कोरोनावरील औषधांची अनधिकृतपणे साठेबाजी, गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी; हायकोर्टाने खडसावलं

Drug Controller ने म्हटलं आहे की, गौतम गंभीर फाऊंडेशन आणि औषध विक्रेत्यांविरूद्ध वेळ न घालवता कारवाई केली पाहिजे.

कोरोनावरील औषधांची अनधिकृतपणे साठेबाजी, गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी; हायकोर्टाने खडसावलं
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 4:46 PM

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या औषध नियंत्रक (Drug Controller) विभागाने गुरुवारी उच्च न्यायालयात सांगितले की, ‘गौतम गंभीर फाऊंडेशन’ला (Gautam Gambhir Foundation) कोव्हिड-19 च्या रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणारं औषध फॅबिफ्लूची (Fabiflu Medicine) अनधिकृतपणे साठवणूक करणे, खरेदी करणे आणि त्याचं वितरण करणे या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. (Illegally Stocked Covid-19 Medicine Fabiblu, Gautam Gambhir Foundation convicted; High Court)

Drug Controller ने म्हटलं आहे की, फाउंडेशन आणि औषध विक्रेत्यांविरूद्ध वेळ न घालवता कारवाई केली पाहिजे. औषध नियंत्रकांनी हायकोर्टाला सांगितले की, ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यांतर्गत आमदार प्रवीण कुमार यांनाही अशाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. कोर्टाने ड्रग कंट्रोलरला सहा आठवड्यांत या प्रकरणांमधील प्रगती आणि सद्यस्थितीबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणीसाठी 29 जुलै ही तारीख निश्चित केली आहे.

विशेष म्हणजे दिल्ली हायकोर्टाने 25 मे रोजी औषध नियंत्रकांना निर्देश दिले होते की, कोव्हिड – 19 वरील उपचारांदरम्यान वापरण्यात येणाऱ्या औषधांचा तुटवडा आणि याचदरम्यान, अनेक नेत्यांनी खरेदी केलेल्या औषधांची प्रकरणं शोधून त्याचा तपास करा. भाजप खासदार गौतम गंभीर कदाचित चांगल्या हेतूने औषधांचं वितरण करीत असतील, परंतु त्यांनी नकळतपणे बेकायदेशीर कृत्य केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीच्या ड्रग कंट्रोलरला असे आदेश दिले होते की, आम आदमी पार्टीच्या आमदार प्रीती तोमर आणि प्रवीण कुमार यांनी ऑक्सिजन जमा करण्याच्या आणि खरेदी केल्याच्या आरोपांप्रकरणी स्थिति अहवाल सादर करावा.

न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने असे सांगितले होते की, औषध नियंत्रकांना माहिती असायला हवं की, एखाद्या व्यक्तीने फॅबिक्लू औषधाचा साठा कसा केला किंवा इतक्या प्रमाणात त्याने ही औषधं कशी खरेदी केली? कारण मुळातच या औषधाचां इतका तुटवडा आहे. हे औषध सहजपणे उपलब्ध नसूनही एखादी व्यक्ती इतक्या प्रमाणात हे औषध कशी काय खरेदी करु शकते?

बेजबाबदार वर्तन; हायकोर्टाकडून कानउघडणी

कोर्टाने म्हटले आहे की, “गौतम गंभीरने चांगल्या हेतूने औषधांचं वितरण केलं असेल, आम्हाला त्याच्या हेतूबद्दल शंका नाही, तो आमच्या देशाचा राष्ट्रीय खेळाडू आहे परंतु आमचा प्रश्न असा आहे की, जेव्हा आपल्याला माहित होते की, देशात या औषधांची कमतरता आहे, अशा परिस्थिती या औषधाची मोठ्या प्रमाणात खरेदी करणे किंवा साठवणूक करणे हे जबाबदार वर्तन आहे का? खरंतर, हा एक अविचारीपणा होता, जरी तो अनावधानाने घडला असेल. बाजारातून मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करण्याचा हा मार्ग नाही, नक्कीच नाही.

इतर बातम्या

सीरम इन्स्टिट्यूट स्पुतनिक वी लसीची निर्मिती करणार? केंद्र सरकारकडे परवागनी मागितली, सूत्रांची माहिती

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा किंचीत वाढ, कोरोनाबळी मात्र घटले

(Illegally Stocked Covid-19 Medicine Fabiblu, Gautam Gambhir Foundation convicted; High Court)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....