आयुष्मान कार्डद्वारे 1 वर्षात किती वेळा फ्री उपचार मिळतो? जाणून घ्या
आयुष्मान कार्डच्या माध्यमातून लोक मोफत उपचाराच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 1 वर्षात किती वेळा लोकांना मोफत उपचार मिळू शकतात? चला जाणून घेऊया.

तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढले आहे का? तुम्हाला माहिती आहे का की, वर्षभरात किती वेळेस उपचार फ्री मिळतात, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या माहितीमधून तुम्हाला फायदा होऊ शकेल, चला तर मग जाणून घेऊया.
आयुष्मान भारत योजने अंतर्गत सरकार देशातील लोकांना मोफत उपचारांची सुविधा देते. या योजनेअंतर्गत लोकांना आयुष्मान कार्ड दिले जाते. या कार्डच्या माध्यमातून लोक मोफत उपचाराच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आता आयुष्मान कार्डद्वारे 1 वर्षात किती वेळा लोकांना मोफत उपचार मिळू शकतात? चला जाणून घेऊया.
देशातील नागरिकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारद्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत, ज्यामुळे लोकांना आर्थिक मदत होते. केंद्र सरकारच्या याच योजनांपैकी एक योजना आयुष्मान भारत योजना देखील आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत सरकार देशातील लोकांना मोफत उपचार देत आहे. या योजनेअंतर्गत लोकांना आयुष्मान कार्ड दिले जातात. या कार्डद्वारे लोक मोफत उपचारांच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आता आयुष्मान कार्डामुळे 1 वर्षात किती वेळा लोकांना मोफत उपचार मिळू शकतात? आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
आयुष्मान कार्डद्वारे मला वर्षातून किती वेळा मोफत उपचार मिळू शकतात?
सरकारने 2018 मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत देशातील गरीब आणि दुर्बल घटकांना सरकार दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते. 5 लाख रुपयांपर्यंतचे हे मोफत उपचार संपूर्ण कुटुंबासाठी लागू आहेत. जर कुटुंबात 6 सदस्य असतील तर 6 सदस्य 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांचा लाभ घेऊ शकतात. आयुष्मान कार्डद्वारे तुम्ही 1 वर्षात अमर्यादित वेळा मोफत उपचार घेऊ शकता परंतु केवळ 5 लाख रुपयांची मर्यादा पूर्ण होईपर्यंत.
आयुष्मान भारत योजनेची पात्रता
आयुष्मान भारत योजने अंतर्गत आयुष्मान कार्ड गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी बनवले जाते. आयुष्मान भारत योजनेंतर्गत आपली पात्रता तपासण्यासाठी आपण पीएमजेएवाई https://pmjay.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि आपली पात्रता तपासू शकता.
आयुष्मान भारत योजनेची ठळक वैशिष्ट्ये
गरीब कुटुंबांना मोफत उपचार
देशातील अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
गंभीर आजारांवर मोफत उपचार
मोठी शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, आयसीयू चार्ज, डायग्नोस्टिक चाचण्या, औषधांची मोफत सुविधा
आतापर्यंत 1.06 लाख दावे
केंद्र सरकारने एक दिवसापूर्वी लोकसभेत माहिती दिली आहे की, आयुष्मान वय वंदना कार्ड अंतर्गत 1.06 लाख दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात 75.41 लाख आयुष्मान वय वंदना कार्ड तयार करण्यात आली आहेत. यापैकी 32.3 लाख कार्डे महिलांची आहेत.
काय आहे आयुष्मान वय वंदना कार्ड?
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत, 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2024 मध्ये आयुष्मान वय वंदना कार्ड सुरू करण्यात आले. हे कार्ड बनवण्याचा फायदा असा आहे की लाभार्थ्याला देशभरातील कोणत्याही रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.
