मी इतकी सुंदर आहे आणि तू… लग्नानंतर 2 वर्षांतच पत्नीने दाखवले खरे रंग, कारण….
मध्य प्रदेशातील छत्तरपूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध एसपीकडे तक्रार केली. लग्नाच्या 2 वर्षांनंतर त्याच्या पत्नीचं वागणं अचानक बदललं. आता तिने त्याच्यासोबत राहण्याची इच्छा पाहिजे. एवढंच नव्हे तर ती त्याला जीवे मारण्याची धमकी देखील देत होती.

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एका पतीने एसपी कार्यालयात एक अनोखा तक्रार अर्ज दाखल केला आहे. पतीने आपल्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आपली पत्नी आपल्याला खूपच धमकावत आहे, अशी तक्रारही पतीने केली आहे. ती म्हणते, की ती तिच्या पतीपेक्षा जास्त सुंदर आहे, म्हणून ती आता त्याच्यासोबत राहणार नाही, असा दावा पतीने केला आहे. ती तिच्या सासरी परतणार नाही. जर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर ती त्याला मारेल, अशी धमकीही पत्नीने दिल्याचा दावा त्याने केला आहे.
हे प्रकरण ओरछा रोड पोलिस स्टेशन परिसरातील भगवंतपुरा गावातील आहे. येथे राहणारे विनोद अहिरवार यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात एक अनोखा तक्रार अर्ज दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांची पत्नी गोमती अहिरवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्या पत्नीला मी खूप प्रयत्नांनी शिकवले ती आता त्याला सोडून तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे. तिला तिच्या सासरी परतायचे नाही. ती त्याला जीवे मारण्याची धमकीही देत आहे असं विनोद यांचं म्हणणं आहे.
विनोद अहिरवार यांनी त्यांच्या तक्रारीत सविस्तरपणे सगळं नमूद केलं आहे. जून 2023 मध्ये माझं गोमती अहिरवारशी लग्न झाले. त्यावेळी गोमतीने फक्त 12 वी पर्यंत शिक्षण घेतले होते. मी स्वतः आर्थिकदृष्ट्या इतका मजबूत नाही. तरीही, मी माझ्या पत्नीला पुढे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. पै-पै कमवत मी पत्नीचे पुढचे शिक्षण पूर्ण केलं. दिवसरात्र मेहनत करून, घाम गाळून तिला उच्च शिक्षण दिलं, जेणेकरून ती तिच्या स्वत:च्या पायांवर खंबीरपणे उभी राहील आणि तिचं चांगलं भविष्य घडेल, असं विनोदन नमूद केलं.
शिक्षणानंतर बायकोचं वागणंच बदललं
मात्र, विनोदच्या मते, गोमतीचे शिक्षण झाल्यानंतर तिच्या वागण्यात अचानक बदल झाला. विनोदचा आरोप आहे की त्याची पत्नी आता त्याच्यासोबत राहू इच्छित नाही आणि ती सतत त्याच्यापासून खूप दूर राहते, अंतर राखून वागते. तो (विनोद) सुंदर नाही आणि गोमती खूप सुंदर आहे, असं तिचं म्हणणं आहे, त्यामुळेच मी आता सासरी नांदायाल परत येणार नाही. आता विनोदसोबत उर्वरित आयुष्य घालवायचं नाही, असं गोमतीचं म्हणणं असल्याची तक्रार विनोदने केली आहे.
जीवे मारण्याचीही धमकी
या आरोपांसोबतच, पीडित पती विनोद म्हणाला की, गोमती त्याला सतत जीवे मारण्याची धमकी देत आहे. या अनपेक्षित वळणामुळे पूर्णपणे विचलित आणि अस्वस्थ झालेले विनोद अहिरवार यांनी आता पोलिस अधीक्षकांकडे न्यायासाठी अपील केले आहे. विनोदने एसपींना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि त्यांच्या पत्नीकडून होणाऱ्या कथित छळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांपासून त्यांची सुटका करण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे.
