AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alfred Cyclone : चक्रीवादळ अल्फ्रेडचा हाहाकार; अतिमुसळधार पाऊस, लाखो लोकांना तडाखा, भारताला काय इशारा?

सायक्लॉन अल्फ्रेड ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीला धडकलं आहे. या चक्रीवादळामुळे ऑस्ट्रेलियात हाहाकार उडाला आहे. लाखो लोकांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

Alfred Cyclone : चक्रीवादळ अल्फ्रेडचा हाहाकार; अतिमुसळधार पाऊस, लाखो लोकांना तडाखा, भारताला काय इशारा?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2025 | 9:29 PM
Share

सायक्लॉन अल्फ्रेड ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीला धडकलं आहे. या चक्रीवादळामुळे ऑस्ट्रेलियात हाहाकार उडाला आहे. लाखो लोकांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर तुफान पाऊस सुरू आहे. स्थानिक अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या घटनेत अनेकजण जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेकडून पश्मिमेकडे सरकलं असून, सध्या या वादळाचा वेग प्रतितास 55 किमी इतका आहे. या चक्रीवादळामुळे सध्या देशात मुसळधार पाऊस सुरू आहे.

चक्रीवादळात एकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळामुळे सध्या ऑस्ट्रेलियात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाल्याला पूर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेल्स डोरिगो शहराजवळून वाहणाऱ्या एका नदीमध्ये एक 61 वर्षीय व्यक्ती वाहून गेला होता. त्याची शोध मोहिम सुरू होती. मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलं असून, त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

13 जवान जखमी

दरम्यान या घटनेमध्ये तेरा जवान देखील जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या चक्रीवादळामुळे ऑस्ट्रेलियात अपत्कालीन परिस्थिती आहे. बचाव कार्यासाठी निघालेल्या सैनिकांचा एक ट्रक पलटी झाला, या ट्रकमध्ये असलेले तेरा जवान जखमी झाले आहेत. या सैनिकांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यातील काही जवानांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान अतिमुसळधार पाऊस आणि वादळामुळे ऑस्ट्रेलियाच्या अनेक शहरातील बत्ती गूल झाली असून, लाखो लोक अंधारात आहेत. मात्र आता हळूहळू परिस्थिती नियंत्रण येत असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतातही पावसाचा इशारा

दरम्यान दुसरीकडे भारतात देखील पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पुढील पाच दिवस हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील पाच जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा  देण्यात आला आहे.

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....