AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर 4 पोलिसांची हत्या… माओवादांना किती रुपयांचं बक्षीस? NIA च्या खुलाशाने मोठी खळबळ

Maoists Killed Four Police: झारखंडमध्ये 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यानंतर चार पोलिसांची हत्या करण्यात आली. माओवाद्यांनी ही क्रूरकृत्य करणाऱ्या नक्षलवाद्यांना इतके बक्षीस दिले होते. NIA च्या तपासात ही बाब समोर आली आहे.

अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर 4 पोलिसांची हत्या... माओवादांना किती रुपयांचं बक्षीस? NIA च्या खुलाशाने मोठी खळबळ
चार पोलिसांची हत्या, माओवाद्यांना किती बक्षीसImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 02, 2026 | 10:01 AM
Share

Maoists Killed Four Police: 22 नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्रीय गृहमंत्री हे झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी चंदवा भागाच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात चार पोलिसांची त्यानंतर हत्या करण्यात आली. ही हत्या माओवाद्यांनी केली होती. माओवादी रवींद्र गंझू याने ही घटना घडवून आणली होती. त्याचा तपास पुढे NIA ने केला. त्यात अनेक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. चार पोलिसांच्या हत्येनंतर माओवादी सुनील गंझू आणि फगुना गंझूसह इतर माओवादी हे बोदा तलावाजवळ दाखल झाले. तिथे झोनल कमांडर रवींद्र गंझू हा त्यांची वाट पाहत थांबलेला होता. पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचे बक्षिस त्याने या माओवाद्यांना दिले. प्रत्येकी पाच हजार रुपयांचं बक्षिसं दिले. त्यानंतर माओवादी त्यांच्या तळावर परतले. NIA च्या तपासात ही बाब समोर आली आहे.

व्हीआयपी दौऱ्यादरम्यान मोठी घटना

झारखंड विधानसभा निवडणुकीदरम्यान अमित शाह यांनी चंदवा येथील सभेला हजेरी लावली. यावेळी भाजपचे अनेक मोठे नेते हजर होते. व्हीआयपी दौरा असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त होता. रात्री आठ वाजता चंदवा पोलिसांची पेट्रोलिंग टीम गस्तीसाठी निघाली होती. यामध्ये शुकरा उरांव, सक्रिन्द्र सिंह, शंभू प्रसाद, दिनेश राम आणि चालक यमुना प्रसाद हे होते. गस्ती पथक हे जेवा लुकुइया या परिसरात आले. तेव्हा दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी या पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दिनेश राम हेच वाचले. इतर पोलीस वाचू शकले नाही. हल्ल्यानंतर माओवाद्यांनी एक पिस्तूल, तीन प्वॉईंट 303 रायफल आणि 160 काडतूस पळवले होते.

पोलिसांच्या पथकावर हल्ल्यासाठी मोठा कट

पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यासाठी माओवाद्यांनी मोठा कट रचला होता. लुकूईया वळणावर सुनील नावाचे हॉटेल आहे. तिथे फगुना गंझू आणि मुख्य आरोपी बैजनाथ गंझू पोहचले होते. त्यांनी तिथेच गस्ती पथकावर हल्ल्याचा कट रचला. माओवाद्यांच्या गस्ती पथकातील सदस्य राजेश गंझूसह हे तीनही जण बोडसीदाग गावाजवळील फुटलबॉल मैदानाजवळ थांबले. फगुनाने पोलिसांचे गस्ती पथक लुकूईया वळणाकडे निघाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार हा हल्ला करण्यात आला होता. त्यासाठी दोन शूटरचा वापर करण्यात आला. माओवादी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्याचेही समोर आले आहे. ही घटना घडल्यानंतर फगुनाने या कटातील माओवादी बीरजांगा जंगलात पसार झाले होते.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात