AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : थेट पुरावे द्या, कोर्टाने न ऐकल्यास…राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान, म्हणाले…

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि भाजपावर मतचोरीचे आरोप केले आहेत. यालाच आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

Rahul Gandhi : थेट पुरावे द्या, कोर्टाने न ऐकल्यास...राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान, म्हणाले...
eknath shinde and rahul gandhi
| Updated on: Sep 18, 2025 | 5:16 PM
Share

Eknath Shinde Answer To Rahul Gandhi : गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशात मतचोरी केली जात आहे, असा गंभीर आरोप करत आहेत. निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपा यांच्या संगनमताने हा प्रकार चालू असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खळबळजनक दावा केला आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे हटवण्यात (डिलिट) आली असा आरोप आता राहुल गांधी यांनी केला आहे. हा आरोप करताना राहुल गांधींनी पहिल्यांदाच तेथील लोकांना समोर आणून पुरावे सादर केले आहेत. त्यांनी काही व्हिडीओ क्लिपही दाखवल्या आहेत. त्यांच्या या गंभीर आरोपांनंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. काँग्रेसचा विजय झाला की? ते मतचोरीची आरोप करत नाहीत. त्यांचा पराभव झाला तरच ते असे आरोप करतात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुमच्याकडचे पुरावे सादर करा. पण हे पुरावे सादर न करता ते फक्त आरोप करत आहेत. कर्नाटकमधील आलन मतदारसंघामध्ये मतं चोरी झाली असेल तर त्याच मतदारसंघात काँग्रेसचा भोजराज पाटील हा उमेदवार कसा निवडून आला? तिथे काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला असेल तर मग मतं काँग्रेसने चोरली की भाजपाने चोरली? असा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.

ते जेव्हा जिंकतात तेव्हा…

तसचे, फक्त आरोप करायचे. त्यांनी निवडणूक आयोगाला पुरावे दिलेले नाहीत. खोटा प्रचार करायचे काम, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर ते निवडणूक आयोगाला द्यावेत. निवडणूक आयोगाने न ऐकल्यास त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पाहिजेत. ते जेव्हा जिंकतात तेव्हा ते आरोप करत नाहीत. मात्र ते जेव्हा पराभूत होतात तेव्हाच त्यांच्याकडून आरोप केला जातो, असा पलटवारही शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.

ईव्हीएम कोणाच्या सरकारच्या काळात आले?

ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान घेण्याची पद्धत ही यूपीएच्या काळात सुरू झाली. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांनी सुरू केलेली प्रक्रिया ही चुकीची आहे, असे त्यांना म्हणायचे आहे का? असा रोखठोक सवाल शिंदे यांनी राहुल गांधींना विचारला. मतचोरी करण्याचे काम 14 ते 15 वर्षांपासून चालू आहे, असे ते सांगत आहेत का. आता 15 वर्षांपूर्वी सत्तेत कोण होतं? असे विचारत शिंदे यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानेदेखील फेटाळले आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.