AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने बांग्लादेशाच्या नांग्या ठेचल्या! थेट आर्थिक सर्जिकल स्ट्राईक; कारवाईमुळे कट्टरतावाद्यांच्या नाकाला झोंबल्या मिरच्या

Financial Surgical Strike : जिहादी, फतवेबाजांच्या हातात बांगलादेशाची सत्ता गेल्यापासून हा देश अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. धर्मवेड्यांनी या देशाची अवस्था बकाल करण्यास सुरू केली आहे. त्यातच भारताला डिवचण्याचा प्रयत्न या देशाच्या चांगलाच अंगलट आला आहे.

भारताने बांग्लादेशाच्या नांग्या ठेचल्या! थेट आर्थिक सर्जिकल स्ट्राईक; कारवाईमुळे कट्टरतावाद्यांच्या नाकाला झोंबल्या मिरच्या
भारताची बांगलादेशावर थेट कारवाईImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 11, 2025 | 9:02 AM
Share

बांगलादेशाला भारताने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या देशाची आर्थिक घडी नीट ठेवण्यासाठी सतत भरीव आर्थिक मदत दिली. पण हा देश कट्टरपंथीयांच्या हाती गेला. जिहादी, फतवेबाजांच्या हातात बांगलादेशाची सत्ता गेल्यापासून हा देश अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. धर्मवेड्यांनी या देशाची अवस्था बकाल करण्यास सुरू केली आहे. त्यातच भारताला डिवचण्याचा प्रयत्न या देशाच्या चांगलाच अंगलट आला आहे. आता या धर्मवेड्यांना जगात कटोरा घेऊन भीक मागण्याची वेळ येणार आहे.

चीनमध्ये दिसला युनूस यांचा खरा रंग

अमेरिकेत सत्तापालट झाले. राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प आले. त्यांनी बांग्लादेश प्रकरणात निर्णयाचे अधिकार भारताकडे असल्याचे सूतोवाच केले. तर आर्थिक संकटांचा सामना करणारा बांग्लादेश चीनकडे मदत मागण्यासाठी गेला. सध्याचे काळजीवाहू प्रशासक मोहम्मद युनूस यांनी बीजिंग येथे भारताविरोधात गरळ ओकली. भारताचे सर्व उपकार युनूस विसरले. भारताविरोधात आगळीक केली. त्यामुळे भारताने बांगलादेशावर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक केली.

काय घेतला निर्णय?

बांग्लादेश आता व्यापारासाठी भारतीय भूमीचा वापर करू शकणार नाही. भारताने 2020 मध्ये बांगलादेशाला ट्रांसशिपमेंटची सुविधा दिली होती. त्याआधारे बांग्लादेश नेपाळ, म्यानमार आणि भूतान या देशात भारतीय भूभागाचा वापर करून त्यांच्या सामानाची निर्यात करू शकत होता. आता भारताने बांग्लादेशाची ट्रांसशिपमेंटची सुविधा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बांगलादेशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनमध्ये गेल्यावर भारतविरोधात वक्तव्य केले होते. भारताच्या पूर्वोत्तर राज्यांचा उल्लेख करत चीनने आता या भागात आर्थिक विस्तार करण्याचे आवाहन युनूस यांनी केले होते. भारताचा पूर्वोत्तर भाग हा चिकन नेक असल्याचे सूतोवाच करत चीनला याठिकाणी सुविधा मिळाव्यात म्हणून बांग्लादेशाने सीमावर्ती भागात एक विमानतळ विकसीत करण्यासाठी चीनला आमंत्रण दिले आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम दिसून आला.

थायलंडमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यात 38 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत भारताने हिंदूवरील वाढत्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली. त्याबाबत युनूस चकार शब्द बोलले नाही. त्यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर जोर दिला. पाकिस्तान आणि चीनमधून बांगलादेशातील कट्टरतावाद्याना आर्थिक बळ मिळत असल्याचे समोर आले आहे. भारताच्या या निर्णयामुळे बांगलादेशातील कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.