अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांची ईडी कोठडी, असा काय युक्तिवाद झाला की कोर्टाला मुख्यमंत्र्यांना कोठडी सुनवावी लागली?

भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवून, सत्ता काबीज करणाऱ्या केजरीवालांना भ्रष्टाचाराच्या आरोपातच ईडीनं अटक केली. दिल्लीतल्या कथित दारु घोटाळा प्रकरणात ईडीनं केजरीवालांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना गुरुवारी रात्री ईडीने घरी जावून अटक केली. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात ईडीकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ईडीकडून कोर्टात अरविंद केजरीवाल यांच्या मोठे आरोप करण्यात आले. तसेच अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी त्यांची 10 दिवसांची कोठडी मागितली. कोर्टाने ईडीची मागणी मान्य करत 6 दिवसांची ईडी कोठडी केजरीवालांना बजावली आहे.

अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांची ईडी कोठडी, असा काय युक्तिवाद झाला की कोर्टाला मुख्यमंत्र्यांना कोठडी सुनवावी लागली?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 9:08 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून काल रात्री अटक करण्यात आली होती. कथिक मद्यविक्री घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांना रात्रभर ईडीच्या कार्यालयात राहावं लागलं. त्यानंतर त्यांना आज दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात दोन्ही बाजूने प्रचंड युक्तिवात करण्यात आला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. ईडीच्या युक्तिवादात अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्या 10 दिवस कोठडीची मागणी करण्यात आली. पण अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी ती मागणी फेटाळण्याची विनंती कोर्टापुढे केली.

कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईडी कोठडीबाबतचा निकाल काही काळासाठी राखून ठेवला. त्यानंतर आता कोर्टाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. हा दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षासाठी मोठा झटका आहे. आता अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात का? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ईडीचे कोर्टात केजरीवालांवर नेमके आरोप काय?

मद्य घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल मुख्य सूत्रधार आहेत. अरविंद केजरीवालांना निवडणुकीत फंड हवा होता. मद्य घोटाळा 100 नाही तर 600 कोटींचा आहे. गोवा निवडणुकीत मद्य घोटाळ्याचा पैसा वापरला गेला. गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले. गोव्याला 4 मार्गांनी पैसे पाठवले, यासाठी हवालाचाही वापर झाला. केजरीवालांनी इतर नेत्यांशी मिळून हा कट रचला, असा आरोप ईडीने आपल्या युक्तिवादातून केजरीवालांवर केला.

देशासाठी माझं जीवन समर्पित, केजरीवालांची प्रतिक्रिया

दुसरीकडे, मी जेलमध्ये राहो की बाहेर, देशासाठी माझं जीवन समर्पित असल्याची प्रतिक्रिया केजरीवालांनी कोर्टरुममध्ये जात असताना TV9ला दिलीय. केजरीवालांना अटक झाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं. त्यानंतर पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. घाबरलेल्या हुकूमशाहाला मृत लोकशाही बनवायची आहे. माध्यमांसह सर्व संस्था काबीज करणं, पक्ष फोडणं, कंपन्यांकडून हप्तेवसुली करणं, प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणं हे त्या ‘असुरी शक्ती’साठी कमी होतं. म्हणून आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट आहे. इंडिया आघाडी जोरदार प्रत्युत्तर देणार, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.

ज्यामुळं केजरीवालांना अटक झाली, तो कथित दारु घोटाळा काय?

  • दिल्ली सरकारनं 2021-22 साली दारुविक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं
  • सरकारी महामंडळांऐवजी दारु विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना दिले
  • दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारु वितरणाची जबाबदारी दिली
  • केजरीवाल सरकारनं म्हटलं की नव्या धोरणानं दारुचा काळाबाजार थांबला
  • नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली
  • मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्या आरोप विरोधकांचा आहे

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढून मुख्यमंत्री बनले

केजरीवालांच्या अटकेवरुन ज्येष्ठ समाजसेवक आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी अण्णा हजारेंनीही प्रतिक्रिया दिलीय. दारु नीतीमुळंच केजरीवालांना अटक झाली. चूक केली तर शिक्षा झालीच पाहिजे असं अण्णा हजारे म्हणाले आहेत. 2011मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अण्णा हजारेंसोबत केजरीवालही होते. अण्णांच्या स्टेजवरुन लढण्यापेक्षा आम आदमी पार्टी स्थापन करुन ते 3 वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. सरकारी दारु नीतीमध्ये घोटाळा आहे की नाही हे तपासानंतर स्पष्ट होईल. पण ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढून केजरीवाल मुख्यमंत्री झाले त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपात केजरीवालांना अटक झाली.

Non Stop LIVE Update
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.