AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींना आणखी मोठा झटका? ‘या’ मंत्र्यांनी बैठकीला दांडी मारल्याने उलटसुलट चर्चांना उधाण

ममता यांनी बोलावलेल्या बैठकीला 4 मंत्री गैरहजर राहिल्यामुळे बंगालच्या राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (West Bengal ministers absent )

ममता बॅनर्जींना आणखी मोठा झटका? 'या' मंत्र्यांनी बैठकीला दांडी मारल्याने उलटसुलट चर्चांना उधाण
| Updated on: Dec 22, 2020 | 8:59 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे येथे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. जवळपास 10 आमदारांनी (MLA) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची साथ सोडल्यामुळे ममता अडचणीत आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता ममता यांनी बोलावलेल्या बैठकीला (Cabinet Meeting) पुन्हा 4 मंत्री गैरहजर राहिल्यामुळे बंगालच्या राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (four ministers of West Bengal absent in meeting called by Mamata Banerjee)

ते चार मंत्री कोण ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाची राज्य सचिवालय कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या गेल्या. मात्र, यावेळी राजीव बनर्जी (Rajiv Banerjee), गौतम देव (Gautam Deb), रवींद्रनाथ घोष (Rabindranath Ghosh) आणि चंद्रनाथ सिन्हा (Chandranath Sinha) या चार महत्त्वाच्या मंत्र्यांनी बैठकीला दांडी मारली. बैठकीला ते अनुपस्थित असल्यामुळे पश्चिम बंगलाच्या राजकारणात पुन्हा तर्कवितकर्कांना उधाण आले.

अनुपस्थित मंत्री नाराज नसल्याचा दावा

दरम्यान, बैठकीला चार मंत्री उपस्थिन नसल्यामुळे राजकीय गोटात अनेक चर्चा सुरु झाल्या. त्याबद्दल सांगताना, पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनी सर्व दावे फेटाळून लावत, अनुपस्थित मंत्री हे त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हजर राहू शकले नसल्याचं सांगितलं आहे. तसेच, या सर्व मंत्र्यांना बैठकीला येऊ शकणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांना कळवलं असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मात्र, भाजपमध्ये नुकतीच झालेली इनकमिंग पाहता चटर्जी यांच्या दाव्यावर शंका उपस्थित केली जात आहे.

या आधीही ममता यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री राजीव बॅनर्जी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिलेले आहेत. ते नाराज असल्याची चर्चा सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. पार्थ चटर्जी आणि प्रशांत किशोर यांनी राजीव बॅनर्जी यांच्यासोबत यापूर्वी बैठक घेतली होती. या बैठकीत बॅनर्जी यांची नाराजी मिटली नव्हती. त्यानंतर आता राजीव बॅनर्जी पुन्हा ममता यांनी बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या याच अनुपस्थितीमुळे बंगालमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

दरम्यान नुकतंच भाजपवासी झालेले शुभेंदु अधिकारी यांनीदेखील ते भाजप प्रवेश करणार असल्याचे कुणालाही कळू दिले नव्हते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

संबंधित बातम्या :

शाहांची सभा संपली आणि भाजप कार्यकर्त्यांवर कोण तुटून पडलं? बंगालमध्ये राडा

बंगालमध्ये मोठमोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश, अमित शाहांचा ममता दीदींवर निशाणा, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं ‘मिशन बंगाल’ नेमकं काय?

(four ministers of West Bengal absent in meeting called by Mamata Banerjee)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.