काँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर-गहलोत आमने सामने,राहुल गांधी तर म्हणतात, आता मलाच…!

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे वारे आता जोरदार वाहू लागले आहे. अशोक गेहलोत, शशी थरुर यांनी आता आपल्याकडे पक्षाची जबाबदारी द्या असंही नकळत पणे सांगत आहेत...

काँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर-गहलोत आमने सामने,राहुल गांधी तर म्हणतात, आता मलाच...!
महादेव कांबळे

|

Sep 20, 2022 | 12:08 PM

नवी दिल्लीः देशाच्या राजकारणात काँग्रेस अध्यक्ष (Congress President Election 2022) पदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाय्चा शर्यतीत अनेकांची नावं चर्चेत आली आहेत. सध्या या शर्यतीत अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि शशी थरूर (Shashi Tharur) यांची नावंही चर्चेत आली आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अनेक नेते आग्रही आहेत. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा विजयाचा मार्ग कय असावा त्यासाठी काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. ज्या प्रमाणे काँग्रेसने तयारी सुरू केली आहे, त्याप्रमाणेच इतर पक्षांनीही कंबर कसली आहे.

तर भाजप मात्र नरेंद्र मोदींचे काम आणि त्यांचेच नाव घेऊन भाजप निवडणूक लढवू शकते असाही निष्कर्ष लावला जात आहे. त्यामुळे भविष्यातील राजकारणासाठी काँग्रेसकडे महत्वाचा चेहरा असणे गरजेचे मानले जात आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची नावं या शर्यतीत महत्वाची मानली जात होती. तर दुसरीकडे मात्र राहुल गांधींच्या नावाचे ठरावही काय राज्यातून पास केले गेले आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत नवरात्रोत्सवामध्येच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे, तर शशी थरूर यांनीही आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.

शशी थरूर यांनी ही इच्छा सोनिया गांधींसमोर बोलून दाखवल्याचेही सांगितले जात आहे. त्यांच्या या भेटीनंतर सोनिया गांधींनीही काँग्रेसच्या अध्यक्षपदासासाठी काँग्रेसमधील कोणीही अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास स्वतंत्र असल्याचे म्हटले आहे.

तर काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाबाबत आपण इच्छुक नसल्याचे जाहीर केले होते. मात्र राहुल गांधी यांनी नुकतीच फेसबुक पोस्ट लिहिली होतीहा.

त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, जब नाव बीच मंझदार में फंस जाए, तब पतवार अपने हाथ में लेनी ही पड़ती है। न रुकेंगे, न झुकेंगे, भारत जोड़ेंगे। त्यामुळे राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची दावेदारी करतील आणि पक्षाची सूत्रे स्वत:च्या हातात घेतील, असाही त्याचा अर्थ काढला जात आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावे यासाठी सात राज्यातील काँग्रेस समित्यांनी ठराव पास केले आहेत. दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याऐवजी राहुल यांनी हे पद स्वीकारावे असा आग्रहही ते धरत आहेत.

सध्या काँग्रेसची अवस्था वाईट आहे. अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करुन काँग्रेसला पुन्हा नवी उभारी द्यावी असं ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

केरळमध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे, त्या यात्रेला बारा दिवस झाले असतानाच खलाशांसोबत झालेल्या स्पर्धेत राहुल ज्या बोटीमध्ये होते, ती बोट जिंकेलेली आहे मात्र आता त्यांची खरी लढत आहे ती 2024 च्या निवडणुकीत त्यामुळे त्याचे काय चित्र असणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें