AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मशिदीवर हल्ला झालाच नाही; अफवांना बळी पडू नका, त्रिपुराच्या उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

त्रिपुरामध्ये मशिदीवर झालेल्या कथीत हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटले. महाराष्ट्रात देखील गेले दोन दिवस तणावपूर्ण वातावरण आहे. अमरावतीमध्ये हिसांचार उफाळला होता. दरम्यान या प्रकरणावर आता त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मशिदीवर हल्ला झालाच नाही; अफवांना बळी पडू नका, त्रिपुराच्या उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 8:04 AM
Share

नवी दिल्ली – त्रिपुरामध्ये मशिदीवर झालेल्या कथीत हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटले. महाराष्ट्रात देखील गेले दोन दिवस तणावपूर्ण वातावरण आहे. अमरावतीमध्ये हिसांचार उफाळला होता. दरम्यान या प्रकरणावर आता त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्रिपुरा घटनेनंतर महाराष्ट्रात झालेल्या हिसांचाराचा त्यांनी निषेध केला आहे. त्रिपुरामध्ये कुठलीही मशीद जाळण्यात आलेली नाही, त्रिपुराला बदनाम करण्याच्या उद्देशातून दुसऱ्या देशातील छायाचित्रे जाणीवपूर्णक सोशल मीडियावर टाकण्यात आले. घटनेमध्ये तथ्य नसून, या सर्व अफवा आहेत. त्यामुळे सर्वांनी शांत रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मशीद जाळल्याची अफवा पसरल्यानंतर त्रिपुरामध्ये मोठ्याप्रमाणात दगड फेक झाली, या घटनेत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेतील दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

अमरावतीमध्ये संचारबंदी 

दंगलीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रं येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्रं आलेले दिसल्यास त्यांना अटक केली जाणार आहे. तीन दिवस ही संचारबंदी लागू राहणार आहे. नागरिकांनी बाहेर फिरू नये म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी आणि संवेदनशील भागात बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. अर्धा किलोमीटरपर्यंतही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ 

हिंसा रोखण्यासाठी अमरावतीमध्ये  पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांची कुमक कमी पडल्याने अमरावतीत बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि वाशिममधून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. त्याशिवाय एसआरपीएफच्या तुकड्याही शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठांमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात पोलीस राज असल्या सारखं चित्रं निर्माण झालं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राजकमल चौक, नमुना गल्ली,ऑटो गल्ली, इतवारा परिसर, पठाण चौक, सरोज चौक, सराफा मार्केट, कपडा मार्केट आणि जव्हारद्वारा या परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस महासंचालकांचे नागरिकांना शांततेचे आवाहन

दरम्यान महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडेय यांच्याकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, या सर्व अफवा आहेत, नागरिकांनी अफवेंना बळी पडू नये. अशा घटनांमध्ये सहभागी लोकांचा फायदा होत नाही, उलट त्यांचे भविष्ट धोक्यात येते. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

Amravati Violence : अमरावती हिंसाचारानं हादरली, पालकमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, बैठकीत शांततेसाठी मंथन होणार

VIDEO: 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात; चंद्रकांत पाटलांनी आकडेवारीच दिली

कंगना रणावत विरोधात मुंबईत तक्रार दाखल, काँग्रेस नेत्याकडून अटकेची मागणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.