जगासमोर भारताने फाडला पाकड्यांचा बुरखा, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा थेट पुरावा आणि…
हिंदू पर्यटकांना टार्गेट करत गोळीबार करण्यात आला. धर्म विचारून या दहशतवाद्यांनी टार्गेट केले. धक्कादायक बाब म्हणजे चक्क महिलांसमोर घरातील पुरूषांना गोळ्या झाडल्या. पहलगामच्या हल्ल्यानंतर देशात एक संतापाची लाट बघायला मिळाली.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. हिंदू पर्यटकांना टार्गेट करत गोळीबार करण्यात आला. धर्म विचारून या दहशतवाद्यांनी टार्गेट केले. धक्कादायक बाब म्हणजे चक्क महिलांसमोर घरातील पुरूषांना गोळ्या झाडल्या. या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आले, जे अतिशय धक्कादायक होती. पहलगामच्या हल्ल्यानंतर हैराण करणारी माहिती पुढे आली. दहशतवाद्यांनी ज्याठिकाणी हल्ला केला, त्याची यापूर्वी अनेकदा रेकी केली.
हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट
हल्ल्यानंतर अमित शाह हे काही वेळातच ज्याठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तिथे पोहोचले. यावेळी रूग्णालयात त्यांनी पिडित लोकांची भेटही घेतली. पहलगाम हल्ल्याच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात स्पष्ट झाले. फक्त हेच नाही तर एका दहशतवादी पाकिस्तान सैन्यात सेवा देखील बजावल्याची खळबळजनक माहिती पुढे आली.
भारतीय अधिकाऱ्यांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती
आता पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले आणि सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते, असे स्पष्ट झालंय.भारतीय सुरक्षा संस्थांनी हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पुरावे गोळा केले आहेत, ज्यात पाकिस्तान सरकारने जारी केलेले कागदपत्रे आणि बायोमेट्रिक डेटाचा समावेश देखील आहे. पाकिस्तानने आपला या हल्ल्यामागे हात नसल्याचे अगोदर म्हटले होते. मात्र, आता पाकिस्तानचा बुरखा भारताने फाडलाय. हल्ल्यामध्ये सहभागी दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
भारताने जगासमोर पाकिस्तानला केले उघडे
28 जुलै रोजी श्रीनगरच्या बाहेरील दाचीगाम जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी म्हणून ओळखले जाणारे हे दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन महादेव चालवले गेले. 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 26 लोकांचे जीव गेले. हे दहशतवादी दाचिगाम-हारवन वनक्षेत्रात लपून बसले होते. हे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झालंय. ज्यावेळी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशात होते, त्यानंतर सर्व दाैरे रद्द करून त्यांनी भारतात दाखल झाले.
