मानल्या जातात.

पांढरी ट्रेन: सुपरफास्ट ट्रेन

वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेचा नवीन चेहरा आहे. ही ट्रेन पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत आहे. यामध्ये इंजिन आणि कोच सोबत जोडलेले असतात. या रेल्वेचा डिझाईन आकर्षक होते. सुपरफास्ट आणि प्रीमियमचा अनुभव देणारी ही ट्रेन आहे. या रेल्वे हायटेक आहेत.

या रंगाचा अर्थ काय?

केवळ रंग पाहून रेल्वेची माहिती नाही मिळणार. कोणत्याही ट्रेनचा वेगवान, सुविधा आणि श्रेणी, त्याचे नाव, कोच टाईप, वेळापत्रकावरुन निश्चित होते. अर्थात प्रत्येक लाल ट्रेन नेहमी गतिवान असेल हे काही गरजेचे नाही. तर निळ्या रंगाची ट्रेन ही नेहमी संथगतीने चालेल असे नाही. त्यामुळे प्रवासात ट्रेनची माहिती घेऊनच आणि तिचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा लागतो.

Follow Us
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.