चार जीवाभावाचे दोस्त, डॉक्टर होणारच होते, पण अचानक रस्ते अपघातात… रोडवरचं दृश्य पाहून बघेही हादरले
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चार जीवाभावाच्या मित्रांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. चारही विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत होते. त्यांची इंटर्नशिप सुरु होती. आता त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया...

कधी कोणाच्या आयुष्यात काय घडेल याचा नेम नसतो. आता जर तुम्ही आनंदी असला तर काही क्षणात असे काही घडू शकते की तुमच्या आनंदावर विरझण पडू शकते. अशीच एक धक्कादायक घडना समोर आली आहे. चार डॉक्टर मित्रांचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यांना गाडीतून बाहेरही निघता आले नाही. जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. आता नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं? जाणून घ्या…
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात मुरादाबाद-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे एका भीषण रोड अपघातात चार MBBS डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व डॉक्टर मेरठ येथील एका खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. ते आपल्या गाडीने (स्विफ्ट डिझायर) मुरादाबादकडे जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार-पाच वाजता ही कार वेगात असताना चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. ती रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन धडकली. धडकेमुळे कारच्या समोरच्या बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीतून बाहेर पडण्याची चारही डॉक्टरांना संधीच मिळाली नाही. त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृत डॉक्टरांची नावे काय?
या अपघातात मूळचा बिजनोरचा असलेला डॉक्टर तालिब, मेरठ येथील डॉक्टर आलोक, बागपत येथील डॉक्टर नवजीत आणि अमरोहा येथील डॉक्टर अर्श या चारही डॉक्टरांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चारही मृतदेह गाडीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी केस दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार अतिवेग आणि झोपेमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याच महामार्गावर दुसरा अपघात
याच महामार्गावर दुसरा अपघात देखील झाला आहे. हा अपघात ट्रक आणि बाईक यांच्यामध्ये झाला आहे. या अपघतात बाईकवर असलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा मृत युवक लखीमपुर खीरी येथील गावाचा निवासी होता. बुधवारी रात्री घरी परतत असतान त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाची देखील चौकशी करत आहेत.
