Assam : आसाममध्ये सापडलं फुटबॉलपटू मॅराडोना यांचं चोरी झालेलं घड्याळ!

Assam : आसाममध्ये सापडलं फुटबॉलपटू मॅराडोना यांचं चोरी झालेलं घड्याळ!
दिएगो मॅराडोनाचे घड्याळ

हे घड्याळ हेरिटेज (Heritage) म्हणून सांगितलं जातंय, जे दिवंगत फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना वॉच(Diego Maradona Watch)चं होतं. आसाम पोलिसांनी ज्या व्यक्तीकडून हे घड्याळ जप्त केलं, त्यालाही अटक करण्यात आलीय. आसाम पोलिसांचे डीजीपी ज्योती महंता यांनी दुबई पोलिसांसोबतच्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 11, 2021 | 8:40 PM

दिसपूर : आसाम पोलिसां(Assam Police)नी दुबई पोलिसां(Dubai Police)सह चोरी(Theft)चं आलिशान घड्याळ (Luxury Watch) जप्त केलं आहे. हे घड्याळ हेरिटेज (Heritage) म्हणून सांगितलं जातंय, जे दिवंगत फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना (Diego Maradona Watch) यांचं होतं. दिएगो मॅराडोना हे अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू होते. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते.

घड्याळ जप्त
आसाम पोलिसांनी ज्या व्यक्तीकडून हे घड्याळ जप्त केलं, त्यालाही अटक करण्यात आलीय. आसाम पोलिसांचे डीजीपी ज्योती महंता यांनी दुबई पोलिसांसोबतच्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई केली. ते म्हणाले, की दिएगो मॅराडोना यांचं घड्याळ आसामच्या चरैदेव जिल्ह्यातून जप्त करण्यात आलं. संबंधित व्यक्तीला अटकही करण्यात आलीय. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी ट्विटरद्वारे माहिती दिली, की वाजिद हुसैन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई केली जातेय. आसाम पोलिसांनी भारतीय फेडरल लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजच्या माध्यमातून दुबई पोलिसांच्या समन्वयानं अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं घड्याळ जप्त केल्याचं सांगितले जातंय.

मुख्यमंत्र्यांचं ट्विट
हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केलं, की आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या अधिनियमानुसार, भारतीय फेडरल LEAमार्फत आसाम पोलिसांनी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं घड्याळ परत मिळवण्यासाठी आणि वाजिद हुसेनला अटक करण्यासाठी दुबई पोलिसांशी समन्वय साधला. मध्यवर्ती एजन्सीमार्फत दुबई पोलिसांकडून इनपुट मिळाल्यानंतर, आसाम पोलिसांनी आरोपीला शनिवारी पहाटे 4 वाजता शिवसागर इथल्या त्याच्या राहत्या घरातून अटक केली. दुबईमध्ये दिवंगत फुटबॉल खेळाडूचं सामान ठेवणाऱ्या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत असताना आरोपीनं मॅराडोनानं स्वाक्षरी केलेलं हब्लॉट घड्याळ चोरलं. त्यानंतर तो यावर्षी ऑगस्टमध्ये आसाममध्ये पळून गेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या मदतीनं पुढील कारवाई करून त्याला अटक करण्यात आली.

लालू प्रसाद यादवांनी नव्या सूनबाईचं नाव बदललं; तेजस्वी यादवांच्या पत्नीचं नवं नाव नेमंक काय?

Video: देश शोकसागरात, भाजप आयटी सेलकडून प्रियंका गांधींच्या ‘डान्स’चा व्हिडीओ ट्विट, काँग्रेसचेही जशास तसे उत्तर

मोठी दुर्घटना, कृष्णेच्या पाण्यात पाच पोरं आणि एक शिक्षक उतरले, घडलेल्या घटनेनं उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशही हादरले

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें