AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan War : पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला, भारताच्या 5 राज्यातील 20 शहरांवर थेट टार्गेट; पाहा कोणकोणत्या शहरांचा समावेश

पाकिस्तानकडून भारताच्या चार राज्यांतील २० शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील शहरांना लक्ष्य केले गेले. पाकिस्तानने ड्रोन हल्ले आणि सीमावर्ती गोळीबार केला, परंतु भारतीय सुरक्षा दलांनी हे प्रयत्न विफल केले. या घटनेमुळे सीमा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

India-Pakistan War : पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला, भारताच्या 5 राज्यातील 20 शहरांवर थेट टार्गेट; पाहा कोणकोणत्या शहरांचा समावेश
Pakistan drone
| Updated on: May 09, 2025 | 11:41 PM
Share

भारत पाकिस्तानातील तणाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पहलगाम हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान बिथरला आहे. सध्या पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानच्या कुरापती सातत्याने सुरु आहेत. पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा अनेक ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा डाव भारताने उधळून लावला आहे.

पाकिस्तानने आज पाच राज्यांना टार्गेट करण्यात आले. यात जम्मू, काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातचा समावेश आहे. यात नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि विमानतळांवर हल्ला करण्यात आला. यावेळी भारताच्या पाच राज्यांमधील २० शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला.

तसेच सध्या पाकिस्तानकडून सीमा भागात सातत्याने गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यात श्रीनगर विमानतळ, बडगाम, गांदरबल, अवंतीपोरा यांसारख्या काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी या सर्व प्रयत्नांना हाणून पाडले.

चार राज्यांमधील २० शहरांना पाकिस्तानकडून टार्गेट

  • जम्मू
  • सांबा
  • उरी
  • पुंछ
  • पठाणकोट
  • बारामुल्ला
  • कुपवाडा
  • राजौरी
  • अवंतीपुरा
  • नौशेरा
  • अखनूर
  • तंगधार
  • जैसलमेर
  • उत्तरलाई
  • फलौदी
  • अमृतसह
  • फिरोजपूर
  • बाढमेर

भारतीय सेनेकडून सर्व ड्रोन नष्ट

पाकिस्तानकडून काश्मीरमधील श्रीनगर विमानतळ, बडगाम, गांदरबल, अवंतीपोरा यासह काश्मीर खोऱ्यातील विविध भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय सेनेकडून हे सर्व ड्रोन नष्ट करण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. तर दुसरीकडे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत अनेक विशेष बैठका सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्यातील बैठक नुकतीच संपली आहे. डोभाल यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे देखील पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडले. ही बैठक सुमारे दीड तास चालली.

तर दुसरीकडे श्रीनगर विमानतळाच्या आसपास स्थानिक नागरिकांनी स्फोटांचे आवाज आल्याची माहिती समोर येत आहे. पण हा ड्रोन हल्ला होता. जो भारतीय सैन्याकडून यशस्वीरित्या उधळण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरा येथे सुरक्षा दलांनी एका ड्रोन नष्ट केला आहे. सध्या काश्मीर खोऱ्यात पूर्णपणे ब्लॅकआऊट आहे.

मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.