हिंदू सेनेने JNU च्या गेटवर लावले झेंडे, पोस्टरवर लिहले भगवा JNU

  दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून JNU वादात सापडले आहे. येथे रामनवमीच्या दिवशी मांसाहारावरून झालेल्या गदारोळानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली होती. येथील कावेरी हॉस्टेलमध्ये मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वादानंतर हिंसक वळन लागले होते. त्यानंतर येथे वातारण चांगलेच तापलेले असतनाच आणखी एक वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामनवमीच्या मुहूर्तावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील […]

हिंदू सेनेने JNU च्या गेटवर लावले झेंडे, पोस्टरवर लिहले भगवा JNU
हिंदू सेनेने JNU च्या गेटवर लावला भगवा झेंडेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 11:00 AM

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून JNU वादात सापडले आहे. येथे रामनवमीच्या दिवशी मांसाहारावरून झालेल्या गदारोळानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली होती. येथील कावेरी हॉस्टेलमध्ये मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वादानंतर हिंसक वळन लागले होते. त्यानंतर येथे वातारण चांगलेच तापलेले असतनाच आणखी एक वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामनवमीच्या मुहूर्तावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना अभाविप आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये हिंसक चकमक झाली. रामनवमीची पूजा आणि मांसाहाराच्या वादावरून हा वाद झाला. त्यावरूनच वामपंथी विद्यार्थी संघटना आणि ABVP शी संबंधित दोन गटात हाणामारी झाली होती. यावेळी अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर आता जेएनयूच्या मुख्य गेटवर कॅम्पस आणि त्याच्या भिंतीभोवती भगवा झेंडा (bhagwa flags) आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. जेएनयूच्या मुख्य गेटवर भगवा झेंडा लावण्यात आला आहे. तर जेएनयू कॅम्पस आणि त्याच्या भिंतीभोवती भगवा JNU नावाचे पोस्टर्स लावले आहेत. हा भगवा झेंडा आणि पोस्टर्स हिंदू सेनाच्या संघटनेने लावले आहेत. ही बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्या पोस्टर्सवरूनच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी

रामनवमीच्या दिवशी मांसाहारावरून झालेल्या गदारोळानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली होती. येथील कावेरी हॉस्टेलमध्ये मांसाहारावरू विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वादानंतर हिंसक वळन लागले होते. त्यानंतर येथे वातारण चांगलेच तापलेले असतनाच आता याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने JNU कडे अहवाल मागितला आहे. तर विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने याप्रकरणी हायकोर्टच्या निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. येथील कावेरी हॉस्टेलमध्ये डाव्या विद्यार्थी संघटना आणि ABVP शी संबंधित दोन गटात मांसाहारावरून वाद झाला होता. त्यावरूनच वामपंथी विद्यार्थी संघटना आणि ABVP शी संबंधित दोन गटात हाणामारी झाली होती. ज्यात सुमारे 20 एक विद्यार्थी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मांसाहारी बनविण्यास विरोध

दरम्यान याप्रकरणी वसंतकुंज (उत्तर) पोलिसांनी चौकशी केली आहे. ज्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. यावेळी ABVP आणि त्याचे समर्थक वसतिगृहात मांसाहारी बनविण्यास विरोध करत असल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांनी वसतिगृहाच्या सचिवाला मांसाहारावरून धमकी देत ​होते. त्यावेळी डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप केल्याचे म्हटले आहे. मात्र यानंतर अभाविपच्या सदस्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी केला. यात्यांच्या आरोपावर ABVP शी संबंधित विद्यार्थी संघटनांनी आरोप केला आहे की, डावे त्यांच्या हवनाला विरोध करत होते. तसेच ते हवनात अडथळा आणत आहेत. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण सुरू झाली. वसतिगृहात मांसाहार करण्यास विरोध केला नसल्याचे अभाविप सदस्यांचे म्हणणे आहे.

इतर बातम्या :

केंद्र सरकारने बांधले 1 लाख 41 हजार किमीपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग.. 2025 पर्यंत बांधायचे आहेत, दोन लाख कीलोमीटर पर्यंतचे रस्ते

Dr. B. R. Ambedkar family : भीमराव आपल्या आई-वडिलांचे होते 14 वे अपत्य ; वडील लष्करात होते कार्यरत

Petrol Diesel Price: वाढत्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली! एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा कोणताही विचार नाही?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.