अन् खाटेला खिळलेले पेशंट पळायला लागले… हॉस्पिटलमध्ये भीषण अग्नितांडव, रुग्णांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न
राजधानी दिल्लीत एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे रुग्णालयात सर्वत्र धुर पसरला होता, त्यामुळे काच फोडून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

राजधानी दिल्लीत एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील आनंद विहारमध्ये ही घटना घडली आहे. ऑक्सिजन सिलिंडर आगीच्या विळख्यात आल्यामुळे आग भडकली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमुळे रुग्णालयात सर्वत्र धुर पसरला होता, त्यामुळे काच फोडून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एका कर्मचाराचा मृत्यू झाला असून 4 जण बेशुद्ध पडले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
एकाचा गुदमरून मृत्यू
रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर देखील या आगीच्या विळख्यात सापडले त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र उर्वरित ऑक्सिजन सिलिंडर वेळेत बाजूला केल्यामे मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागल्यानंतर अमित नावाचा एक हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यारी स्टोअर रूममध्ये कोंडला गेला होता, त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
चार रुग्ण बेशुद्ध
दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीमुळे रुग्णालयात सर्वत्र धुर पसरला होता, त्यामुळे काचा फोडून उपचार सुरुअसणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. या आगीच्या घटनेत रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. चार रुग्ण बेशुद्ध पडले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
समोर आलेल्या माहितीनुसार आनंद विहारमधील कॉसमॉस हॉस्पिटलला ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागताच ज्वाळा पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिल्ली अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर 3 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्य सुरू केले.
दोन ते तीन ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट
आनंद विहारमधील या आगीच्या घटनेत रुग्णालयातील अमित नावाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. चार जण बेशुद्ध पडले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कॉसमॉस हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आगी लागली आणि या आगीमुशे दोन ते तीन ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे रुग्णालयात धूर पसरला. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांना आता पुष्पांजली येथे हलवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
