AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भाजप सत्तेत आल्यानंतर बळीराजाचा सन्मान करणार – धर्मेंद्र प्रधान

अमित शहा यांनी ओंडा येथील जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितांचा सन्मान केला जाईन आणि त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला दिला जाईल अशी माहिती दिली.

TMC मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भाजप सत्तेत आल्यानंतर बळीराजाचा सन्मान करणार - धर्मेंद्र प्रधान
PradhanImage Credit source: Google
| Updated on: Apr 11, 2026 | 6:10 PM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच बड्या पक्षांचे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. अशातच आज अमित शहा यांनी ओंडा येथील जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितांचा सन्मान केला जाईन आणि त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला दिला जाईल अशी माहिती दिली. यावर केंद्रीय शिश्रणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

TMC मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ओंडा येथील जनसभेत माननीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी जी वस्तुस्थिती मांडली, ती संपूर्ण बंगालमधील शेतकऱ्यांच्या वेदनेचे खरे चित्र आहे. येथील बटाटा शेतकरी स्वतःच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी झगडत आहे, कारण ममता बॅनर्जी सरकारने आपल्या अहंकारामुळे ओडिशा, झारखंडसह देशातील इतर बाजारपेठांचे दरवाजे बंगालच्या शेतकऱ्यांसाठी बंद केले आहेत. हे TMC सरकारकडून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर केलेले निर्दयी आघात आहे.

शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करणार – प्रधान

पुढे बोलताना प्रधान म्हणाले की, TMC च्या कारकिर्दीत दलालांची यंत्रणा फोफावली, आणि अन्नदाता आपल्या राज्यातच संघर्ष करत राहिला. शेतकरी शेतात घाम गाळत राहिला, पण अव्यवस्थेमुळे त्याला त्याचा हक्क मिळू शकला नाही. मात्र आता तसे राहणार नाही. माननीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, भाजप सरकार सत्तेत आल्यावर बंगालचा बटाटा ओडिशा, झारखंडसह संपूर्ण देशात पोहोचेल, शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा योग्य मोबदला मिळेल आणि त्याच्या मेहनतीचा सन्मान निश्चित केला जाईल. ही केवळ घोषणा नाही, तर बंगालच्या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या पुनर्स्थापनेचा संकल्प आहे. बंगालचा शेतकरी आता अन्याय सहन करण्यासाठी नाही, तर तो संपवण्यासाठी उभा राहिला आहे.

महिलांसाठी दरमहा 3000 रुपयांची मदत दिली जाणार

पश्चिम बंगालमधील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. बंगालमध्ये सत्ता आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा 3000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाईल, असं आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. हा निर्णय विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. याशिवाय महिलांची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता वाढवण्यावरही भर देण्यात येईल असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'